मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५० वा| श्लोक १ ते ५ अध्याय ५० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५७ अध्याय ५० वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - अस्तिः प्रपतिश्च कंसस्य महिष्यौ भरतर्षभ । मृते भर्तरि दुःखार्ते ईयतुः स्म पितुर्गृहान् ॥१॥वशिष्ठमहर्षि विधिसंभव । शक्तिनामा वसिष्ठप्रभव । शक्तीपासूनि प्रादुर्भाव । महावैष्णव पराशुर ॥५१॥वसुवीर्यजा सत्यवती । वासवी ऐसें जीतें म्हणती । पराशरवीर्यें व्यासोत्पत्ति । जठरशुक्ति तयेचिये ॥५२॥अरणीसंभव व्यसतनय । तो हा श्रीशुक योगिवर्य । सिंहावलोकें कथान्वय । कथित होय कुरुकुळपा ॥५३॥कुरुकुळमकरालयकौस्तुभा । तव मति रतली पंकजनाभा । यास्तव हरिगुणकीर्ति शुभा । सत्संदर्भा अवधारीं ॥५४॥कंसें मरण चुकवावया । दुर्घट यत्न केले राया । ते सर्वहि गेले विलया । गंधर्वनिलया समसाम्य ॥५५॥कंसें जितुकें केलें कपट । कृष्णें भंगिलें तें निष्कपट । कांबिटकरटिमल्लांसगट । केला शेवट कंसाचा ॥५६॥अग्रज पावला देखोनि मरण । अनुजीं करितां समरांगण । स्पष्ट निमाले अष्टही जन । जाला श्रीकृष्ण वरविजयी ॥५७॥पुष्पवृष्टि करिती अमर । पुरजन करिती जयजयकार । तेणें कंसकामिनी घोर । दुःख दुस्तर पावलिया ॥५८॥उग्रसेना दिधलें राज्य । हर्षें यदुकुळ नाचे भोज । कंसमानिनी मानूनि लाज । जाल्या निस्तेज निर्दैवा ॥५९॥कृष्णें केलें समाधान । उत्तरक्रिया संपादून । तथापि त्यांचें सरोष मन । स्नेहें कृशान जेंवि क्षोभे ॥६०॥कंसें जाचिले यादव सर्व । विशेष देवकी आणि वासुदेव । उग्रसेन जो केला राव । तोही सदैव त्रासिला ॥६१॥कोण्या तोंडें तयापाशीं । काळ कंठिजे अहर्निशीं । कांतमरण प्रतिकाराशी । निजमानसीं उद्युक्ता ॥६२॥रामकृष्णांचा व्रतबंध । जेणें त्रिजगीं परमानंद । तये संधीमाजीं मागध - । सदना प्रसिद्ध त्या गेल्या ॥६३॥अस्ति प्राप्ति दोघीजणी । सहित कंसाच्या अनुजपत्नी । वेष्टित स्वकीयपरिवारगणीं । मागधभुवनीं प्रवेशल्या ॥६४॥पट्टमहिषी कंसाचिया । अस्ति प्रपति मागधतनया । भर्तारमरणदुःखें काया । जळती उभिया सचेतना ॥६५॥निजजनकाच्या गृहाप्रति । जात्या जाल्या ऐसिये रीति । भरतश्रेष्ठा परीक्षिति । काय त्या करिती तें ऐकें ॥६६॥पित्रे मगधराजाय जरासंधाय दुःखिते । वेदयांचक्रतुः सर्वमात्मवैधव्यकारणम् ॥२॥मगधविषयप जरासंध । जनक कैपक्षी सुस्निग्ध । त्यातें समूळ दुःखकंद । वदती विशद दुःखार्ता ॥६७॥आपुलें वैधव्यकारण । गगनवाणी मुखें करुण । कथित्या जाल्या कंसमरण । कपटाचरण वृष्णींचें ॥६८॥गगनवाणी ऐकोनि कंस । वधीत होता देवकीस । तैं वसुदेवें दिधली बहष । स्निग्ध विश्वास दाखविला ॥६९॥अष्टही गर्भ देवकी उदरीं । होतां अर्पीन तुझिये करीं । वैरानुबंधें त्यांतें मारीं । देवकी न मारीं भोजेन्द्रा ॥७०॥अंतरीं निर्मळ भोजपति । स्नेहविश्वास धरिला चित्तीं । कपटी वसुदेव दुर्मति । विश्वासघातकी दुष्टात्मा ॥७१॥तेणें रोहिणी निज सुंदरी । जाली जाणोनि गुरूदरी । नेऊनि ठेविली नंदाघरीं । जीचे जठरीं बळ जाला ॥७२॥अष्टमगर्भाची प्रसूति । कृष्णनभोऽष्टमीमध्यरातीं । देवकीसी पुत्रप्राप्ति । जाणोनि दुर्मति वसुदेव ॥७३॥पुत्र नेऊनि नंदसदनीं । ठेवूनि आणिली तन्नंदिनी । कंसाहस्तीं ते अर्पूनी । साधुत्वकरणी दाखविली ॥७४॥व्रजीं वाढले रामक्रुष्ण । तिहीं क्म्साचे घेतले प्राण । राज्यीं स्थापिला उग्रसेन । वैधव्यदान अम्हां केलें ॥७५॥इतुकें आमुचें वैधव्यबीज । मागधराया कथिलें तुज । आमुचे शिरीं तूं प्रतापपुंज । असतां वोज हे आमुची ॥७६॥आम्ही नेणतीं तव लेंकुरें । यादवीं आम्हां गांजिलें निकरें । ताता आमुच्या कैवारें । निवटीं शिरें वैर्य़ांचीं ॥७७॥इत्यादि शोकें आक्रंदती । दीनवदनें ग्लानि करिती । भू भिजवूनि अश्रुपातीं । मूर्च्छित पडती दुःखार्ता ॥७८॥दुहितदुःखें मागधपति । कळवळूनि क्षोभला चित्तीं । तें तूं ऐकें परीक्षिति । म्हणे सुमति शुकयोगी ॥७९॥स तदप्रियमाकर्ण्य शोकामर्षयुतो नृप । अयादवीं महीं कर्तुं चक्रे परममुद्यमम् ॥३॥प्रतापमार्तंड मगधपाळ । दुहितादुःख ऐकोनि सकळ । परमशोकें केला विकळ । जाला केवळ कंसपर ॥८०॥आठवी कंसाचें चातुर्य । गुण लावण्य वीर्य शौर्य । धैर्य स्निग्धता ऐश्वर्य । मानी अकार्य दुहितांचें ॥८१॥क्षणैक पडिला शोकावर्तीं । तंव क्षोभली आवेशवृत्ति । चित्तीं आठवला श्रीपति । म्हणे दुर्मति गोरक्ष ॥८२॥सिंहाचिये जिह्वेसी दंश । मूषकें करूनि मानिला तोष । आतां निर्मूळ यादववंश । करीन निःशेष निःशल्य ॥८३॥मागधकाळकृतांतकवे । महेंद्र महत्त्वें सांडी हावे । तेथ मशकें वृष्णियादवें । भणगे निर्दैवें म्रियमाणें ॥८४॥क्षणक्षणा कंसपर । दुःख आठवी वारंवार । नधरत शोकनदीचा पूर । भ्रमवी अंतर आवर्ती ॥८५॥कुमरी सुकुमारा सुंदरा । केंवि पावती दुःखाब्धिपारा । सकळ सौभाग्या पडिला चिरा । हा शंकरा काय केलें ॥८६॥माझीं नेणतीं तान्हुलीं । मज देखतां अनाथें जालीं । यदुकुळाची करीन होळी । कर पद चोळी सक्रोधें ॥८७॥हृदय पिटूनि रडती दांत । श्मश्रु मिळूनि चोळी हात । यदुकुळाचा पुरला अंत । क्षोभला कृतांत मम रूपें ॥८८॥ऐसा शोकामर्षयुक्त । यादवनिर्दळणा उद्युक्त । प्रधान सैनिक सेनानाथ । करवी एकांत समरार्थ ॥८९॥कंसाचिया अनुजपत्नी । तातसदना पाठवी यत्नीं । त्यांचें जनक आरब्धप्रयत्नी । करी अभिमानी तद्द्वारा ॥९०॥जे जे स्ववश माण्डलिक । ससामंत प्रतापार्क । आज्ञापत्रें त्यां सम्यक । आदरपूर्वक आणवी ॥९१॥स्वसेनेचे यूथपति । गज रथ तुरंगम पदाति । सज्जूनि मागध कोणे रीति । निघे युद्धार्थी तें ऐका ॥९२॥अक्षौहिणीमिर्विशत्या तिसृभिश्चापि संवृतः । यदुराजधानीं मथुरां न्यरुणत्सर्वतोदिशम् ॥४॥गणक ज्योतिषी सिद्धान्तवक्ते । मुहूर्त विवरूनि त्यांचेनि मतें । फल्गुतटाके पश्चिमप्रांतें । प्रस्थानशिबिरें उभविलीं ॥९३॥रथ सज्जिले केतुमंत । रथी सारथि अश्वयुक्त । शस्त्रास्त्रसमृद्धिसमवेत । जाती यूथ स्वशिबिका ॥९४॥गजपल्ल्याणे परोपरी । दिव्य वितानें कलशहारी । प्रासादपताकादामोदरीं । पुरी गोपुरी जेंवि शोभे ॥९५॥सेनासाहित्य यात्रोपकरणें । क्रमेलपृष्ठीं वाहिली भरणें । वृषभ वाजी वोझीं गौणें । खरें वेसरें शकटादि ॥९६॥रत्नखचितपल्याणबद्ध । शिक्षित तुरंग केले सिद्ध । गमती उच्चैःश्रवे प्रसिद्ध । अनेक भूतळीं अवतरले ॥९७॥अश्वसादी समरप्रवीण । निरृतिसम ज्यां आंगवण । पृष्ठिं खेटकें कटीं कृपाण । शूळशक्ति यमदंष्ट्रा ॥९८॥अमोघमार्गणपूर्ण इषुधि । वैषाणचापें सुवर्णबंधी । कवची खड्गी सर्वायुधि । राउत राने रणरसिक ॥९९॥आपुलाल्या पृथग भारें । राजे ठाकिती शिबिरागारें । सन्नद्ध पदाति शस्त्रास्त्रें । साटोप समरा उद्युक्त ॥१००॥ऐसी चतुरंग सेना । शिबिरीं उतरले प्रस्थाना । मागध वेष्टित सामंतगणा । शिबिरस्थाना पातला ॥१॥यज्ञवेदी कुळदेवता । आचार्यादि वंदूनि निघतां । ऋषीची आज्ञा स्मरली चित्ता । तेणें अवचिता दचकला ॥२॥यादवेंशीं विरोध उपजे । तैं भंगती प्रतापतेजें । ऐसें बोलिलें मुनिराजें । म्हणे तें सहजें वोढवलें ॥३॥ऐसा स्फुरतां हृदयीं तर्क । म्हणे यशदानी त्र्यंबक । तंव सन्मुख जाली शिंक । दचके अधिक तद्योगें ॥४॥एव टाळूनि घटिका पळ । शिबिरा गेला मगधपाळ । पुराणान्तरीं हे कथा सकळ । संक्षेप केवळ शुक वदला ॥५॥सेना तेवीस अक्षौहिणी । ऐसी सन्नद्ध अवलोकूनी । सव्य दक्षिण अग्र पार्ष्णि । वीरवरगणीं वेष्टित ॥६॥प्रस्थानभेरी कुंजरपृष्ठीं । व्यूह खैवंगीं वाहिल्या शकटीं । अश्वढक्के क्रमेळपाठीं । यूथदुंदुभि पृथक्त्वें ॥७॥रनमोहरीं पनवानक । टाळ मुरज काहळा शंख । इत्यादि राजवाद्यें अनेक । काळसूचक घटी यंत्रें ॥८॥घाव घातला निशाणा । वीर करिती गडगर्जना । पश्चिमदिशेसि चालिली सेना । शोणजीवना टाकिलें ॥९॥शरयुसंगम दर्दरक्षेत्र । गोमतीसंगम अतिपवित्र । प्रयागीं क्रमूनिया त्रिरात्र । यमुनातीरें चालिले ॥११०॥ऐसा मागध वीरपाळ । घेऊनि प्रचंड दळ प्रबळ । मेघपटळीं प्रावृट्काळ । तेंवि भूतळ आच्छादी ॥११॥महाराजिक मथुराप्रांतीं । प्रजा पळाल्या दिगंतीं । कित्तेक अभयपत्रें घेती । राष्ट्रें लंघिती कितिएक ॥१२॥यादवाम्ची राजधानी । मथुरापुरी सुकृतखाणी । अष्टौ दिग्भागीं वेष्टूनी । बळें रोधूनि राहिला ॥१३॥असाध्य मथुरापुरीचे दुर्ग । ग्रहणीं वीर करिती लाग । वांटूनि अष्टही दिग्भाग । युद्धप्रसंग अतिक्रूर ॥१४॥परस्परें यंत्रगोळ । सुटती जैसे वज्रकल्लोळ । नगरगर्भीं हलकालोळ । प्रलयकाळ वोढवला ॥११५॥ऐसिये समयीं श्रीभगवान । यदुकैपक्षी कंसमथन । अभ्यंतरीं कळवळून । काय करी तें ऐका ॥१६॥निरीक्ष्य तद्बलं कृष्ण उद्वेलमिव सागरम् । स्वपुरं तेन संरुद्धं स्वजनं च भयाकुलम् ॥५॥विश्रांतिघांटीच्या महाद्वारीं । परमोत्तुंगगोपुरशिखरीं । वेंघूनिया कैटभारि । पाहे चौफेरी परसेना ॥१७॥वेळावर्जित अक्रूपार । क्षोभे जाणोनि प्रळयावसर । तसा अपार सेनाभार । रोधूनि स्वपुर पसरले ॥१८॥दुर्गग्रहणाचे प्रयत्न । प्रचंड यंत्रें सुटती तीक्ष्ण । वनोपवना विध्वसन । विवरें खनन दुर्गार्थ ॥१९॥ऐसें प्रचंड मागधबळ । जेंवि प्रळयाब्धि उद्वेळ । कृष्णें देखोनिया सकळ । मथुरा व्याकुळ संरुद्ध ॥१२०॥गाई हंबरडा हाणिती । जळासाठीं तळमळिती । नगराबाहीर जावों न ल्हाती । दुर्गावर्तीं जन सकळ ॥२१॥एक म्हणती रामकृष्ण । अझूनि पाहती कां निर्वाण । एक म्हणती आंगवण । मागधासमान त्यां कैंची ॥२२॥इहीं कंस वधिला नसता । तरी कां एवढा प्रलय येता । कोन एवढ्या प्रळयावर्ता - । पासून आतां रक्षील ॥२३॥एक म्हणती हें लेंकरें । द्वंद्वयुद्धीं बळप्रचुरें । नव्हती शस्त्रास्त्रसाधनीं चतुरें । समर निकरे यां न घडे ॥२४॥आतां कोण विचार कीजे । कैसें दुस्तर निस्तरिजे । कंसप्रतिकारनिष्कृतिकाजें । यदुकुळ सहजे निर्दळलें ॥१२५॥एक म्हणती रामकृष्ण । वसुदेव आणि उग्रसेन । मागध यांचे घेईल प्राण । येरा लागून न मारी ॥२६॥एक म्हणती कंसासाठीं । सर्वां वधील महाहट्टी । एक म्हणती सांडा गोठी । कृष्ण संकटीं स्मरा हो ॥२७॥कृष्णें पाहूनि परवाहिनी । आणि स्वपुरजनाची ग्लानि । चिंतिता जाला आपुले मनीं । तें शुकमुनि निरूपी ॥२८॥कृष्णें केलें जें चिंतन । पुढें चौश्लोकीं तें कथन । षड्गुणैश्वर्यसंपन्न । करी विवरण हृत्कमळीं ॥२९॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP