मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५० वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ५० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५७ अध्याय ५० वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर सुपर्र्णतालध्वजचिह्नितौ रथावलक्षयंत्यो हरिरामयोर्मृधे ।स्त्रियः पुराट्टालकहर्म्यगोपुरं समाश्रिताः संमुमुहुः शुचाऽर्दिताः ॥२१॥अतिअल्पतरसेनाभारीं । वेष्टित बलराम श्रीमुरारी । निघोनि मथुरापुरीबाहेरी । मागधासमरीं जैं गेले ॥२१५॥मागें सशंक पुरजन सकळ । संग्राम पाहती उतावीळ । मागधें वेष्टितां कृष्ण सबळ । चिंता प्रबळ सर्वांसी ॥१६॥मथुरापुरींचिया नागरा । कित्तेक चढल्या पुरगोपुरा । एकी वेंघूनि प्रासादशिखरा । सादर समरा विलोकिती ॥१७॥एकी माडिया वलघल्या । एकी उच्चभिंती चढल्या । एकी देवालयें वेंघल्या । पाहों लागल्या हरिसमरीं ॥१८॥सुपर्नतालध्वजचिन्हित । रामकृष्णांचे लोपतां रथ । तेणे तयासि मोहावर्त । शोके आकांत त्या करिती ॥१९॥सेनेसगट कृष्णरामा । मागधें जिंकूनि संग्रामा । जीत धरिले किंवा वर्ष्मा । छेदूनि समरीं पाडिले ॥२२०॥पदातिहयगजरथ सकेतु । एकही न दिसे सैन्या आंतु । यदुपुरींचा पुरला अंतु । करिती आकांतु पुरगर्भीं ॥२१॥एक म्हणती लावण्यमूर्ति । एक स्मरती प्रतापशक्ति । एक म्हणती पुरल्या गणती । न चले अंतीं ऐश्वर्य ॥२२॥हरिहरांची पुरल्या वेळा । प्रताप वरपडा होय काळा । विजयें वरिलें मागधा खळा । करील अवकळा मथुरेची ॥२३॥नगरीमाजीं हाहाकार । म्हणती क्षोभला जगदीश्वर । ऐसें जाणोनि स्वजनांतर । प्रकटे श्रीधर तें ऐका ॥२४॥हरिः परानीकपयोमुचां मुहुः शिलीमुखात्युल्बणवर्षपीडितम् ।स्वसैन्यमालोक्य सुर्रासुरार्चितं व्यस्फूर्जयच्छार्ङ्गशरासनोत्तमम् ॥२२॥कृष्ण पाहे जंव पर दळें । क्षोभलीं जैसीं मेघपटळें । वारंवार वृष्टि उमाळे । वर्षती तुंबळें शरधारीं ॥२२५॥सेना जैसे सजळ घन । जलबिंदुवत् बहळ बाण । देखोनि शरवृष्टि उल्बण । व्याकुळ स्वसैन्य तद्योगें ॥२२६॥लोकत्रयीं विजयवंत्त । स्वसैन्य सुरासुरपूजित । उद्धव अक्रूर रोहिणीसुत । अमर समस्त नररूपें ॥२७॥परसेनेच्या तीक्ष्ण बाणीं । स्वसैन्य संकोचित देखोनि । शार्ङ्गकार्मुकोत्तम घेऊनि । टणत्कारिलें श्रीकृष्णें ॥२८॥असुरनिर्जारीं समुद्रमथन्नीं । जें पूजिलें साधुवचनीं । कोदंडोत्तम शार्ङ्गपाणि । वाहूनि शिंजिनी स्फाळिलें ॥२९॥ऐकोनि शार्ङ्गध्वनिगर्जना । सरसावली यादवसेना । प्रतापें मागधायूथगणा । पाचारिती परस्परें ॥२३०॥अग्रभागीं संकर्षण । उद्धवें आवरिली दक्षिण । वामभागीं अक्रूर गहन । मारी सैन्य मागधाचें ॥३१॥देवश्रवस देवभाग । वसुदेवाचा बंधुवर्ग । तिहीं रक्षूनि पार्ष्णिभाग । करिती भंग परसैन्या ॥३२॥गद सारण दुर्मद विपुळ । ध्रुवप्रमुख रोहिणी बाळ । अग्निकोणींचें मागधदळ । मारिती तुंबळ प्रतापें ॥३३॥सुभद्र भद्र भद्रवाह । पौरवीतनय वासुदेव । ईशान्यदिग्भागीं हे सर्व । दाविती लाघव शौर्याचें ॥३४॥नंदउपनंद शूरक्रुतक । मदिराजठरींचे वसुदेवतोक । नैरृत्यकोणींचें मागध कटक । भंगिती अंतकसमसाम्य ॥२३५॥भद्रेपोटीं केशिनी एक । वसुदेवाचा प्रियबाळक । महारथी जो वीरनायक । पावनीं सन्मुख रिपु भंगी ॥३६॥हस्तहेमांगदप्रमुख सर्व । रोचनाजठरींचे वासुदेव । मुरुवल्कादिक इळाभव । समरपातवपटुतर जे ॥३७॥देवकीच्या सख्या बहिणी । धृतदेवादि साहीजणी । त्यांचे पुत्र चौरंगणीं । विपुष्टादिक हरिनिकटीं ॥३८॥ऐसे माधव महावीर । ऐकोनि शार्ङ्गटणत्कार । मागधसैन्या करिती मार । हर्षें श्रीधर शर सज्जी ॥३९॥गृह्णान्निषंगादथ संदधच्छरान्विकृष्य मुंचन्शितबानपूगान् ।निघ्नन्रथान्कुंजरवाजिपत्तीन्निरंतरं यद्वदलातचक्रम् ॥२३॥यानंतरें देवकीतनय । निशीत बाणांचे समुच्चय । निषंगापासूनि घेऊनि लाहे । सज्जिता होय कार्मुकीं ॥२४०॥आकर्ण ओढूनि शार्ङ्गचाप । एक संधानें बाण अमूप । कृष्णें सोडितां काळाग्निकल्प । सांडिती दर्प महारथी ॥४१॥मनपवनादिकीं लाघवें । कौशल्य कृष्णापें शिकावें । त्या कृष्णाच्या संधानजवें । उपमा पावे कैं कोण ॥४२॥लघुलाघवें चमत्कारें । अमूप बाण एकसरें । प्राक्प्रत्यग्दक्षणोत्तरें । अधोर्ध्व शरें व्यापिलें ॥४३॥जेथूनि शार्ङ्ग बसविलें मुष्टी । तेथूनि निरंतर मार्गणवृष्टि । होतां सैन्या केली आटी । सुभतकोटी आटिले ॥४४॥रथी सारथी तुरंगमा । बाणीं छेदूनि करशिरपद्मा । सवेग उसळूनि जाती व्योमा । वीरविक्रमा न धरिती ॥२४५॥केतु कूबर चक्रें अक्ष । खंडूनि रहंवर लक्षेंलक्ष । पडती त्यांची गणना दक्ष । करितां मुख्य लक्षेना ॥४६॥कुंजरसादि अंकुशधर । पार्ष्णिग्राहादि महावीर । तुटोनि पडती करपदशिर । पर्वताकार रणरंगीं ॥४७॥रणपंडित राउतराणे । खंडती कृष्णाच्या मार्गणें । गगना उडोनि जाती वदनें । पावती पतनें उडुगणवत् ॥४८॥पदातियांचीं तुटती मौळें । पडती भूतळीं कोथळे । श्रीकृष्णाच्या करचापल्यें । बळें परदळें निर्दळिलीं ॥४९॥दशदिग्भागीं देऊनि भवरी । शरसंधाना करितां शौरी । कार्मुक अलातचक्रापरी । देखिजे वीरीं सभंवतें ॥२५०॥अलात म्हणिजे जळतभितें । जिवें भवंडितां सभोंवतें । कंकणाकार अभंग आइतें । दिसे ध्वांतें तेजस्वी ॥५१॥तैसेंचि शार्ङ्ग निरंतर । दशदिग्भागीं कमलावर । शरीं वर्षतां फिरती कर । अलातचक्रसम म्हणती ॥५२॥कोलती फिरवितां गरगर । भासे अखंड चक्राकार । तेंवि शार्ङ्गीं सज्जूनि शर । सोडी यदुवीर सर्वत्र ॥५३॥श्रीकृष्णाच्या बाणघातीं । सैन्यें पडलीं सभोंवतीं । तें संक्षेपें रायाप्रती । वर्णी भारती शुकाची ॥५४॥निर्भिन्नकुंभाः करिणो निपेतुरनेकशोऽश्वाः शरवृक्णकंधराः । रथा हताश्वध्वजसूतनायकाः पदातयश्र्छिन्नभुजोरुकंधराः ॥२४॥बाणीं भेदूनि कुंभस्थळें । रणीं पाडिलीं कुंजरदळें । तोडिलीं अश्वांचीं शिसाळें । वीरकोथळे शिररहित ॥२५५॥रथी पडिले रणरंगणीं । सारथि भेदले निर्वाणबाणीं । अश्वमुंडे खंडूनि धरणीं । ध्वज भंगूनि रथ पडिले ॥५६॥जीवट पदातियांचा भार । निकर्कें करिती शस्त्रमार । प्रास पट्टिश परिघ तोमर । शक्ति मुद्गर प्रेरिती ॥५७॥भिंडिपाळाचे फुटती तडक । शूळसाधनें दाविती एक । खङ्गखेटकधर अनेक । यंत्रीं पावक योजिती ॥५८॥कृष्णमार्गणीं ख्याति केली । पदातिमौळें छेदूनि नेलीं । कबंधें नाचती भूमंडळीं । शस्त्रें करतळीं परजूनी ॥५९॥आपुलें पारकें ऐसें न कळे । कबंधें भिडती आवेशबळें । तुटती एकाचीं करतळें । छिन्न कोथळे जठरांचे ॥२६०॥तुटोनि पदल्या जानु जंघा । बाणीं खंडिलें सर्वांगा । सरों न शकती पुढां मागां । पावलीं भंगा पायदळें ॥६१॥शार्ङ्गजामुक्तमार्गणीं । कृष्णहस्तीं सुटतां रणीं । रणा आणिल्या वीरश्रेणी । रक्तें धरणी बंबाळ ॥६२॥पडलीं हयगजवीरप्रेतें । नद्या तुंबळल्याअ त्यांचेनि रक्तें । त्या संक्षेपें परीक्षितीतें । कथिल्या मुनिसुतें तें ऐका ॥६३॥संच्छिद्यमानद्विपदेभवाजिनामंगप्रसूताः शतशोऽसृगापगाः । भुजाऽहयः पूरुषशीर्षकच्छपा हतद्विपद्वीपहयग्रहाकुलाः ॥२५॥ठायीं ठायीं नारगततुरग । पश्वादिप्रेतें पडलीं अनेग । तत्क्षतसंभवरुधिरओघ । भीकर सुरंग रक्तनद्या ॥६४॥शतानुशत वाहती रणीं । रक्तनद्यांचीं रूपकभरणीं । समूळ नरभुज जैसे फणी । रक्तजीवनी वाहताती ॥२६५॥पुरुषमौळें कच्छप गमती । कुंजरप्रेतें द्वीपाकृति । अश्वकलेवरें ग्राह भासती । मकरनक्रासमसाम्य ॥६६॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP