मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५० वा| श्लोक ४६ ते ५० अध्याय ५० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५७ अध्याय ५० वा - श्लोक ४६ ते ५० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४६ ते ५० Translation - भाषांतर यवनोऽयं निरुंधेस्मानद्य तावन्महाबलः । मागधोऽप्यद्य वा श्वो वापरश्वो वाऽऽगमिष्यति ॥४६॥बळभद्रातें म्हणे हरि । आजि हा यवन मथुरापुरीं । आम्हां यादवांतें चौफेरीं । रोधूनि नगरीं राहिलल ॥२७॥यासि करावें समरांगण । तरी हा आम्हांसि दुर्जय पूर्ण । कथूनि गेला विधिनंदन । अजिंकपण पैं याचें ॥२८॥येणें रोधिलें असतां आम्हां । तंव महाबळिष्ठ मागधनामा । आजि उदियां परवां नेमा । क्रूर संग्रामा येईल ॥२९॥तेवीस अक्षौहिणी वीर । सेना भयंकर महाघोर । संधि साधूनि जराकुमर । येत्तां दुस्तर यदुचक्रा ॥४३०॥दादो दुस्तर म्हणसी कैसें । तेंही कथितों मी समासें । तुम्ही विवरूनि निजमानसें । सांगा कैसें निस्तरिजे ॥३१॥आवयोर्युध्यतोरस्य यद्यागंता जरासुतः । बंधून्वधिप्यत्यथवा नेप्यते स्वपुरं बली ॥४७॥मथुरेबाहीर उभय बंधु । करूं जातां यवनवधु । तंव मधें आलिया जरासंधु । महाविरुद्ध यदुवंशा ॥३२॥नगरी भंगील सेनाबळें । स्वबंधु यादव वधील सगळे । किंवा बांधोनि बंधनमाळे । नेईल यदुकुळें निजनगरा ॥३३॥सतरा वेळ साधिलें यश । तैं तें सर्वही होईल फोस । ऐसें सांगूनि बळभद्रास । मंत्र विशेष हरि बोधी ॥३४॥तस्मादद्य विधास्यामो दुर्गं द्विपददुर्गमम् ।तत्र ज्ञातीन्समाधाय यवनं घातयामहे ॥४८॥प्राप्त संकट दोहींपरी । यास्तव आजि तत्परिहारीं । उपाय कथितों तो अवधारीं । म्हणे मुरारि ज्येष्ठातें ॥४३५॥द्विपदां दुर्गम सिंधूमाजि । दुर्ग निर्मूनि आम्ही आजी । यदुकुळाची गोत्रराजी । स्थापूनि त्यामाजि सकुटुंबी ॥३६॥मग यवनाचा करूं वध । मध्यें आलिया जरासंध । यादवहननाचा प्रबंध । तैं त्या अगाध सहजेंचि ॥३७॥इति संमंत्र्य भगवान्दुर्ग द्वादशयोजनम् ।अंतःसमुद्रे नगरं कृत्स्नाऽद्भुतमचीकरत् ॥४९॥ऐसा बलरामेंशीं मंत्र । विवंचूनियां जगन्मित्र । षड्गुणैश्वर्य स्वतंत्र । शौरिपुत्र श्रीभगवान् ॥३८॥ब्रह्मांडसाम्राज्यपट्टाभिषेक । करूनि गेले अमरेंद्रप्रमुख । तैं त्या भगवंतें उल्लेख । कार्योन्मुख जो कथिला ॥३९॥तोचि कार्यभाग ये समयीं । षड्गुणसंपन्न शेषशायी । चिंतिता झाला आपुले हृदयीं । दुर्गनवायी अगम्या ॥४४०॥श्रीकृष्णाच्या चिंतनमात्रें । विश्वकर्म्यानें स्वशिल्पसूत्रें । दुर्गम दुर्ग केलें नेत्रें । पाहतां वक्त्रें न वर्णवे ॥४१॥महदाश्चर्यें जें ब्रह्मांडीं । तितुकीं ज्यामाजि दिसती उघडीं । ऐसिया दुर्गाची परवडी । न भरतां घडी उभारिली ॥४२॥द्वादश योजनें पृथक्पृथक् । चतुर्दिक्षु चार्ही भाग । गगनचुंबित दुर्गम दुर्ग । निर्मिलें निलाग जलधींत ॥४३॥द्वादश योजनें दुर्गम दुर्ग । परिखास्थानीं सिंधु साङ्ग । यास्तव सुरासुरां निलाग । करवी श्रीरंग संकल्पें ॥४४॥समुद्रामाजि दुर्ग दुर्गम । त्यामाजि नगरी द्वारकानाम । विश्वकर्म्याचें कौशल्यकर्म । जेथ निःसीम शोभतसे ॥४४५॥चौंश्लोकीं ते दुर्गरचना । शुकें वर्णिली सूत्रसूचना । देशभाषेच्या तद्व्याख्याना । करितां श्रवणा विलोकिजे ॥४६॥दृश्यते यत्र हि त्वाष्ट्रं विज्ञानं शिल्पनैपुणम् ।रथ्याचत्वरवीथीभिर्यथावास्तु विनिर्मितम् ॥५०॥श्रीकृष्णाच्या इच्छामात्रें । जठरस्थलरत्नें भूरत्नाकरें । उच्छ्रित विस्तृत सर्वोपचारें । दुर्गार्थ आदरें प्रयोजिलीं ॥४७॥हरिसंकल्पें विश्वकर्मा । सदुर्ग द्वारका वैकुंठसद्मा । समान निर्मी कुरुसत्तमा । हेमललामा मणिबद्धा ॥४८॥द्वारकानगर निर्मिलें कैसें । यथोक्त वास्तुशास्त्रीं जैसें । विश्वकर्म्याचें चातुर्य दिसे । सर्व आपैसें जननयना ॥४९॥पूर्वपश्चिम सलंब सूत्रें । उत्तरदक्षिण तिर्यक् अपरें । नगरगर्भीं यथाशास्त्रें । चौक चौबारे साधिले ॥४५०॥छप्पन्न विनायकदेहळी । दुर्गाभंवते प्रथम्म पवळी । निर्मिलें माणिक्यप्रवाळीं । कौशल्यशाळी त्वष्टारें ॥५१॥दुर्ग दुर्गम पुरटघटित । अमूल्यवैडुर्यमणींचें जडित । चरया शोभती गगनाआम्त । शशिभास्वत लोपविती ॥५२॥संकर्षण जो अनंतफणी । एके मौळीं धरूनि धरणी । अपर उभविले श्रीकृष्णभुवनीं । चरया करूनि दुर्गाग्रीं ॥५३॥किंवा गरुडध्वज मुरारि । शयनीं शेष अनंतशिरीं । हरिप्रसादें करूनि मित्री । पाहे नेत्रीं खगकेतु ॥५४॥शेषमौळींचें अमूल्य मणि । तेंवि सकलशा चरयाश्रणी । गगनगर्भीं भासुर किरणीं । अनेकतरणींसम गमती ॥४५५॥दुर्गाभोंवते स्वयंभ हुडे । त्वाष्ट्रनिर्मितबहुदेहुडे । महाद्वारींचे कपटजोडे । कुलिशापाडें दृढ कठिन ॥५६॥मेरुशृंगीं रत्नाचळीं । क्रकचकृंतिका वैडूर्यशिळीं । सरळ सोज्वळ रत्नझळाळी । गोपुरें देहळी त्वाष्ट्रकृता ॥५७॥क्कचित चौकटी मारकता । क्कचित स्फटिका विशाळ श्वेता । क्कचित पद्मरागादिरक्ता । क्कचित असिता नभनीळा ॥५८॥ऊर्ध्वपट्टिके विनायक । माणिक्यमणींचे रम्य सुरेख । दुर्गा भैरव द्वय विशाख । कूर्मकीर्तिमुख उदुंबरीं ॥५९॥रत्नीं रेखिल्या कमलवल्ली । गमती पाचपत्रें कोंवळीं । पुष्कराजाच्या हेमकमळीं । सुनीळनाळीं विराजती ॥४६०॥माणिक्यमणींचीं रातोत्पळें । शक्रायुधांचीं श्वेतोत्पळें । सोमकांतांचीं कुमुदोत्पळें । निरखितां डोळे निवताती ॥६१॥चौकटीचिया उभयभागीं । लिखितपुत्रिका ललामरंगीं । यूनायुवतींच्या प्रसंगीं । मानस भंम्गी स्मरबाणें ॥६२॥रत्नीं रेखिलीं सर्वतोभद्रें । सुरंग स्वस्तिकें गमती आर्द्रें । सुरनरचित्रें पैं उन्निद्रें । मुकुलितमुद्रे सम नयन ॥६३॥तिग्म तिरळा रत्नज्योति । तेणें चंचळ नेत्रापातीं । प्रस्फुरितां अधरदंतीं । वाक्यें वदती तेंवि गमे ॥६४॥वज्रकपाटीं शंकु कठिन । वर्जमणींचे प्रकाशमान । नोहे कळिकाळा आंगवण । द्वारलंघन करावया ॥४६५॥द्वारपाळाच्या बैठका । रत्नजडिता रम्य सुरेखा । पाटांगणीं पाचभूमिका । महाद्वारीं बहिर्देशीं ॥६६॥ऐसीं सर्वत्र महाद्वारें । उच्च विस्तीर्ण विशाळतरें । शृंगें शिखरें रत्नगोपुरें । दिव्यांबर्बें ध्वजदंडी ॥६७॥खणोखणीं दिव्य वितानें । चित्र चाहुरिया वोटंगणें । पिंजरां पक्षी करिती पठनें । नामस्मरणें सहस्रशा ॥६८॥गोपुरकलशीं पाचप्रभा । चंचळ दूर्वांकुरांची शोभा । कोमळ भावूनि कवळलाभा । उच्चैःश्रवा झेंपावे ॥६९॥शिखरातळीं गोपुरनिडळीं । गोमेदमाणिक्यमणींच्या आवळी । शुकसारिका जंबुफळीं । कवळलोलुपा तळपती ॥४७०॥कमळवल्ली आमोदप्रचुर । भावें भवंते भ्रमती भ्रमर । ऐसी कौतुकें आश्चर्यकर । निर्मी त्वष्टा महाद्वारीं ॥७१॥हुडांहुडां दुर्गवप्रीं । चंडपताका गगनोदरीं । फडकती यशलक्ष्मी श्रीहरि । सूचिती हारी अरिवर्गा ॥७२॥अष्टौ प्रहर मुक्त कपाटें । सुभटद्वारपाळांचीं थाटें । भगवच्चरितें पढती पाठें । यश ऊर्जितें गुणनामें ॥७३॥दुर्गाभंवतें महाप्रबळ । परिधीभूत अगाध जळ । करिती यादोगण कल्लोळ । गर्जे विशाळ जळराशि ॥७४॥अंतःपरिधी लघुलघुतर । दुर्गशोभार्थ परम रुचिर । विश्वकर्म्याचें कौशल्यसूत्र । संकल्पमात्रें कृष्णाच्या ॥४७५॥ऐसिया दुर्गमदुर्गान्तरीं । परम विचित्र द्वारकापुरी । शिल्पविधाता निर्माण करी । न पवे समसरी वैकुंठ ॥७६॥चौर्यांसीं सहस्र त्रिलक्ष महा । उपरि एकैक हस्त पहा । आयाम तिर्यक् तत्परिणाहा । गणूनि आय साधिले ॥७७॥पुरवास्तूसि सिंहआय । ध्वजाढ्य विप्रालयसमुदाय । मृगेंद्रआयें क्शात्रनिचय । वृषभआय वैश्यगृहां ॥७८॥कुंजरआय राजसदना । शुनकआय गणिकाभुवना । ढंकआय देवतायतना । ध्वांक्ष मठादियतिगृहां ॥७९॥रासभआयीं शूद्रगृहें । पण्यें तत्संधिपरिणाहें । सामान्ययाती पल्लिकानिलयें । पुरीबाहीर दुर्गान्तरीं ॥४८०॥उत्तरभागीं विप्रागारें । पूर्वभागीं नृपमंदिरें । पश्चिमें वैश्यांचीं धवळारें । सदनें शौद्रें याम्यदिशे ॥८१॥राजमार्ग ते शृंगाट । पण्यवीथी वैश्यवाट। द्विभागीं सदनें शाळा नीट । रथ्यें निघोंट मध्यपथ ॥८२॥मध्यमार्गाच्या उभयपार्श्वीं । शाळांगणें चत्वरनांवीं । सूत्रें धरूनि साधिल्या भुवी । रत्नग्रावीं निबद्धा ॥८३॥उत्तरदक्षिण समान हारी । सर्वत्र वीथी नगरान्तरीं । पूर्वपश्चिम पाहतां नेत्रीं । शोभा साजिरी तत्समता ॥८४॥यथावास्तु निर्मित ऐसें । सूत्रप्राय बोलिलें व्यासें । भाषाव्याख्यानीं अल्पसें । उपलविलें तें न दुषिजे ॥४८५॥दुर्गगर्भीं ऐसी रचना । विश्वकर्म्याची कौशल्यसूचना । वनें जीवनें भवनें नाना । श्रवणें नयना अवगमती ॥८६॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP