मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५० वा| आरंभ अध्याय ५० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५७ अध्याय ५० वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीमद्गोविंदात्मने नमः ॥ श्रीमन्महागनपतये नमः ॥ श्रीमन्मुरलीपुरवासिपरमहंसाय नमः ॥ श्रीमद्गोविम्दात्मजाय सोमयाजिने नमः ॥ श्रीमत्सिद्धेश्वरवरदशिवरामात्मने नमः ॥ स्वस्त्सिश्रीमन्मंगलानि भवंतु ॥ गोगणवेत्ता श्रीगोविंद । अखिलाद्यैक आनंदकंद । लीलानुग्रहचरितानुवाद । वदवी विशद स्वसत्ता ॥१॥हरिहरब्रह्मादि गीर्वाण । जो समष्टीचा गोगण । तद्गत जयाचें संवेदन । वेत्ता संपूर्ण गोविंद ॥२॥यथोक्त अभिगत करणशोभा । जें उभारी विश्वारंभा । सत्तायोगें ऐश्वर्यप्रभा । विश्ववालभा श्री ज्याची ॥३॥अखिलसर्गाची विस्तृति । तद्गत सहजानंदावाप्ति । अभेद एकात्मत्वस्थिति । तत्संभूति जेथूनी ॥४॥तो विंद गोमयवेत्ता । स्वधर्मसेतुसंगोपनार्था । अनेक लीलाविग्रह धरिता । अगाधचरिता विस्तारी ॥५॥त्यांमाजि मामकीमतिमोदक । कमनीय कृष्णविग्रह एक । तत्कृतचरित्र असंख्याक । वदला श्रीशुक मितवाणी ॥६॥तयांतील दशम स्कंध । त्यावरी देशभाषाप्रबंध । देशिकादेशें टीका विशद । जें हरिवरदव्याख्यान ॥७॥आनंदाब्दीं कार्त्तिकमासीं । शुक्लपक्षीं त्रयोदशी । भौमाश्विनीसिद्धियोगेंसीं । पारमहंसीं पुण्योत्सवीं ॥८॥मुरलीपुरीं सत्समाजीं । अनुचर निरत श्रीपदकंजीं । आज्ञापिला व्याख्यानकार्जी । मौळ कराब्जीं स्पर्शोनी ॥९॥म्हणती गुरुपदपंकजभ्रमरा । सप्रेमळा आदेशकरा । आरब्ध ग्रंथ कीजे पुरा । संशयवारा न स्पर्शे ॥१०॥ज्याची सत्ता ब्रह्मांड चाळी । तो वदविता तव हृत्कमळीं । असतां शंकेची काजळी । किमर्थ जवळी वसवावी ॥११॥स्वसत्ता पूर्ण कर्त्ता हरि । आपण आज्ञानियोगकारी । जे ज्या नियोजिले व्यापारीं । आपण त्यापरी वर्त्तावें ॥१२॥गोविंदात्मज शिवदीक्षित । वेदार्थवक्ता विपश्चित । चौधरी उपनामें जो ख्यात । मंत्रभागवतव्याख्याता ॥१३॥दुसरा अपरसिद्धेश्वर । लाहूनि तद्गत साक्षात्कार । करी कारुण्यें जगदुद्धार । भट्ट मुनिवर शिवराम ॥१४॥एतत्प्रमुख श्रौतस्मार्ती । यतिवर महानुभाव सन्मूर्ति । ब्रह्मसमाजीं हे वरदोक्ति । आज्ञापिली दयार्णव ॥१५॥आज्ञे सरिसें करूनि नमन । प्रावृटीं कविबुधयोगीं घन । कुरुपे तैसी प्रज्ञागगन । कवळी पूर्ण प्रमेयाचें ॥१६॥ग्रंथारंभीं मंगळाचरण । हरिगुणगणपति कविजन । त्यांची कृपा शारदा पूर्ण । अभेद नमन गुरुचरणां ॥१७॥ब्रह्मा नारद व्यास वाल्मिक । महर्षि प्रमुख पराशर शुक । ऊर्ध्वरेते सनकादिक । प्राचीन अशेष कवि नमिले ॥१८॥मुकुंदराज ज्ञानेश्वर । प्रमुख देशभाषाकार । सिद्धान्तवक्ते ज्ञानभास्कर । स्मरोनि सादर वंदिले ॥१९॥लिहिजे विस्तृत नामावळी । ग्रंथ जाईल पैं पाल्हाळीं । यालागिं स्मरोनि हृदयकमळीं । धरिलें मौळीं पदकंज ॥२०॥एवं गुरुभक्तांचा निकर । आब्रह्मादि जो स्थावर । ओतप्रोत जें चिन्मात्र । अभेद अविकार तें नमन ॥२१॥सूर्य सूर्येंचि प्रकाशे । कीं अमृतीं अमृतचि समरसे । हरिगुणश्रवणीं श्रोते तैसे । साक्षात् हरिरूप हरिवेत्ते ॥२२॥शौनकप्रमुख जे प्राचीन । लक्ष्मी पार्वती विधि ईशान । इत्यादि श्रोते उद्धवार्जुन । जनमेजय परीक्षिति ॥२३॥तैशाच भावी भगवन्मूर्ति । ज्यांसि आवडे भगवत्कीर्ति । त्यांच्या चरणां करूनि प्रणति । विनीतविनति हे माझी ॥२४॥तुमचे कृपेच्या अमृतघनें । पाल्हेजती प्रमेयवनें । अनवधानावर्षणें । स्थिति विरूढली करपती ॥२५॥यालागिं अवधानाची वृष्टि । मजवरी कीजे कृपादृष्टि । तेणें हरिगुणवरसपुष्टि । विरूढे वाक्पुटीं लसलसित ॥२६॥हेहि विनति माझी गौण । हा तंव तुमचा सहज गुण । जेंवि अमृतीं अमरपण । विषीं मरण नैसर्ग्य ॥२७॥तेंवि दुर्जन दूषिती ग्रंथ । जर्ही ते भावें वंदिले माथां । सज्जन घेती न प्रार्थितां । माधवमाधुरी मधुव्रत जे ॥२८॥सामुद्रिकें पाहूनि चिन्हें । प्रिया परणिजे पाणिग्रहणें । मातेसि पाहतां तीं लक्षणें । होय उपेणें यमसदनीं ॥२९॥तेंवि साहित्य अळंकार । नवरसनाटकें श्रृंगार । छंदसंगीतपठनें चतुर । होऊनि सुंदर काव्य कीजे ॥३०॥वाचूनि महाकवींच्या ग्रंथा । हरिकीर्तन श्रवण करितां । चातुर्य शिकोनि दूषण देतां । बैसे माथां यमदंड ॥३१॥यालागीं नमन सर्वात्मका । कडसणीची सांडूनि शंका । प्राश्निकां श्रोत्यां अनुमोदकां पृथक् विवेका न करीं मी ॥३२॥दशमस्कंधींचें पूर्वार्ध । महाराष्ट्रभाषावोवीप्रबंध । मूळ व्यासोक्त पाहूनि शुद्ध । विवरिलें विशद यथामति ॥३३॥तेथ पूर्वार्ध संपते काळीं । धृतराष्ट्राची राहटी सकळीं । अक्रूरें रामकृष्णांजवळी । येऊनि कथिली विषमता ॥३४॥तें ऐकोनि राममुरारी । उत्साहयुक्त अभ्यंतरीं । भूभारहरणा शस्त्रधारी । झाले समरीं कैं कैसे ॥३५॥तो हरीचा प्रथम समर । कोण प्रतियोद्धा महावीर । समरकारण सविस्तर । सांगे मुनिवर तें ऐका ॥३६॥क्रमें अध्याय पन्नासावा । प्रथम उद्दरार्धीं जाणावा । तेथ हा कथासमुद्च्चय आघवा । वाखाणिजेल संक्षेपें ॥३७॥एकावन्नामाजीं हरि । पलायनमिषें यवना विवरीं । मुचुकुंदाच्या क्षोभें मारी । कृपेनें तारी मुचुकुंदा ॥३८॥बावन्नाव्यामाजीं कृष्ण । पळोनि पर्वतीं सबंधु लीन । द्वारके वसतां रुक्मिणीलेखन । केलें श्रवण द्विजवदनें ॥३९॥त्रेपन्नामाजीं कौंडण्यपुरीं । प्रतापें हरूनियां नोवरी । मागधादि दुर्मद वैरी । तत्प्रतिकारीं उठावले ॥४०॥चौपन्नाव्या अध्यायांत । मागधप्रमुख भंगूनि अहित । विटंबूनि रुक्मि सोडिला जित । इत्थंभूत करग्रहण ॥४१॥पंचावन्नीं रुक्मिणीजठरीं । स्मर जन्मतां शंबर हरी । कामें त्यातें मारून समरीं । पूर्वनोवरीसह आला ॥४२॥एवमादि हें अध्यायषट्क । पूर्वार्धान्तींचें पंचक । एकादशिनी हे सम्यक । पंचम निष्टंक जाणावा ॥४३॥परिसा पूर्वान्वयसंबंधा । प्रथम जरासंध प्रतियोद्धा । लाहूनि दिव्ययानायुधा । करिती युद्धा बलकृष्ण ॥४४॥मनुष्यवेषाची अवगणी । तदनुसार संपादणी । जरासंधा समरांगणीं । रामकृष्णीं भिडिजेल ॥४५॥तेथ अष्टादशावे समरीं । बलराम आणि श्रीमुरारी । शत्रुभेणें द्वारकापुरी । सिंधुमाझारीं वसविती ॥४६॥पूतनेपासूनि कंसवरी । कपटी कपटें मर्दूनि हरि । धार्मिक मागध स्वधर्मसमरीं । जिंकूनि उतरी भूभार ॥४७॥मागधकलहासि कारण । तें हें मुख्य कंसमरण । शुकसिंहाचें अवलोकन । अनुसंधान कथेचें ॥४८॥ धृतराष्ट्र पांडवेंशीं विषम । ऐकोनि क्षोभले कृष्णराम । पुढें कौरवहननोद्यम । यथानुक्रम वर्णावा ॥४९॥तंव हें सिंहावलोकनें । कंसकथेच्या उपसंहरणें । संदर्भिलें मुनिसर्वज्ञें । नृपाकारणें तें ऐका ॥५०॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP