मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५० वा| श्लोक १६ ते २० अध्याय ५० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५७ अध्याय ५० वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर शंखं दध्मौ विनिर्गत्य हरिर्दारुकसारथिः । ततोऽभॊत्परसैन्यानां हृदि वित्रासवेपथ्हुः ॥१६॥शैब्यसुग्रीव बलाहक । मेघपुष्पादि तुरंग चौक । चार्ही निगम जैसे अर्क । येतां दारुक खगकेतु ॥७४॥स्वयें श्रीकृष्ण महारथी । मागधमर्दनोत्साहवृत्ति । शंख स्फुरिला प्रचंडशक्ती । घोषें गाजती त्रिभुवनें ॥१७५॥नगरांतूनि निघोनि नेटें । तेणें दणानिलीं गिरीकूटें । वाटे वोखटें अरिवर्गा ॥७६॥शंखश्रवणानंतर पहा । परसैनिकां संत्रास महा । म्हणती प्रळय वोढवला हा । भरला दाहा सर्वांगीं ॥७७॥सैनिकांसि आली शारी । वाजती वीरांचीं दातोरीं । थरथराटें कांपती टिरी । नधरत वस्त्रीं लघुशंका ॥७८॥थरथरा कांपती महावाट । म्हणती भंगला ब्रह्मांडघट । एकां जाला हृदयस्फोट । एकां सुभट सांवरिती ॥७९॥झांपडी पडिली सर्वां नयनीं । कित्तेक प्रेतप्राय अवनीं । मागध दचकोनि आपुले मनीं । स्वस्थ होऊनि पाहतसे ॥१८०॥तंव समर्म्गीं निकटवर्ती । रामकृष्ण महारथी । देखोनि बोले तयाप्रति । कौरवपति तें ऐक ॥८१॥तावाह मागधो वीक्ष्य हे कृष्ण पुरुषाधम । न त्वया योद्धुमिच्छामि बालेनैकेन लज्जया ।गुप्तेन हि त्वया मंद न योत्स्ये याहि बंधुहन् ॥१७॥रोषावेषें पैशून्योक्ति । निंदूनि बोले कृष्णाप्रति । निंदेमाजि श्रीभारती । करी स्तुति तें ऐका ॥८२॥अरेरे कृष्णा पुरुषाधमा । लज्जे करूनि तुजसीं आम्हां । युद्ध न घडे म्हणसी कामा । तरी अयोग्य संग्रामा तूं मजसी ॥८३॥तूं तंव बाळक वसुदेवाचें । अद्यापि भय तुज बागुलाचें । सुभटासमरीं तूं कालिचें । केंवि लेंकरूं तडवसी ॥८४॥तुजसी युद्ध करितां मज । हांसती पृथ्वीचे भूभुज । बार्हद्रथ मी कीर्तिध्वज । पावेन लाज तव समरीं ॥१८५॥म्हणसी विष्णूचा अवतार । प्रतापें वधिला कंसासुर । हें यश मानिती पामर । प्रतापी शूर न गणिती ॥८६॥जरीं तूं विष्णु होतासि सत्य । तरी कां गोवळीं राहतासि गुप्त । विश्वस्त कंसा केला घात । तुजवरी हात नुचलीं मी ॥८७॥प्राण वांचविला लपोन । ऐसाचि जाय रे पळोन । तुजला दिधलें म्यां जीवदान । ह्मी बंधुघ्न न मारीं ॥८८॥इत्यादि निंदेच्या उतरीं । कृष्णा मागध नोकी समरीं । निंदेमाजि स्तवी वैखरी । तें समासें चतुउरीं ऐकावें ॥८९॥कृष्णापासूनि पुरुष अपर । अविद्यावेष्टित जीवमात्र । तितुके पुरुषाधम निर्धार । क्रुष्ण साचार पुरुषोत्तम ॥१९०॥गोवळीं गुप्त ऐसी वाणी । तरी गुहायश हा चक्रपाणि । सर्वांतर्यामी आसोनी । करणालागूनि अप्राप्त ॥९१॥यालागिं गुप्त हेंही खरें । दर्शना अयोग्य अनधिकारें । मंद अमंद हें उत्तरें । होती साचारें पूर्णत्वीं ॥९२॥चंचळ बुद्ध्यादि करणवृंद । तया पुरुषानाम अमंद । अचळ अमळ पूर्ण प्रसिद्ध् । मंद स्वतःसिद्ध परमात्मा ॥९३॥ये चैव सात्विका भावा । राजस तामस मिश्र अथवा । मजपासूनि जाण पाण्डवा । तैं अमंद अघवा श्रीकृष्ण ॥९४॥बंधुघ्नशब्दाची व्युत्पत्ति । कृष्ण साचार बंधुघाती । अविद्याबंधन सर्वांप्रति । कृष्णस्म्रुति घातक त्या ॥१९५॥याहि म्हणिजे करीं गमन । क्रुष्ण सर्वग विद्यमान । प्रापणार्थीं हें जाणोन । करी स्तवन वाग्देवी ॥९६॥ऐसा उपेक्षूनि श्रीकृष्ण । मग रामासि बोले वचन । समरा योग्य संबोधून । तें सर्वज्ञ परिसतु ॥९७॥तव राम यदि श्रद्ध युध्यस्व धैर्यमुद्वह । हित्वा वा मच्छरैश्छिन्नं देहं स्वर्याहि मां जहि ॥१८॥मागध म्हणे रे संकर्षणा । मजसीं भिडसी आंगवणा । जरी तुज आवडी समरांगणा । तरी ये रणा धीर धरीं ॥९८॥मत्समरंगीं होसी अधळ । दोहीं प्रकारीं उत्तम फळ । माझ्या शरीं संच्छिन्न स्थूळ । टाकूनि केवळ स्वर्ग वरीं ॥९९॥स्थूळशरीर माझ्या बाणीं । छिन्न भिन्न टाकूनि रणीं । शौर्यें स्वर्गाप्रति जाऊनी । अमरभुवनीं सुख भोगीं ॥२००॥अथवा म आतें जिंकूनि रणीं । कीर्ति विस्तारीं भूपाळगणीं । भोगीं असपत्न हे धरणी । प्रकार दोन्ही शुभ फलद ॥१॥मागधामनीं ऐसा भाव । अच्छेद्य अभेद्य माझा देह । निर्बळ बळाचा कायसा भेद । म्हणोनि हांव उद्बोधी ॥२॥ऐसीं ऐकोनि मागधवचनें । परमाविस्मयें हास्यवदनें । दिधलें प्रत्युत्तर श्रीकृष्णें । तें नृपाकारणें शुक सांगे ॥३॥श्रीभगवानुवाच - न वै शूरा विकत्थंम्ते दर्शयंत्येव पौरुषम् । न गृह्णीमो वचो राजन्नातुरस्य मुमूर्षतः ॥१९॥श्रीकृष्ण म्हणे मागधाप्रति । शूर प्रताप आंगीं वाहती । वृथा वल्गना ते न करिती । प्रकट दाविती पुरुषार्थ ॥४॥ऐकें राया मागधपते । जें हें विकत्थन योग्य तूंतें । तूं बोलसी सन्निपातें । मर्तुकांमातें हें उचित ॥२०५॥आतुर केवळ मुमूर्षुप्राणी । सन्निपातें बरळे वाणी । ते हे तुझी विकत्थनी । आम्ही श्रवणीं न गणूं पां ॥६॥अल्पबळेंशीं अर्भक कृष्ण । न गणूनि आपुलें हेळी वचन । तेणें मागध प्रक्षोभून । करी आंगवण तें ऐका ॥७॥ श्रीशुक उवाच - जरासुतस्तावभिसृत्य मागधौ महाबलौघेन बलीयसाऽवृणोत् ।ससैन्ययानध्वजवाजिसारथी सूर्यानलौ वायुरिवाभ्ररेणुभिः ॥२०॥शरीरशकलें जरासंधित । यालागीं म्हणिजे जरासुत । कृष्णोक्तीचा ऐकतां अर्थ । धांवोनि वेष्टित बलकृष्ण ॥८॥मधुअन्वयामाजि जन्म । यालागीं माधव ऐसें नाम । ते हे श्रीकृष्ण बलराम । मागध अधम अभिवेष्टी ॥९॥तेवीस अक्षौहिणी सैन्य । ससैन्य रामकृष्णां वेष्टून । आच्छादिलें जैसा पवन । सूर्यकृशान झांकोळी ॥२१०॥गज रथ तुरंग आणि पदाति । चातुरंग चमू होती । तयेसहित महारथी । राम श्रीपति वेष्टिले ॥११॥ससैन्य यानें वाजिरथ । गरुडतालध्वजचिन्हित । आच्छादिले सैन्यावर्त । भवंता घालूनि प्रतापें ॥१२॥जैसा प्रचंड चक्रवात । धुळीनें अनिळाच्छादित । अभ्रें आच्छादी भास्वत । झांकिले तद्वत बलकृष्ण ॥१३॥अनेक केतु उच्चतर । भवंता बृहत्पताकाभार । तेणें बलराम श्रीधर । सकेतुरहंवर लोपले ॥१४॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP