मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५२ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ५२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ अध्याय ५२ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - इत्थं सोऽनुगृहीतोंऽग कृष्णेनेक्ष्वाकुनंदनः ।तं परिक्रम्य सनम्य निश्चक्राम गुहामुखात् ॥१॥ये अध्यायीं निरूपण । मुचुकुंदकथीं उपसंहरण । म्लेच्छसैन्य संहारून । नेतां तें धन द्वारकेसी ॥११॥तये संधि जरासंधु । आला जाणोनि उभय बंदु । पळतां पर्वतीं पावले वधु । ऐसा शब्द रूढविला ॥१२॥मग रुक्मिणीस्वयंवरीं । भीमकीपत्रें तोषोनि हरि । प्रकट जाले कोण्डिन्यपुरीं । तें अवधारीं कुरुनाथा ॥१३॥कोमळ आमंत्रणीं म्हणे अंग । ऐसा मुचुकुंद अनुग्रहूनि सांग । इक्ष्वाकु अन्वयापत्य जो चांग । कृष्णें अव्यंग बोलिला ॥१४॥मग त्या कृष्णाचीं चरणकमळें । सम्यक् नमूनि स्नेहबळें । सप्रेमभावें स्रवती डोळे । जेंवि शरदब्जमुकुळें विकाशतां ॥१५॥वारंवार प्रदक्षिणा । करूनि लागे पुढती चरणां । अलोट जाणोनि श्रीकृष्णाज्ञा । सोडिलें वदना गुहेचिया ॥१६॥जैसा प्राग्गुहाउदयाद्रिवदना । पुर्सूनि सूर्य संचरे गगना । तैसा मुचुकुंद बदरीकानना । करी कां गमना तें ऐका ॥१७॥स वीक्ष्य क्षुल्लकान्मर्त्यान्पशून्वीरुद्वनस्पतीन् ।मत्वा कलियुगं प्राप्तं जगाम दिशमुत्तराम् ॥२॥परम क्षुल्लक मर्त्यजाति । तैशाच क्षुल्लका वनस्पति । जाळी गुल्मादिकांच्या पंक्ति । भूतळीं भासती अत्यल्पा ॥१८॥कुल्यातुल्य महासरिता । प्रजा वर्णादिस्वधर्मरहिता । दिव्यद्रुमीं निष्फलता । ऋद्धिवर्जिता महाकृषि ॥१९॥अल्पसा अल्पबळें । अल्पवृष्टि अल्पजळें । प्राणिमात्र क्षुत्क्शामविकळें । अल्पधैर्यें अल्पकें ॥२०॥ऐसें जाणोनि वर्तमान । भाविलें कळिकाळाचें चिह्न । मग मानसीं होऊनि उद्विग्न । केलें स्मरण कृष्णाचें झणें ॥२१॥कळिकाखाचा लागतां वारा । विकल्प झळंबेल अंतरा । म्हणोनि उत्तरेचिया मोहरा । त्वरें घाबिरा निघाला ॥२२॥परम पावन बदरीस्थान । नारायणाचें संनिधान । जेथीं लागतां सहज पवन । कलिमलदहन क्षणमात्रें ॥२३॥हृदयीं चिंतूनि तया ठाया । कोण्या प्रकारें नेमूनि काया । जातां जाला तें कुरुराया । परिसावया शुक बोधी ॥२४॥तपः श्रद्धायुतो धीरो निःस्म्गो मुक्तसंशयः ।समाधाय मनः कृष्णे प्राविशद्गंधमादनम् ॥३॥कृष्णें उपदेशिलीं जीं वचनें । श्रद्धापूर्वक विवरूनि मनें । म्हणे मज पूर्वीं मृगयाचरणें । जंतुहनन अघ घडलें ॥२५॥क्षात्रधम नृपराहटी । माजि घडल्या पातककोटि । तत्क्षाळणीं कृपाळु पोटीं । मज हे गोठी हरि वदला ॥२६॥एकाग्रचित्तें इंद्रियदमनें । मन्निष्ठ निष्काम तपाचरणें । उरल्या आयुष्यें अघसंहरणें । हें श्रीकृष्णें मज कथिलें ॥२७॥या वाक्याच्या अनुस्मरणें । श्रद्धापूर्वक अंतःकरणें । धैर्य धरूनि निःसंगपणें । संशयहननें दृढ जाला ॥२८॥निःस्पृह एकाकी वनवासी । कृच्छ्रादि नियम कायसे त्यासी । तपश्चर्या केली कैसी । ते अल्पसी अवधारा ॥२९॥काया वाचा आणि मन । त्रिविधतपश्चर्यासाधन । साधिता जाला इंद्रियगण । कृष्णार्पण करूनियां ॥३०॥सर्वभूतीं भगवद्भाव । यास्तव भूतीं सुहृत्स्नेह । जातिवैरें शरीरमोह । न करी रोह प्रज्ञेतें ॥३१॥नेदी भूतमात्रासि दुःख । तत्सुखीं शरीर अवंचक । देवब्रहमणप्राज्ञप्रमुख । सद्विवेकें उपासी ॥३२॥स्थावराहूनि सचेतनीं । मूर्खाहूनि वरिष्ठ ज्ञानी । जाणोनि तारतम्यकडसणी । समवर्तनीं सोत्साह ॥३३॥नमन मनाची अवक्रता । ब्रह्मचर्य ब्रह्मनिष्ठता । पूजन सर्वत्र अवंचकता । देहात्मता हारपली ॥३४॥ऐसें कायिक तप बाणलें । वाङ्मय कैसेम ठसावलें । तेंही जाईल निरूपिलें । अवधारिलें पाहिजे ॥३५॥भीकर न करी वर्णोचार । नामस्मरणीं प्रेमादर । नित्य नियम सदाचार । यथाधिकार श्रुतिपठन ॥३६॥स्तोत्रमंत्रसूक्तें स्मृति । निष्काम कृष्णस्तवनीं रती । वांचूनि सकाम न धरी हातीं । निगमपद्धति भवजल्प ॥३७॥सत्य सन्मात्र समदर्शन । प्रिय चिन्मात्र अभेद पूर्ण । हित मित आनंदाभिवर्धन । वाड्मय सगुनब्रह्मगिरा ॥३८॥कृष्णावेगळा नाहीं गुरु । कृष्णें अनुग्रह केला सधरु । कृष्न परब्रह्म निर्विकार । हा निर्धार चमत्कृत ॥३९॥देखिलें सगुण श्रीकृष्णध्यान । ध्यानयोगें वेधलें मन । अध्यस्त मोडलें भवभान । जालें उन्मन ध्यानसुखें ॥४०॥बाह्येंद्रियांची कुसमुस । उपरम पावली निःशेष । सच्चिदानंदप्रकाशक । भवभमलेशवर्जित जो ॥४१॥श्रद्धायुक्त हे तपोनिष्ठा । साधितां बाणोनि ठेली काष्ठा । भजन शिक्षिता शरीरचेष्टा । प्रारब्धच्छंदें चेष्टतीं ॥४२॥धीर धृतिमंत शीतोष्णसहनीं । धिषणा प्रगल्भ आत्मचिंतनीं । अभेदबोधें निरभिमानी । निःसंग मौनी निर्मम पैं ॥४३॥आत्मप्रत्यय दृढ बाणला । निर्मुक्त निःसंशय दादुला । दैवसंस्कारें भ्रमत गेला । गंधमादनगिरीप्रति ॥४४॥गंधमादन म्हणसी कोण । जो हिमाद्रीचा दक्षिणचरण । सेतुबंधनीं स्थापिला सानु । प्रथमांभी हेथील ॥४५॥यालागिं अद्यापि रामेश्वरीं । गंधमादनपर्वतोच्चारीं । सर्वकर्मीं द्विजवैखरी । प्रयोगपठनीं प्रशस्ता ॥४६॥असो ऐसिये गंधमादनीं । नरनारायणनिवासस्थानीं । पावोनियां मुचुकुंदमुनि । बदरीकाननीं स्थिरावला ॥४७॥बदर्याश्रममासाद्य नरनारायणालयम् । सर्वद्वंद्वसहस्तत्र तपसाराधयद्धरिम् ॥४॥तया बदरिकाश्रमाच्या ठायीं । द्वंद्वसहिष्णु धैर्य देहीं । तनुवाड्मानसतपः प्रवाहीं । श्रीकृष्ण हृदयीं आराधी ॥४८॥ऐसा मुचुकुंद तपोनिष्ठ । ध्यानाभ्यासें चित्सुखाविष्ट । जंववरी होय तनुशेवट । तंववरी द्रढिष्ठ राहिला ॥४९॥इतकें मुचुकुंदाख्यान । जे नर भावें करिती श्रवण । त्यांचीं पातकें होती दहन । विघ्नें भंगून हरि रक्षी ॥५०॥यावरी कृष्णाकडील कथा । कालयवनाच्या करूनि घाता । अनुग्रहूनि मान्धातृसुता । निघाला त्वरिता तें ऐका ॥५१॥भगवान्पुनराव्रज्य पुरीं यवनवेष्टिताम् ।हत्वा म्लेच्छबलं निन्ये तदीयं द्वारकां धनम् ॥५॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । तो प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवान । मुचुकुंदातें अनुग्रहून । आला परतोन मथुरेसी ॥५२॥तंव म्लेच्छसेना मथुरापुरी । दुर्ग रोधूनि राहिली फेरीं । य़ंत्रगोळाच्या महामारीं । भिडती निकरीं दुर्गेंसी ॥५३॥दुर्गामाजि सहस्रफणी । तो बलराम मुसलपाणि । मारी म्लेच्छाचिया श्रेणि । शतायुतघ्नीमहायंत्रीं ॥५४॥तंव झळकला पीतांबर । आला जाणोनि कमलावर । केला दुर्गस्थीं जयगजर । राम बाहीर निघाला ॥५५॥रामकृष्ण प्रतापतरणि । मिनले प्रळयभंजनाग्नि । तृणनिचयासम म्लेच्छसैन्यीं । भस्म करीत चालिले ॥५६॥स्मरतां स्मरतां तें स्वायुधें । प्राप्त जाळीं स्मरणसिद्धें । निशितें तेजस्वी स्वतःसिद्धें । सन्नद्ध बद्धें समर्म्गीं ॥५७॥मुसळघातें लोळवी वीरां । रणीं पाडिल्या सैन्यधुरा । शार्ङ्गजाकृष्ट सुटतां शरा । शिरें अंबरां उसळती ॥५८॥दीन दीन शब्दें एक । दीनवदनें दीनात्मक । दैन्य भाकिती पैं तुरुष्क । अद्यापि देख ते स्मरति ॥५९॥बलराम मारीत आला आला । प्राणधाकें जो कोल्हाळ केला । अद्यापि त्यां तो संस्कार उरला । अल्ला अल्ला स्मरताती ॥६०॥रामकृष्णांचा वीरश्रीमद । देखोनि म्हणती महामद । ऐसे तत्समयींचे जे शब्द । ते मंत्र विशद यवनांचे ॥६१॥र्हस्वदीर्घ जडता वर्णा । ते प्राणभयाची बोबडी वदना । ज्या उच्चारें रक्षिलें प्राणा । तो मंत्र जाणा तद्वंशीं ॥६२॥चक्र प्रेरितां चक्रपाणि । रणीं पडिल्या म्लेच्छश्रेणि । कित्तेकीं देखोनि प्राणहानि । शस्त्र सांडूनि पळालीं ॥६३॥एक विलपती क्षतीं रणीं । एक अक्षतचि प्रेतावगणी । घेनि लोळतां रणमेदिनी । नेत्र झांकोनि जीवभयें ॥६४॥एक पडिले प्रेतभार । त्यांचे होऊनि मक्षिकावार । दीन दीन कृतोच्चार । टुकडा वस्त्र याचिती ॥६५॥घायाळ जळार्थ आक्रंदून । पिपासाभूत त्यजिती प्राण । पी र पी र म्हणतां जाण । पीर करून बैसले ॥६६॥ताक पी र पेंड पी र । ताडी माडि सिंदी पी र । ऐसे अनेक नामोच्चार । केले पीर स्थळोस्थळीं ॥६७॥ऐसें मारूनि यवनसैन्य । विजयी प्रतापी रामकृष्ण । म्लेच्छकटकींचें नग्नीकरण । द्वारके तें धन चालविलें ॥६८॥म्लेच्छलुंठन नेतां ऐसें । अकस्मात मगधाधीशें । मध्यें विघ्न केलें कैसें । तेंही परिसें कुरुवर्या ॥६९॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP