मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५२ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ५२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ अध्याय ५२ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर संतुष्टो यदि वर्तेत ब्राह्मणो येनकेनचित् ।अहीयमानः स्वाद्धर्मात्स ह्यस्याखिलकामधुक् ॥३१॥ब्रह्मवेत्ता सुब्राह्मण । सदा संतुष्ट ज्याचें मन । दैवोपलब्धमात्रेंकरून । स्वधर्माचरण जो न टकी ॥६३॥तो धर्मचि त्यालागून । दुभे जैसी कामधेनु । न लगे अनेक विधिविधान । फळती संपूर्ण मनोरथ ॥६४॥ऐसा संतुष्ट स्वधर्मपर । ब्राह्मण विश्वकल्याणकर । सर्वकामें समस्त सुर । पोषक साचार कामदुधा ॥५६५॥असंतुष्टोऽसकृल्लोकानाप्नोत्यपि सुरैश्वरः । अकिंचनोऽपि संतुष्टः शेते सर्वांगविज्वरः ॥३२॥असोनि इंद्राची संपत्ति । तृप्ति नाहीं ज्याच्या चित्तीं । ते अतिशयें दुःखी होती । विटंबिजति संसारे ॥६६॥असोनियां अकिंचन । ज्याचे वृत्तीसी समाधान । अजिता मातें जिंतिलें जाण । बंदिजन आम्ही त्याचे ॥६७॥विप्रान्स्वधर्मसंतुष्टान्साधून्भूतसुहृत्तमान् ।निरहंकारिणः शांतान्नमस्ये शिरसाऽसकृत् ॥३३॥सर्वभूतीं भगवद्भावो । यावरी स्वधर्मनिष्ठ जो भूदेद्वो । त्यांचिया पाउलां पाउलीं पहा वो । मे सर्वाङ्ग वोडवीं ॥६८॥ऐसिये निष्ठेचे ब्राह्मण । ते मज सदा पूज्य जाण । त्यांचे नमस्कारी चरण । वारंवार मस्तकीं ॥६९॥कृष्णदर्शनें समाधान । ब्राह्मणासि पडिलें मौन । विसरला कार्याची आठवण । जाणोनि प्रश्न हरि करी ॥५७०॥कच्चिद्वः कुशलं ब्रह्मन्राजतो यस्या हि प्रजाः । सुखं वसंतिविषये पाल्यमानाः स मे प्रियः ॥३४॥कोठूनि येणें जालें स्वामी । कवण ग्राम कवण भूमि । तुमचे देशींचा देशस्वामी । प्रजा स्वधर्मीं पाळी कें ॥७१॥यतस्त्वमागतो दुर्गं निस्तिर्येहयदिच्छया ।सर्वं नोब्रूह्यगुह्यं चेत्किं कार्यं करवामते ॥३५॥दुर्गम मार्ग अतिसंकटीं । क्रमूनि आलेति आमुचे भेटी । कोण इच्छा आहे पोटीं । ते गुह्य गोठी सांगावी ॥७२॥आम्ही केवळ ब्राह्मणभक्त । आज्ञा करणें हें उचित । काय अपेक्षी तुमचें चित्त । तें मे निश्चित करीन ॥७३॥कवण कार्याचिये विधि । तूं आलासि कृपानिधि । ते जालीच कार्यसिद्धि । जाण त्रिशुद्धि सर्वथा ॥७४॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP