मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५२ वा| आरंभ अध्याय ५२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ अध्याय ५२ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीकृष्णपरमात्मने नमः ॥जय जय जनार्दन जगदाभरण । जगदखिलाद्वयकल्याण । जगदात्मकत्वें विराजमान । भिन्नाभिन्न गोगोप्ता ॥१॥एवं गोविंद चिन्मात्रैक । चिद्विलासप्रकाशक । अभेदबोध नमनात्मक । पूर्णशशाङ्क दयार्णवीं ॥२॥गगनीं जीवनीं सबाह्य शुध । एकात्मतेचा अभेदबोध । धवलौनि उथळे भजनानंद । अभेदीं भेदरोचक जो ॥३॥शब्दश्रवण गगन एक । किंवा वायु स्पर्शत्वक । चक्षु रूपा प्रकाशक । अभेद अचूक तेजचि ॥४॥रसरसज्ञा द्विधा जळ । कीं गंधघ्राण भू केवळ । भेदें परस्परां सापेक्ष मेळ । प्रेमकल्लोळ उपजवी ॥५॥तेंवि अभेदीं भावूनि भेद । भजतां गुरुवरपादारविंद । प्रेमळा फावे चिन्मकरंद । जाणती स्वाद तद्रसिक ॥६॥तया सप्रेमरसेंकरोन । गुर्वाज्ञेचें अनुशासन । वंदूनि यथामति व्याख्यान । आदरिलें तें अवधारा ॥७॥एकावन्नव्या अध्यायीं यवन । मुचुकुंदक्षोभें भस्म करून । दिधलें मुचुकुंदा वरदान । पबोधून तप्श्चर्या ॥८॥जन्मान्तरीं द्विजाग्रणी । सर्वात्मकत्वें समदर्शनी । होऊनि मदैक्यता निर्वाणीं । लाहसी म्हणोनि हरि वदला ॥९॥पुढें मुचुकुंदाची कथा । पुसावयाची नृपासि आस्था । जाणोनि सर्वज्ञ श्रीशुकवक्ता । म्हणे कुरुनाथा अवधारीं ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP