मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५० वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ५० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५७ अध्याय ५० वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर एवं ध्यायति गोविंद आकाशात्सूर्यवर्चसौ । रथापुपस्थितौ सद्य ससूतौ सपरिच्छदौ ॥११॥गगनींहूनि अकस्मात । सूर्यप्रभाभासुर रथ । उतरले भूमंडळीं त्वरित । सारथियुक्त सन्नद्ध ॥५७॥शिबिरें वितानें केतुशिखरीं । सन्नाहादि उपसामग्री । परिच्छदशब्दें शुकवैखरी । जें निर्धारी तें ऐक ॥५८॥आयुधानि च दिव्यानि पुराणानि यदृच्छया । दृष्ट्वा तानि हृषीकेशः संकर्षणमथाब्रवीत् ॥१२॥दिव्यायुधें पुरातन । कौमोदकी पांचजन्य । शार्ङ्गचाप अमोघ बाण । सुदर्शन धगधगीत ॥५९॥अमृतस्रावी चंद्रखेटक । काळकृपाण जो नदंक । लांगल मुसळ गदा परिघ । पद्मेंसहित दिव्यास्त्रें ॥१६०॥अनायासें हें गगनींहूनी । समृद्धिमंत रहंवर दोन्ही । उतरतां श्रीकृष्णें देखोनी । बोले वचनीं बलरामा ॥६१॥पश्यारऽर्य व्यसनं प्राप्तं यदूनां त्वावतां प्रभो । एष ते रथ आयातो दयितान्यायुधानि च ॥१३॥भो भो आर्य पूज्यतमा । पाहें ज्येष्ठा श्रीबलरामा । व्यसन संप्राप्त यादवा आम्हां । सगोत्रग्रामासमवेत ॥६२॥यदुकुळ रक्षित असतां तूतें । व्यसनीं घातलें बार्हद्रथें । आतां तुजविण गोप्ता यातें । कोण पां निरुतें विचारी ॥६३॥यादवगोप्ता तूं समर्थ । आणि हा त्वदर्थ आला रथ । तुझीं प्रियतम आयुधें येथ । जालीं संप्राप्त संग्रामीं ॥६४॥यानमास्थाय जह्येतद्व्यसनान्स्वान्समुद्धर । एतदर्थं हि नौ जन्म साधूनामीश शर्मकृत् ।त्रयोविंशत्यनीकाख्यं भूमेर्भारमपाकुरु ॥१४॥यानीं बैसोनि शौर्यप्रौढी । व्यसनापासूनि स्वकुळ काढी । उत्पथ मागधसैन्य झोडीं । जोडीं रोकडी यशकीर्ति ॥१६५॥ईश म्हणिजे भो समर्था । साधुरक्षणाचिया अर्था । निर्दळावया उत्पथा । जन्म तत्वता हें आमुचें ॥६६॥इतुक्याकारणें आमुचें जन्म । जाणोनि प्रकटीं निजविक्रम । तेवीस अक्षौहिणी दुर्गम । सैन्यें उद्दाम भूभार ॥६७॥यांचा करूनियां संहार । प्रस्तुत इतका उतरीं भार । ऐसा करूनि मंत्रविचार । जाले सादर सन्नद्ध ॥६८॥एवं संमंत्र्य दाशार्हौ दंशितौ रथिनौ पुरात् ।निर्जग्मतुः स्वायुधाढ्यौ बलेनाल्पीयसा वृतौ ॥१५॥दशार्हकाचे अन्वयजात । म्हणोनि दाशार्ह नामसंकेत । वज्रकिरीटकवचवंत । जाले समरार्थ साटोप ॥६९॥तुरंगस्यंदन अभिवंदून । रथीं बैसले रामकृष्ण । हर्षें निजायुधें परजून । नगरापासून चालिले ॥१७०॥अल्पाहूनि अल्पतर । जितुके घरींचे जिवलग वीर । तितुका वेष्टित सेनाभार । नगरद्वार पावले ॥७१॥पूर्वभागीं महासुभटं । प्रबळ बळेंशीं मागधश्रेष्ठ । जाणोनि त्यावरी बळवैकुंठ । चालिले नीट साटोपें ॥७२॥महाद्वारींचे कपाटजोडे । वोढूनि केलें द्वार उघडें । पावकयंत्रगोळापाडें । शौर्यें प्रचंडें उठावले ॥७३॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP