मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४७ वा| श्लोक ६६ ते ६९ अध्याय ४७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ६९ अध्याय ४७ वा - श्लोक ६६ ते ६९ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६६ ते ६९ Translation - भाषांतर मनसो वृत्तयो नः स्युः कृश्णपादांबुजाश्रयाः । वाचोऽभिधायिनीर्नाम्नां कायस्तत्प्रह्वणादिषु ॥६६॥बल्लव म्हणती उद्धवराया । आमुच्या मनोवृत्ति अवघिया । कृष्णपादांबुजाश्रया । करीं कां सदया हरिवरें ॥५८॥कृष्णनामें आमुच्या वाणी । नित्य रंगोत हरिकीर्तनीं । कृष्णभावें भगवद्भजनीं । तनु अर्चनीं विलसतु या ॥५९॥याहूनि उद्धवा आमुच्या चित्तीं । अभीष्टप्रार्थना जे तुजप्रति । तेही सेवेसि करितों विनति । सुस्निग्धवृत्ती अवधारीं ॥७६०॥कर्मभिर्भ्राम्यमाणानां यत्र क्कापीश्वरेच्छया । मंगलाचरितैर्दानै रतिर्नः कृष्ण ईश्वरे ॥६७॥विविधा कर्मीं भ्रमतां आम्हां । ईश्वरेच्छेनें सात्वतोत्तमा । कोठें तरी आमुचा प्रेमा । कृष्ण परमात्मा आलिंगो ॥६१॥विविधा कल्याणरूपाचरणीं । तीर्थीं व्रतीं तपीं दानीं । आमुचा अनुराग कृष्णचरणीं । वसो निर्वाणीं मेळविता ॥६२॥कृष्णावेगळा परमेश्वर । आम्ही न मनूं हा निर्धार । कृष्णीं निरत अभ्यंतर । असो हा वर मागतसों ॥६३॥ऐसा उद्धव परोपरी । प्रार्थूनियां नम्रोत्तरीं । बोळविला तो मथुरापुरीं । कोणे परी प्रवेशला ॥६४॥एवं सभाजितो गोपैः क्रुष्णभक्त्या नराधिप । उद्धवः पुनरागच्छन्मथुरां कृष्णपालिताम् ॥६८॥शुक म्हणे गा कुरुनरपति । नंदादिवल्लवीं समस्तीं । उद्धव पूजूनि श्रीकृष्णभक्ती । मथुरेप्रति वोळविला ॥७६५॥रथ चालिला घडघडाट । केतु झलके लखलखाट । मागें बल्लव पाहती वाट । करिती बोभाट हरिस्मरणें ॥६६॥उद्धव परतोनि घालवी वसनें । देखूनि बल्लवीं केलीं नमनें । परस्परीं विपरीत गमनें । पूर्वपश्चिमें आदरिलीं ॥६७॥उद्धव आठवी कृष्णकथा । यशोदानंदाची अवस्था । गोपगोपींची विरहव्यथा । क्रमिलें पथा तत्स्मरणें ॥६८॥परतूनि आला मथुरपुरीं । येता देखोनि नागरीं । सर्व गर्जती जयजयकारीं । स्मरती वैखरी बळकृष्णा ॥६९॥मथुरापालक कृष्णनाथ । तेणें प्रजाजन सनाथ । अर्थ स्वार्थ आणि परमार्थ । चार्ही पुरुषार्थ वोळगती ॥७७०॥ऋद्धि सिद्धि राबती घरीं । वीथी झाडिती मुक्ति चार्ही । स्वयीं विश्वश्री कामारी । सौभाग्यथोरी कोण वदे ॥७१॥सुरवर सर्वत्र किंकर । काळ कृतांत घरटीकार । सूर्य सूचवी घटिकायंत्र । कर्म स्वतंत्र हरिआज्ञा ॥७२॥रामकृष्णादिनामगजरीं । सर्वविघ्नांची बोहरी । जार चोर दुराचारी । मथुराराष्ट्रीं नाढळती ॥७३॥दंड छत्रीं आतपत्रीं । सुमना बंधनें सुमनहारीं । त्रास दुंदुभिताडनप्रहारी । जैत्यहारीं बुद्धिबळीं ॥७४॥घरोघरीं हरिकीर्तनें । सर्वां वदनीं नामस्मरणें । अतिथि गोविप्रपूजनें । परोपकरणें प्रिय सर्वां ॥७७५॥ऐसी कृष्णें पाळिली मथुरा । उद्धव प्रवेशला सत्वरा । यान निरोपूनि मंदुरा । राजमंदिरा पातला ॥७६॥कृष्णाय प्रणिपत्याऽह भक्त्युद्रेकं व्रजौकसाम् । वसुदेवाय रामाय राज्ञे चोपायनान्यदात् ॥६९॥उग्रसेनातें जुहारून । नमिले वसुदेवरामकृष्ण । सर्वसदस्यां अभिवंदन । नम्रमौळें पैं केलें ॥७७॥उपायनमिसें आणिला कर । नृपा अर्पिला तो समग्र । नानापदार्थ अळंकार । पृथगाकार अर्पिले ॥७८॥वसनाभरणें वसुदेवासी । नंदें दिधलीं मित्रत्वेंसीं । पुत्रभावें बळरामासी । नानावस्तु अर्पिलिया ॥७९॥यज्ञूदेनेनं देवकीप्रति । सौभाग्यद्रव्यें दिधली प्रीति । आनेक वस्तु नृपसंपत्ति । त्या त्या निगुती पावविल्या ॥७८०॥स्वमुखें व्रजींची कथूनि वार्ता । आज्ञा घेऊनि उठिला त्वरिता । खुणावूनियां कृष्णनाथा । मग एकांता पातले ॥८१॥नमूनि कृष्णपपदारविंद । सम्मुख बैसवूनि मुकंद । विरहोत्कंठितबल्लवीवृंद - । कृतसंवाद निरूपिला ॥८२॥व्रजौकसांचा भक्त्युद्रेक । नंदयशोदेचा शोक । संवगडियांचें वियोगदुःख । ऐकोनि नावेद हरि विरमे ॥८३॥मग परिमार्जूनियां नयन । उद्धवातें विसर्जून । भक्तवत्सल श्रीभगवान । द्रवे कारुण्यें हृत्कमळीं ॥८४॥भक्तभावार्थें बांधलल हरि । भक्तानिमित्त अवतार धरी । भक्तपरतंत्र मुरारि । झुरे अंतरीं तत्प्रेमें ॥७८५॥कुरुनरचकोरसुधाकरा । ऐकें परीक्षिति भूवरा । जो कां दुर्लभ मुनिसुरअसुरां । तो सोपारा भक्तांसी ॥८६॥श्रुतींसी ज्याचा न लगे शोध । तयासै भक्तीं लाविलल वेध । प्रेमळ विरहें करी खेद । ऐसा अगाध भक्तिमहिमा ॥८७॥यूगयागीं न लभे तपीं । भक्तिप्रेमें ते वस्तु सोपी । साध्य न करी तो नर पापी । अनेक कल्पीं भवदुःखी ॥८८॥ऐसें रायासी सांगोनि शुक । पुढील कथेचा विवेक । हृदयीं विवरी तो नावेक । श्रोतीं सम्यक पारिसावा ॥८९॥सैरंध्रीचें मनोरथ । आधीं साधूनि मुख्य कार्यार्थ । पुरवीन ऐसें श्रीकृष्णनाथ । वदला यथार्थ तें करील ॥७९०॥त्यानंतरें अक्रूरसदना । जाऊनियां यादवराणा । अक्रूरा देऊनि समाधाना । धाडील हस्तिनापुरासी ॥९१॥इतुकी कथा वक्ष्यमाण । श्रोतीं सादर कीजे श्रवण । कलिकल्मषनिर्दलन । स्वयें श्रीकृष्ण कैंपक्षी ॥९२॥एकाजनार्दनश्रीमंत - । सादनीं सेवक श्रीकृष्णनाथ । भक्तिप्रेमाचा वृत्तांत । दावी समर्थ कळिकाळीं ॥९३॥एकनाथाचें कृपापात्र । चिदानंद अनन्य छात्र । त्तेणें स्वानंद स्वतंत्र । आत्मतंत्र प्रबोधिला ॥९४॥स्वनंदकृपेचें गौरव । तो सद्गुरु गोविंदराव । तेणें भरिला दयार्णव । पादप्रभवसुधाजळें ॥७९५॥तें हें श्रीमद्भागवत । अठरा सहस्र संख्यामित । परमहंसांचा एकांत । शुकप्रणीत श्रुतिसार ॥९६॥दशमस्कंध परमहस्य । भगवल्लीलासुधारस । अध्याय सप्तचत्वारिंश । उद्धव मथुरेस पातला ॥७९७॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां भ्रमरगीतगोपीप्रबोध्नोद्धवमथुराभिगमनं नाम सप्तचात्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४७॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ओव्या ॥७९७॥ श्लोक ॥६९॥ एवं संख्या ॥८६६॥ ( सत्तेचाळिसावा अध्याय मिळून ओवी संख्या २१७५६ )सत्तेचाळिसावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP