मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५० वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ५० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५७ अध्याय ५० वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर करोरुमीना नरकेशशैवला ध्हनुस्तरंगायुधगुल्मसंकुलाः । अच्छूरिकावर्तभयानका महामणिप्रवेकाभरणाश्मशर्कराः ॥२६॥जानूपासूनि खंडित चरण । कटीपासूनि मांडिया छिन्न । कूर्परापासूनि करादि मीन । रक्त सरितांत तळपती ॥६७॥वीरमौळींचे केश बहळ । रक्तसरितांत तें शेवाळ । कार्मुकखंडित रंगपटळ । केवळ भासती वोसाणें ॥६८॥शस्त्रननराजें बुडती तळीं । काष्ठमुष्टि तरती जळीं । ऐशा अयुधगुल्मजाळी । रक्तखळालीं न चलती ॥६९॥वोडणें म्हणिजे अच्छूरिका । अंकभग्ना रथींच्या चाकां । तिहीं आवर्ती भयानका । सरिता अनेका रुधिराच्या ॥२७०॥महामणींचीं वाळुवटें । रत्नाभरणें शर्करातगटें । अमूल्य वैडूर्यें पाषाण गोटे । सरिताकांठें विराजती ॥७१॥रक्तनिम्नगा शतानुशता । ऐसिया भयंकरा भयभीता । त्यांचा कोण प्रवर्तविता । कुरुनरनाथा तो ऐकें ॥७२॥प्रवर्तिता भीरुभयावहा मृधे मनस्विनां हर्षकरीः परस्परम् ।विनिघ्नताऽरीन्मुसलेन दुर्मदान्संकर्षणेनापरिमेयतेजसा ॥२७॥भीरु म्हणिजे भ्याड जे प्राणी । तिहीं रक्तनदिया देखोनि नयनीं । त्रास पावोनि अंतःकरणीं । मूर्च्छित धरणीं ते पडिले ॥७३॥तोंडा आणूनियां फेंस । दीर्घ झांपडी लोचनास । भूतळीं घासती करचरणांस । स्मृति करणांस न सांवरे ॥७४॥मनस्वी जे वीरवाट । शूर संग्रामीं सुभट । रक्तसरिता पाहत्ती धीट । हर्ष उद्भट त्यां पोटीं ॥२७५॥पाहोनि रक्तांचे प्रवाह । वीरां वीरश्री उत्साह । मारिती परसेनासमूह । घेताती लाहो रणरंगीं ॥७६॥भ्याडां भयदा शूरां सुखदा । रणीं अपार रक्तनद्या । भिडतां परस्परा दुर्मदां । केल्या विशदा बळभद्रें ॥७७॥परमदुर्मदां शत्रूंप्रति । तेजिष्ठ अप्रमेय पुरुषार्थीं । मारितां मुसलघातीं । केल्या क्शिती रक्तापगा ॥७८॥ऐसा कथूनि समरोत्सव । रामकृष्णांचा वास्तव । महिमा वर्णी योगिराव । नाट्यलाघव दों श्लोकीं ॥७९॥बलं तदंगार्नवदुर्गभैरवं दुरंतपारं मगधेंद्रपालितम् ।क्षयं प्रणीतं वसुदेवपुत्रयोर्विक्रीडितं तज्जगदीशयोः परम् ॥२८॥कोमलशब्दें आमंत्रण । अंग म्हणोनि संबोधन । स्वयें व्यासाचा नंदन । नृपालागून संबोधी ॥२८०॥राया तेजें मागधबळ । क्षयाप्रति नेलें सकळ । तेंचि विशेषणीं प्रांजळ । परिसा केवळ श्लोकोक्त ॥८१॥अर्णवउपमा सर्वांपरी । मागधबळासि मुनिवैखरी । देऊनि वर्णी तत्साम्यचतुरीं । धिषणानेत्रीं विवरावें ॥८२॥अर्णव लंघनीं दुर्गमतर । आणि गर्जें भयंकर । दुःखें न पविजे अंतपार । प्रतीचीइंद्र ज्या रक्षी ॥८३॥तैसें दुर्गम मागधसैन्य । सुरनरां लंघनी अनंगवण । रनतुरांचा भीकर स्वप्न । बाहुस्फोटन सिंहनाद ॥८४॥अगाधविक्रमें अंतरहित । निःसीमत्वें पार वर्जित । मगधेंद्रवरुणप्रतिपाळित । अर्नववत यास्तव तें ॥२८५॥ऐसें दुर्गम मागधबळ । समरीं क्षया नेलें स अकळ । हा रामकृष्णांचा सहज खेळ । नव्हेचि तुंबळ पराक्रम ॥८६॥म्हणाल नव्हे कां पराक्रम । हेंही येथींचें ऐका वर्म । रामकृष्ण हे पुरुषोत्तम । अपर यांसम नर कैंचा ॥८७॥स्थित्युद्भवांतं भुवनत्रयस्य यः समीहतेऽनंतगुण्ह स्वलीलया । न तस्य चित्रं परपक्षनिग्रह्हस्तथाऽपि मर्त्यानुविधस्य वर्ण्यते ॥२९॥भुवनत्रयाचा स्थितिलयप्रभाव । स्वलीलेकरूनि वासुदेव । अनंतगुणीं पूर्णवैभव । चेष्टे स्वमेव स्वसत्ता ॥८८॥परपक्षाचें निग्रहण । तयासि करितां आश्चर्य कोण । म्हणाल तरी कां समरांगण । पर्रमाश्चर्यें वर्णिलें ॥८९॥कृष्ण ईश्वर हें साचार । तथापि नटला मर्त्यानुसार । तेथिंचें पौरुष शौर्यानुकार । कथिलें विचित्र निर्दुष्ट ॥२९०॥एवं मारूनि प्रबळ बळ । केला जरासंध निर्बळ । तथापिप धृष्ट आतुर्बळ । महाविशाळ पराक्रमी ॥९१॥जग्राह विरथं रामो जरासंधं महाबलम् । हतानीकावशिष्टासुं सिंहः सिंहमिवौजसा ॥३०॥निहतसैन्य अवशिष्टप्रान । जरासंधरहंवर भग्न । धरिता जाला संकर्षण । प्रतापें करून पुरुषार्थी ॥९२॥महामृगेंद्र मृगेंद्रातें । वनीं आकळी जेंवि पुरुषार्थें । तेंवि बलरामें मागधातें । धरूनि समरीं बांधिलें ॥९३॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP