मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५० वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ५० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५७ अध्याय ५० वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर एवं सप्तदशकृत्वस्तावत्यक्षौहिणीबलः । युयुधे मागधो राजा यदुभिः कृष्णपालितैः ॥४१॥तंव येरीकडे जरासंध । पराभवाचा मानूनि खेद । यादवेंसीं दीर्घ विरोध । धरिला प्रसिद्ध प्रतापें ॥७९॥पुन्हा प्रतापें वीरश्रेणी । महाबळिष्ठ पूर्विलाहूनी । सेना तेवीस अक्षौहिणी । केली धांवणी मथुरेवरी ॥३८०॥हाहाकार मथुराप्रांतीं । गुरें वासुरें आक्रंदती । माता लेंकुरें नोळखती । महाविपत्ती पलायनें ॥८१॥म्हणती भोग न सरे कैसा । शत्रु प्रतापी मागधा ऐसा । कृष्णें जैंहूनि मारिलें कंसा । तैंहूनि देशा भय आलें ॥८२॥उभ्यां अन्न खाती लोक । परचक्रभयाची धुकधुक । म्हणती करावा कोण विवेक । महा अटक वोडवलें ॥८३॥दुरी देखूनि मागधभार । जनपद करिती हाहाकार । पळाती लंघिती गिरिकंदर । मथुरापुर आश्रयिती ॥८४॥ हाक ऐकोनि यादव प्रबळ । वर वाळती उतावीळ । पदखळोनि मागधदळ । हलकालोळ करिताती ॥३८५॥पहिल्यावरी राममुरारि । सज्ज होऊनि यादवभारीं । मागधदळाची बोवरी । करूनि समरीं जयवंत ॥८६॥जरासंधासि जीवदान । देऊनि सोडिती निस्तेजून । म्हणती वाहसी पुरुषचिह्न । तरी दावीं वदन पुरुषार्थें ॥८७॥या वचनाचें शल्य हृदयीं । बैसतां पेटे विषादखाई । तेणें अभिमानें लवलाहीं । पडे प्रवाहीं यत्नाच्या ॥८८॥पुन्हा तेवीस अक्षौहिणी । प्रतापी प्रचंड वीरश्रेणी । घेऊनि मथुरेवरी धांवणी । करी क्षोभोनि विजयार्थ ॥८९॥ऐसाचि प्रतिवस्तरीं मेळा । तेवीस अक्षौहिणी दळा । घेऊनि मागध सतरा वेळा । यदुकुलनिर्दळणा ॥३९०॥कृष्णें पाळिले यादववीर । करितां तिहींसीं प्रतिसमर । होतां सैन्याचा संहार । पळे स्वगात्र घेऊनि ॥९१॥अक्षिण्वंस्त्तद्बलं सर्वं वृष्णयः कृष्णतेजसाः ।हतेषु स्वेप्यनीकेषु त्यक्तोऽयादरिभिर्नृपः ॥४२॥कृष्णतेजें सतीजिष्ठ । वृष्णिवीर महाबळिष्ट । तिहीं मागधसेना दुष्ट । क्षया यथेष्ट पावविली ॥९२॥भूमंडळींचे महावीर । महाप्रतापी ऐश्वर्यधर । त्यांतें आणूनि मागधेश्वर । करवी संहार हरिहस्तीं ॥९३॥सोयरे धायरे परम आप्त । इष्टमित्र वीर श्रीमंत । ते ते आणूनियां समस्त । केले शांत मथुरेसी ॥९४॥प्रतिसंग्रामीं सेनाभरणीं । मरती तेवीस अक्षौहिणी । ऐसेंचि सतरा समरांगणीं । केली धरणी निर्वीर ॥३९५॥पुन्हा अठराविये वेळे । संग्रामार्थ मागधपलें । सज्ज संग्रहितां प्रबळ दळें । अपूर्व वर्तलें तें ऐका ॥९६॥अष्टादशमसंग्राम आगामिनि तदंतरा । नारदप्रेषितो वीरो यवनः प्रत्यदृश्यत ॥४३॥अठराविया संग्रामासी । मागध उद्युक्त अभिमानेंशी । सैन्यें मेळवी प्रयत्नेंसीं । रामकृष्णांसि जिणावया ॥९७॥होणार अठरावा संग्राम । तव मधेंच कांहीं अपूर्व कर्म । यादवांवरी म्लेच्छाधम । मुनिसत्तमें पाठविला ॥९८॥हे ऐकोनि श्रोतयांप्रति । श्रवणीं शंका उपजे चित्तीं । नारदें क ऐसें यवनाप्रति । यदुहननार्थीं क्षोभविलें ॥९९॥ये शंकेचिया निरसना । पुरणान्तरींची घेऊनि सूचना । निरूपिजेल ते अन्यथा नमना । मम प्रार्थना हे इतुकी ॥४००॥कोणे एके सुभवासरीं । नारद प्रवेशला यवनपुरीं । यदनें पूजिला सर्वोपचारीं । स्तवनोत्तरीं गौरविली ॥१॥नारद देखोनि कालयवन । म्हणे हा कोणाचा नंदन । महाप्रतापी शौर्य गहन । दिसे तीक्ष्ण तेजस्वी ॥२॥तयासि सांगे यवनराजा । म्हणे माझी हे क्षेत्रजप्रजा । गर्गप्रसादें लाधली वोजा । कनिष्ठ भाजा काळी हे ॥३॥ऐसें निरूपी राजा यवन । ऐकोनि नारद म्हणे धन्य । तंव कालयवनें धरूनि चरण । करी प्रार्थन नारदातें ॥४॥म्हणे समरंगीं भीडे मजसीं । ऐसा वीर कवणे देशीं । विदित असे सर्वज्ञासी । तो मजपासीं सांगावा ॥४०५॥ऐकोनि नारद हांसिला पोटीं । म्हणे तुज तुल्यवीर न दिसे सृष्टि । देवकीवसुदेवांच्या पोटीं । एक जगजेठी यदुवर्य ॥६॥यादवांचें ऐकोनि नांव । कालयवना नावरे हांव । घृतावदानें वैश्वदेव । तेंवि स्वमेव प्रज्वळला ॥७॥पुसे कृष्णाचीं इंगितें । चिह्नें कौशल्यें अभ्यस्तें । समराम्गणें अत्यद्भुतें । कैं कोणाशीं त्या घडलीं ॥८॥धनुर्विद्या कीं मल्लविद्या । किंवा समर्थ द्वंद्वयुद्धा । धरी निर्वाणीं कोणा आयुधा । स्वरूप वदा मज त्याचें ॥९॥ऐकोनि वदे नारदमुनि । मेघश्याम पीतवसनी । पद्ममाळा पद्मलोचनी । समरांगणीं निरायुध ॥४१०॥मल्लयुद्ध करूं जाणे । द्वंद्वयुद्धाचीं लक्षणें । समरांगणीं पलायनें । करितां कोणें नावरिजे ॥११॥मोकळा हातीं शस्त्रघातीं । ऐकोनि क्षोभे म्लेच्छ दुर्मति । नारदें पुसोनि यवनाप्रति । मानसगति निघाला ॥१२॥येऊनि भेटला श्रीकृष्णासी । म्लेच्छोद्योग कथिला त्यासी । ऐकोनि कृष्णें निजमानसीं । महाविघ्नासि मानिलें ॥१३॥येरीकडे राजा यवन । ऐकोनि नारदाचें वचन । पुत्रा देऊनि राज्यासन । प्रवेशे वन वैराग्यें ॥१४॥त्यावरी कालयवन भूप । जिंकोनि प्रतापी वरिष्ठ नृप । यदुकुलदलनार्थ साटोप । खटाटोप सैन्याचा ॥४१५॥सहितसेनाप्रधान । तीन कोटि म्लेच्छसैन्य । धरूनि प्रचंड आंगवण । मथुरा येऊनि रोधिली ॥१६॥रुरोध मथुरामेत्य तिसृभिर्म्लेच्छकोटिभिः ।नृलोके चाप्रतिद्वंद्वो यदून्मत्वाऽऽत्मसंमितान् ॥४४॥मनुष्यलोकीं अप्रतिभट । आपणा मानूनि वीरभाट । यादव आपणा तुल्य बळिष्ठ । जाणोनि पापिष्ठ क्षोभला ॥१७॥तीन कोटि म्लेच्छसैन्य । सवें घेऊनि कालयवन । येऊनि प्रतापें मथुराभुवन । रोधिता जाला चहूंकडूनी ॥१८॥मथुरेभोंवते म्लेच्छनिकर । दुर्गलागी करिती क्रूर । अग्नियंत्रांचे महामार । बाणीं अपार वर्षती ॥१९॥सिंहनाद आस्फोटनें । मलाम्लेच्छांचीं गर्जनें । मथुरेभोंवतीं वनोपवनें । करिती खंडनें दहनादि ॥४२०॥ हाहाकार करिती सर्व । प्रलयावर्त्तीं पशु मानव । म्हणती कां पां वासुदेव । म्लेच्छदानव न वधी हा ॥२१॥म्लेच्छभयें त्रासले लोक । समरा न निघे यदुनायक । नगरीं नरनारींचा शोक । तैं स्मरजनक काय करी ॥२२॥तं दृष्ट्वाऽचिंतयत्कृष्णः संकर्षणसहायवान् ।अहो यदूनां वृजिनं प्रपतं ह्युभयतो महत् ॥४५॥तें देखोनि म्लेच्छबल । आणि नगरींचा हळकालोळ । परनिरोधें लोक विकळ । देखोनि घननीळ मनीं चिंती ॥२३॥संकर्षणसहायवंत । करिती उभयतां एकांत । म्हणती यादवां अकस्मात । विघ्न अद्भुत वोडवलें ॥२४॥अहो ऐसिया खेदेंकरून । हृदयामाजि रसरसून । महासंकट दोहीं कडून । म्हणती विघ्न अनुल्लंघ्य ॥४२५॥दोहींकडूनि संकट कैसें । कृष्णें विवरूनि स्वमानसें । अग्रजातें कथिलें जैसें । तें तूं परिसें परीक्षिति ॥२६॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP