मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५२ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ५२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ अध्याय ५२ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर एवं संपृष्टसंप्रश्नो ब्राह्मणः परमेष्ठिना । लीलागृहीतदेहेन तस्मै सर्वमवर्णयत् ॥३६॥ऐकोनि कृष्णमुखींची गोठी । द्विजें बांधिली शकुनगांठी । हरिखें वोसंडला सृष्टी । आनंद पोटीं न समाये ॥५७५॥विदर्भदेशीं राजा भीमक । जैसा वैराग्यामाजि विवेक । भागवतधर्मी अतिधार्मिक । शुद्धसात्विक सत्त्वाचा ॥७६॥त्याची कन्या चिद्रत्न । लावण्यगुणी नवनिधान । सकळभूषणा भूषण । जें मंडन तिहीं श्लोकें ॥७७॥उदार धीर गुणगंभीर । सज्ञान ज्ञानें अतिचतुर । तुझ्या ठायीं अतितत्पर । कलत्रभावें विनटली ॥७८॥पित्यानें तुम्हांसि दिधली वधू । ऐकोनि हांसिला गोविंदु । हरिखें न सांभाळे स्वानंदु । द्विजासि क्षेम दीधलें ॥७९॥जें कृष्णाच्या पोटीं । तेचि सांगीतली गुह्यगोठी । जीवीं जिवा पडली मिठी । पाठी थापटी द्विजाची ॥५८०॥आणीक आहे संवादु । तीचा ज्येष्ठ बंधु विरुद्धु । तेणें शिशुपाळा दिधला शब्दु । लग्न परवां धरिलेसें ॥८१॥येचिविषयीं यदुनायका । आहे भीमकीची पत्रिका । ते वाचूनियां सविवेका । कार्यसिद्धि करावी ॥८२॥मग काढिली पत्रिका । कुंकुममंडित सुरेखा । धीर न धरवेचि हरिखा । आवडी देखा चुंबिली ॥८३॥पत्रिका देखोनि कृष्णनाथ । श्रवणाथ आर्तभूत । एका जनार्दना विनवित । पत्रिकार्थ परिसावा ॥८४॥इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवर एकाकार टीकायां पत्रिकार्पणं नाम तृतीयप्रसंगः ॥३॥ॐ नमो जी यदुवीरा । तूं निर्विकार नोवरा । मज न्यावें निजमंदिरा । क्रोधादि असुरां दमूनियां ॥५८५॥मज वडील माझा बंधु । जेणें त्जसीं विमुख बोदु । ज्याचेनि नीचासिं संबंधु । न मरूनि वधु करावा ॥८६॥ऐका भीमकीची व्युत्पत्ति । पत्र लिहिलें चौथें भक्ति । वाचितांचि भक्तपति । सहजस्थिती धांविन्नला ॥८७॥रुक्मिण्युवाच - श्रुत्वा गुणान्भुवनसुंदर श्रृण्वतां ते निर्विश्य कर्णविवरैर्हरतोंऽगतापम् ।रूपं दृशांदृशिमतामखिलार्थलाभं त्वय्यच्युताविशति चित्तमपत्रपं मे ॥३७॥ऐकें त्रैलोक्यसुंदरा । सकळसौंदर्यवैरागरा । तुझेनि सौंदर्यें सुरनरां । सुंदरत्वें वर्णिजे ॥८८॥तुझी सुधाकर कीर्ति । श्रवणें श्रवणा प्रकाशिती । त्रिविध ताप अस्त पावती । जेंवि गभस्ति खद्योतां ॥८९॥ऐसियाची स्वरूपप्राप्ति । चार्ही शक्ति दासी होती । सकळ स्वार्थ पायां लागती । जें देखती त्यां निजलाभ ॥५९०॥क्षयो नाहीं गा निश्चित । यालागीं नांवें तूं अच्युत । तुझ्या ठायीं निर्ल्लज्जचित्त । अतिसुरत कृष्णसुखा ॥९१॥का त्वा मुकुंद महती कुलशीलरूपविद्यावयोद्रविणधामभिरात्मतुल्यम् ।धीरा पतिं कुलवती न वृणीत कन्या काले नृसिंह नरलोकमनोभिरामम् ॥३८॥मनोविश्रान्तीचा निजबोधु । त्यालागीं नामें तूं मुकुंदु । सकळ सुखावा आनंदकंदु । तुज कोण वधू वरीना ॥९२॥कुळ शील सधन रूप । विद्यावयसा अतिस्वरूप । शान्ति दान्ति तेज अमूप । करिती तप तुजलागीं ॥९३॥ऐसी लावण्यगुणसंपत्ति । धीरावती आणि सती । त्याही वरा तुज न पवती । तेथ मी किती वराक ॥९४॥ऐसें नरवीर पंचानना । प्राप्तकाळ पाणिग्रहणा । तुज कोण वरीना अंगना । मनमोहना श्रीकृष्णा ॥५९५॥म्हणसी सोयरा मी अति काळा । कां बोलाविसी विवाहमेळा । पाणिग्रहण शिशुपाळा । तो काळ अति काळा मजलागीं ॥९६॥ते काळीं तां नुपेक्षावें । हेंचि मागें जीवें भावें । मज दीनातें उद्धरावें । धांवें पावें लग्नासी ॥९७॥तन्मे भवान्खलु वृतः पतिरंग जायामात्मार्पितश्च भवतोऽत्र विभो विधेहि ।मा वीरभागमभिमर्शतु चैद्य आराद्गोमायुवन्मृगपतेर्बलिमंबुजाक्ष ॥३९॥मनें वाचा काया । निर्धारेंसीं तुझी जाया । मी जालें असें यदुराया । विधिविवाहा तुवां कीजे ॥९८॥तूं तंव परमात्माप्रकृति । नावडे स्त्रियांची संगति । उपेक्षिसी माझी विनति । थोर अपकीर्ति तुज होईल ॥९९॥मी तंव तुझें अर्धांग । केंवि शिशुपाल शिवे माझें आंग । तूं शिरावरी असतां श्रीरंग । मी वीरविभाग यदुराया ॥६००॥कृष्णकेसरीची संपत्ति । चैद्यजंबुक जैं गा नेती । कमलनयना कमलापति । थोर अपकीर्ति तुज तेव्हां ॥१॥पूर्तेष्टदत्तनियमव्रतदेवविप्रगुर्वर्चनादिभिरलं भगवान्परेशः ।आराधितो यदि गदाग्रज एत्य पाणिं गृह्णातु मे न दमघोषसुतादयोऽन्ये ॥४०॥तरीच साधेल हें लग्न । जरी म्यां केलें असेल भगवद्भजन । ब्रह्मभावें ब्राह्मणपूजन । देवतार्चन हरीचें ॥२॥इष्ट जें कां यागादिक । बापी कूप आराम देख । गोभूरत्नदानादिक । त्याहूनि अधिक अन्नदान ॥३॥व्रत जें कां एकादशी । पूजाविधान जागरणेंसीं । ब्राह्मणभोजन द्वादशीसी । भगवंतासि वालभ ॥४॥सकळधर्माचाही धर्म । सद्गुरु तोचि परब्रह्म । ऐसा केला असेल नेम । पुरुषोत्तम तरि पावो ॥६०५॥व्रत तप यज्ञ दान । त्याहूनि अधिक हरीचें ध्यान । निमेषामाजि समाधान । अमन मन होऊनि ठाके ॥६॥ऐसेनि साधनें साधिला बोधु । तरी गद जयाचा धाकुटा बंधु । वेगें येऊनियां गोविंदु । पाणिग्रहण मज करू ॥७॥परादिवाचा नव्हे सौरस । यालागिं नांवें तूं परेश । भेमकीलिखितें हृषीकेश । तटस्थ होऊनियां ठाके ॥८॥मज कृष्णें नेलियापाठीं । मागें शिशुपाळाच्या पाटीं । बैसेल अवकळा गोमटी । दोघां गांठी एकची ॥९॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP