मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५२ वा| श्लोक ४१ ते ४४ अध्याय ५२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ अध्याय ५२ वा - श्लोक ४१ ते ४४ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४४ Translation - भाषांतर श्वोभाविनि त्वमजितोद्वहने विदर्भाग्नुप्तः समेत्य पृतनापतिभिः परीतः ।निर्मथ्य चैद्यमगधेशबलं प्रसह्य मां राक्षसेन विधिनोद्वह वीर्यशुल्काम् ॥४१॥पत्रिका पहावी सावधान । विलंब न करावा व्यवधान । प्रातःकाळीं आहे लग्न । ऐसिये समयीं पावावें ॥६१०॥देखोनि लिखिताची तांतडी । एकला येऊनि घालिसी उडी । तेव्हां मज म्हणसी कुडी । बुद्धि धडपुडी ऐकावी ॥११॥तुझ्या निजबोधाची सेना । प्रत्यावृत्ति पाहूनि नयना । स्वानुभवाचेन भारें जाणा । सावधान होऊनि यावें ॥१२॥स्वरूपतेच्या मदगजा । गुढार घालावें जी वोजा । प्राणापान जिणती पैजा । तैसे वारु पालाणीं ॥१३॥जिणोनि जाती मनोरथ । तैसे संजोगावे रथ । चक्रवाटा तळीं पर्वत । पीठ होत कर्माचें ॥१४॥तुझिया निजबोधाचे गाढे । द्वतदलनीं जे वेगाढे । तेचि यादव करूनि पुढें । सबळबळेंसीं तां यावें ॥६१५॥बाह्यदृष्टी जरी तूं ऐसी । तर्क पडेल लौकिकासी । कळों नेदितां दुजयासी । गुप्तरूपेंसीं प्रकटावें ॥१६॥कृष्णासि शिकवितेसि बुद्धि । म्हणाल चतुर तूं अनादि । हृदयशून्य कृष्ण त्रिशुद्धि । वर्त्तणें बुद्धी माझेनि ॥१७॥प्रबळ बळेंसीं सबळ । म्हणाल कां बोलाविते बरळ । तरी मायामाहेरीं प्रबळ । स्थूळस्थूळ अरिवर्ग ॥१८॥सखा बंधु जिवलग सबळ । मागध अष्टधा प्रबळ । मथूनि चैद्यादिकदळ । मज केवळ पर्णावें ॥१९॥म्हणसी अढालढालांची मोठी । गोड बोलांची प्रकृति खोटी । एवढी कां सोसूं आटाटी । म्हणोनि गोष्टी नुपेक्षीं ॥६२०॥तूं तंव अजित गा धडफुडा । तुझेनि नांवें वाढींव भेडां । मज पर्णावया आळस दवडा । होयीं गाढा वीरवृत्ति ॥२१॥म्हणसी युद्ध मांडेल कडाडी । मी उठेन काढाकाढी । नाहीं लौकिकपावडी । कैंची घडि घडवट ॥२२॥कैचा अंतःपट जाण । कवण म्हणेल सावधान । मीतूंपणा नाहीं व्यवधान । म्हणसी लग्न कैसेनि ॥२३॥ऐसेन लग्न लागलिया पुढां । रणीं नाचेल रणधेंडा । वोवाळणी बाण प्रचंडा । परस्परें पडतील ॥२४॥म्हणसी विधि नव्हेल पैं लग्न । अविधि न करीं पाणिग्रहण । येही विषयींचें विधान । सावधान परिसावें ॥६२५॥विवाह तंव बहुतापरी । पिशाच गंधर्व आसुरी । राजे वरिताति स्वयंवरीं । पणमहासुरी भेदूनी ॥२६॥पाणिग्रहण ब्राह्मणासी । स्वर्गलग्न क्षत्रियांसी । रणीं जिंकोनि महाविरांसी । विधिरक्षासीं मज पर्णीं ॥२७॥जागृतिस्वप्नसुषुप्तिकाळा । तुजवीण आन न देखें डोळां । ग्लानि लिहितां वेळोवेळां । उबग गोपाळा न मनावा ॥२८॥आतां ऐकें एक बोल । तुझें वीर्य माझें मोल । अल्प वेंचूनि एक वेळ । दासी केवळ मज करावें ॥२९॥अंतःपुरान्तरचरीमनिहत्य बंधून्त्वामुद्वहे कथमिति प्रवदाम्युपायम् ।पूर्वेद्युरस्ति महती कुलदेवियात्रा यस्यां बहिर्नववधूर्गिरिजामुपेयात् ॥४२॥म्हणसी अंतःपुरामाजि तूम वधू । काढितां आडवे येती बंधु । त्यांचा मजकरितां वधू । दःखसंबंधु तुज होईल ॥६३०॥येचि विषयीं जी उपाया । सांगेन ऐक यादवराया । वेगीं यावें अंबालया । यात्रासमया टाकूनी ॥३१॥कुळींचा कुळधर्म भीमकराया । नगराबाहेरीं अंबालया । नववधू न्यावी पूजावया । जगदंबेसि कुळधर्मा ॥३२॥तेचि संधी जिंका रण । परस्परें हेचि खूण । तेथें राहोनि सावधान । ॐपुण्या करावें ॥३३॥यस्यांघ्रिपंकजरजस्नपनं महांतो वांछंत्युमापतिरिवास्ततमोऽपहत्यै ।यर्ह्यंबुजाक्ष न लभेय भवत्प्रसादं जहामसून्व्रतकृशाञ्छतजन्मभिः स्यात् ॥४३॥म्हणसी ऐश्वर्यें थोर इंद्र । रूपें मदन का चंद्र । त्यांतें सांडूनि आग्रह थोर । माझाचि कां करितेसी ॥३४॥ऐसें न म्हणावें यदुवीरा । कवण जाणे या विचारा । केवळ नव्हसी तूं नोवरा । जन्मोद्धारा मजलागीं ॥६३५॥तुझिये चरणींची माती । ब्रह्मादिदेवां नव्हे प्राप्ति । आंगें येऊनि उमापति । स्नान वांछिती पदरजें ॥३६॥महादेव तमोगुण । त्या तमासि उपशमन । तुझिये चरणींचे रज जाण । लागलें ध्यान शिवासीं ॥३७॥चरणरजालागिं केवळ । ब्रह्मा जाला पोटींचें बाळ । तर्ही न पवेचि चरणकमळ । नाभिकमळीं स्थापिला ॥३८॥याचिलागिं जी गोपाळा । चरणरजासि आला गोकुळा । तुवां ठकिला त्याही वेळा । वत्सें गोवळा जालासी ॥३९॥ऐसें जाणोनि सदशिवें । ध्यान मांडिलें जीवें भावें । ऐसियाची प्राप्ति मी पवें । तैं थोर दैवें दैवाची ॥६४०॥योगयागतपें तपती । तर्ही नव्हे तुझी प्रपति । मी तंव धीट मोठी चित्तीं । आहें वांछिती अर्धांग ॥४१॥पत्रिका वाचितांचि देख । तुवां यावें आवश्यक । मज परणूनि नेदिसे सुख । तरी परम दुःख मग होईल ॥४२॥तुझी कृपा नव्हतां फुडी । तरी काय या जिण्याची आवडी । देह हाडाची हे बेडी । कोण कोरडीं वोढील ॥४३॥जरी कृपा न करवेल येथें । तरी मारूनि जायें आपुलेनि हातें । मग परलोकें तर्ही तूंटें । सावकाश भोगीन ॥४४॥ऐसें घडतां जरी न घडे । तरी देह करीन कोरडें । व्रतें तपें जीं अवघडें । तुज उद्देशें करीन ॥६४५॥प्राण सांडीन सर्वथा । म्हणसीं तरी काय येईल हाता । एके दों पांचा साता । जन्मशता वरीन ॥४६॥पत्रिका वांचितांचि जाण । जाणवेल शहाणपण । म्यां तंव वाहिली असे आण । तुजवीण आन वरीना ॥४७॥ब्राह्मण उवाच - इत्येते गुह्यसंदेशा यदुदेव मयाहृताः । विमृश्य कर्तुं यच्चात्र क्रियतां तदनंतरम् ॥४४॥द्विज म्हणे यदुनायका । सेवेस निवेदिली पत्रिका । ते विचारूनियां सविवेका । कार्यसिद्धि करावी ॥४८॥इतुके भीमकीचे गुह्य निरोप । म्यां निरूपिले पत्रिकारूप । ते विवरूनि करणीय कल्प । क्षिप्र ससाक्षेप साधावा ॥४९॥पत्रिकारूप रुक्मिणीविनति । सर्व विवरूनि पाहिजे चित्तीं । तदनंतर करणीय कृत्यीं । सद्य प्रवृत्ति करावी ॥६५०॥एका विनवी जनार्दना । कृष्ण चालिला पाणिग्रहणा । भक्तवचनाची अवगणना । देव सर्वथा न करीचि ॥५१॥इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां पत्रिकापठनं नाम चतुर्थप्रसंगः ॥४॥शुक म्हणे गा परीक्षिति । भीमकीलिखितार्थें श्रीपति । उत्सुक जाला तें तुजप्रति । पुढिले अध्यायें कथिजेल ॥५२॥त्रेपान्नाविये अध्यायें । विदर्भा जाऊनि शेषशायी । चैद्यमागध मथूनि पाहीं । हरी लवलाहीं भीमकीतें ॥५३॥तो सविस्तर वृत्तान्त । स्वमुखें वक्ता श्रीएकनाथ । श्रोतीं होऊनि दत्तचित्त । परमपुरुषार्थ साधावा ॥५४॥तें हें श्रीमद्भागवत । श्रीशुक वक्ता मूळ व्यासोक्त । टीकाकार श्रीएकनाथ । दयार्णव तेथ अनुयायी ॥६५५॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां मुचुकुंदतपोऽभिगमन - जरासंधप्रलंभमानर्तरैवताख्यानं रुक्मिणीपत्रिकार्पणं च नाम द्विपंचाशत्तमोऽध्यायः ॥५२॥श्लोक ॥४४॥ ओव्या ॥६५५॥ एवं संख्या ॥६९९॥ ( बावन्नावा अध्यय मिळून ओवी संख्या २४६१५ ) अध्याय बावन्नावा समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP