मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४७ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ४७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ६९ अध्याय ४७ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर अपि बत मधुपुर्यामार्यपुत्रोऽधुनाऽस्ते स्मरति स पितृगेहान्सौम्य बंधूंश्च गोपान् ।क्कचिदपि स कथा नः किंकरीणां गृणीते भुजमगुरुसुगंधं मृर्ध्न्यधास्यत्कदा नु ॥२१॥अरे सौम्या भ्रमरावर्या । सारूनि गुरुकुळींची परिचर्या । आतां वसति वृष्णिधुर्या । मधुरापुरीं असे कीं ॥६४॥मथुरापुरीं वर्तमान । आर्युपुत्र वसुदेवनंदन । कांहीं तरी नंदसदन । व्रजजनभुवन स्मरतसे ॥२६५॥नंदयशोदेचें स्मरण । कीं स्वबंधु गोपगण । यमुनापुलिनीं गोवर्धन । करी आठवण कधीं तर्ही ॥६६॥कोण्हे एके तर्ही समयीं । आम्हां किंकरींची कांहीं । कथवार्ता आपुले ठायीं । वदतो कांहीं कोणापें ॥६७॥कधीं तर्ही परावृत्ति । करूनि येईल व्रजाप्रति । पूर्वस्नेहाची अनुस्मृति । आम्हां विश्रांति करील ॥६८॥अगुरुपरीस सुगंधतर । आपुला भुज सुमनोहर । आमुचे मूर्ध्नींवरी सादर । कधीं श्रीधर ठेवील कीं ॥६९॥आपुले तांबूल आमुचे वदनीं । केव्हां तर्ही तो चक्रपाणि । घालील ऐसी अमृत वाणी । आमुचे कानीं घालीं कां ॥२७०॥श्रीशुक उवाच - अथोद्धवो निशम्यैवं कृष्णदर्शनलालसाः । सांत्वयन्प्रियसंदेशैर्गोपीरिदमभाषत ॥२२॥कायवाचामनोभवें । कृष्णदर्शन प्राप्त हुआवें । याहूनि अवघे संसारमावे । माजूनि मानिनी निर्मुक्ता ॥७१॥ऐसा गोपींचा भ्रमरगीत । उद्धवें परिसोनि इत्थंभूत । त्यांचा सप्रेम वृत्तांत । कृष्णीं निरत जाणवला ॥७२॥कृष्णवेधें वेधल्या वृत्ति । तेणें विसरल्या संसारभ्रांति । सबाह्य बानली कृष्णप्रतीति । उद्धवा चित्तीं दृढ कळलें ॥७३॥मग तयांच्या सांत्वनासी । उद्धवें विवरूनि निजमानसीं । बोलिला तें नृपापासीं । आह्लादेसीं शुक सांगे ॥७४॥कठोर व्रजमणीचें आंग । वेधक वज्रशलाकाचि चांग । तैसा कृष्णवेधें प्रसंग । सांत्वना योग्य कृष्णोक्ति ॥२७५॥कृष्ण गोपींचा प्रियतम प्राण । त्याचे संदेश परम प्रमाण । ऐसें उद्धवें विवरूनि पूर्ण । हें भाषण आदरिलें ॥७६॥सहा श्लोकीं तें निरूपण । शुकें नृपासि कथिलें पूर्ण । तेंचि हरिवरदभाषाकथन । कीजे श्रवण सज्जनीं ॥७७॥उद्धव उवाच - अहो यूयं स्म पूर्णार्था भवत्यो लोकपूजिताः । वासुदेवे भगवति यासामित्यर्पितं मनः ॥२३॥अहो ऐसें आश्चर्य परम । तुमचें मानस मेघश्याम । होऊनि विसरलें संसारश्रम । प्रेमसंभ्रम सौभाग्यें ॥७८॥तुमच्या वृत्ति कृष्णाकारा । यास्तव कृतार्था प्रेमनिर्भरा । लोकपूज्या सनकादिवरां । तुम्ही विधिहरां पूज्यतमा ॥७९॥विश्वनिवास वासुदेव । तोचि लीलावसुउदेवप्रभव । षड्गुणैश्वर्य अच्युतविभव । तुमचा सद्भाव तच्चरणीं ॥२८०॥यालागीं तुम्ही परम पूता । ब्रह्मादि षड्गुणैश्वर्य अच्युतविभव । पूज्या पूज्यतमा पूर्णार्था । सत्संगता हरिप्रेमें ॥८१॥ते हे आत्यंतिकी भक्ति । परम दुर्लभ जिची प्राप्ति । आकल्प साधनाची संपत्ति । तैं लाहती तुम्हां ऐसे ॥८२॥म्हणाल कैसीं तियें साधनें । ऐका तयांचीं स्वरूपज्ञानें । भाग्यें फळतीं अविघ्न पुण्यें । निर्वाणभजनें ऐसीं तैं ॥८३॥दानव्रततपोहोमजपस्वाध्ह्यायसंयमैः । श्रेयोभिर्विविधैश्चान्यैः कृष्णे भक्तिहिं साध्यते ॥२४॥दानें व्रतें तपें तीव्र । नित्य नैमित्त होमाध्वर । स्वाधायजपादि संयमपर । शौचाचारपूर्वक ॥८४॥नवविधभजन निष्ठा नेम । तीर्थयात्रा अनुक्रम । माता पिता द्विजसत्तम । गुरुपदप्रेम उपासना ॥२८५॥इत्यादिसाधनें श्रेयस्करें । निश्काम भगवत्प्राप्तिकरें । भूतदयादि विविधें अपरें । पुण्यप्रचुरें बहु जन्मीं ॥८६॥इहामुत्रप्रदें साधनें । तें फळ साक्षेपें काम्यें गौणें । निषिद्धें आसुरें अशौचाचरणें । नरकयातनें भोगविती ॥८७॥भगवत्प्राप्तिकरें पुण्यें । फळतीं निष्कामें साधनें । ऐका तयांचीं लक्षणें । पदव्याख्यानें कथिजत्ती ॥८८॥जें जें दातव्य त्या नांव दान । तेथील शुद्ध विधि विधान । निगमपरायण तपस्वी पूर्ण । दानभाजन शुद्धात्मा ॥८९॥प्रत्युपकरणाचिया शब्दा । न करी प्रस्ताव अनुमोदा । कायावाचामानसें कदा । खेदानंदा स्पर्शेना ॥२९०॥दानपात्र लाहोनि ऐसे । चित्तशुद्धि देशविशेषें । पुण्यकाळीं ईश्वरोद्देशें । दानें अशेषें निष्कामें ॥९१॥संपत्तिसंपन्न असतां पूर्ण । यथोक्तपात्रीं नित्यदान । नैमित्तिकीं विशेषें करून । कीं याच्यामान सत्पात्रें ॥९२॥लाहूनि निर्दोष द्रव्यसंपत्ति । भगवद्भावें सप्रेम भक्ति । पात्रगौरव यथास्थिति । सत्कार उचितीं समर्पन ॥९३॥दान शब्दाचा विवेक । दान म्हणिजे मदोदक । तें अष्टधा पृथक पृतक । संकल्पपूर्वक सोडणें ॥९४॥स्वसत्तेतें निवर्तवणें । पात्रसत्ता उत्पादनें । इदं ते न मम इत्यादि वचनें । प्रतिगृह्यतां गृह्णामि ॥२९५॥वेदवेत्ता तपोहीन । तये ठायीं पात्रता गौण । अनाध्यायी तपस्वी पूर्ण । तोही गौण पात्रात्वीं ॥९६॥वेदाध्यायी आणि तपस्वी । वेदोक्तकर्माचरणपदवी । संतुष्टमानस सर्वभावीं । तैं त्या शोभवी पात्रता ॥९७॥नामगोत्र शाखाध्ययन । परस्परें उच्चारून । प्रतिगृह्यतां प्रतिग्रहणं । त्यागादान उभयत्र ॥९८॥ऐसिया रीती गोभूतिळ । कांचन वसनें धान्यें सकळ । अश्वगजरथफलदलजळ । सोक्ष्मस्थूळअन्नादि ॥९९॥यथायोग्य पात्रानुरूप । संपन्न द्रव्य अल्पस्वल्प । यथाधिकारें कृतसंकल्प । निष्कामकल्प सर्वत्र ॥३००॥अधीताहूनि तदनुष्ठाता । त्याहूनि श्रेष्ठ आत्मवेत्ता । वेदवेदान्तपारंगता । शांता विरक्ता पात्रत्व ॥१॥कायावाचमनें करून । संकल्पिलें नेदी दान । त्याचें आकल्प नाशे पुण्य । पापसंपन्न तो होय ॥२॥जेत्थ पात्र आशाबद्ध । दास्यासि बोधे परुषवाद । अथवा दाता द्रव्यलुब्ध । देऊनि खेद मग मानी ॥३॥तयां उभयां नरकावाप्ति । ऐसी धर्मवादव्युत्पत्ति । एवं प्रतिश्रुत जे नेदिती । ते अधःपाती सर्वत्र ॥४॥तैसिचि जाणा दत्तापहारी । नरकवासी आकल्पवरी । दानीं ऐसी दोषसामग्री । निरयाधिकारी करीतसे ॥३०५॥ईश्वरकृपावरदबळें । देश काळ पात्र मिळे । द्रव्य शुद्ध चित्तें अमळें । विनियोग कळे यथोचित ॥६॥येरवीं कोण्हीएक अंग । न्यून असतां होय व्यंग । तें तत्सदादिमंत्रें सांग । कीजे अव्यंग हरिस्मरणें ॥७॥परंतु अवंचक सप्रेमळता । निष्कामप्रेमें श्रीभगवंता । भजतां कर्मासि साद्गुण्यता । येरां विगुणता ठेविली ॥८॥भगवत्प्राप्तीचीं साधनें । ऐसीं सुसंपन्नें दानें । हरिहरव्रतें निष्कामपुण्यें । येरे गौणें सकामें ॥९॥पतिव्रता वरिल्या पति । तन्निष्ठव्रताचरणीं मति । तैसी निष्ठा अंगीकृतीं । व्रतसंपत्तिपूर्वक ॥३१०॥येर्हवीं व्रतें तीनसेंसाठी । कळिकाळाच्या सुभगांपाठीं । लागली तयांची राहटी । कोणे कोटी माजि गणिजे ॥११॥एक्या घायें पाविजे मरण । तरी कां धुंडिजे अवघें रण । तारक एक व्रताचरण । वृथा विचरण सैराट ॥१२॥रुक्मांगदें एकादशी । एकचि साधिली निश्चयेंसीं । कीं अंबरीषें द्वादशी । कृतनियमेंसीं वरियेली ॥१३॥कीं कौंडिन्यें अनंतव्रत एकचि । करूनि जाला पूत्त । अनेकव्रताचर्रनपंथ । विषपोटार्थ कळिकाळीं ॥१४॥दीक्षाग्रहण औपासन । गुर्वाराहन पितृभजन । अतिथिपूजन पतिसेवन । नियमें वरून व्रत कीजे ॥३१५॥एवं जें जें अंगीकृत । कायवाचामनेंसहित । नियमपूर्वक दृढव्रत । हरिप्रीत्यर्थ निष्काम ॥१६॥ऐसीं व्रतें जीवें साठी । करूनि आचरतां भगवत्तुष्टी । वांचोनि कामनेची गोष्टी । सहसा पोटीं न धरती ॥१७॥तें इयें निष्कामव्रताचरणें । आतां तपाची लक्षणें । तेंही ऐका निरूपणें । यथाव्याख्यानें कथिजती ॥१८॥दृढ नेमें जें वरिलें व्रत । तें आचरिजे अतंद्रित । हाचि तपशब्दाचा अर्थ । पृथक् किमर्थ वाकाणूं ॥१९॥कायावाचामनें करून । त्रिविध तपाचें लक्षण । ईश्वरनिष्ठा तनुशोषण । निष्कामपुण्य लक्षूनी ॥३२०॥तेचि तनुशोषणाची परी । कृच्छ्रचांद्रायणाची परी । निरूपिजेल ग्रंथाधारीं । चमत्कारीं अतिस्वल्प ॥२१॥एके दिवशीं एकभुक्त । दुसरे दिवशीं कीजे नक्त । तृतीय दिवह्सीं अयाचित । केवळ चतुर्थ उपोषण ॥२२॥या नाम बोलिजे पातकृच्छ्र । पर्णकृच्छ्राचा प्रकार । श्रोतीं होऊनि सादर । सविस्तर परिसावा ॥२३॥वट उंबर राजीव बिल्व । क्रमेंकरूनि यांचे पल्लव । कुशोदकपानें पांचवा देव । कीजे निर्वाह पर्णकृच्छ्रीं ॥२४॥पेंडीभक्षण एके दिवसीं । एकांतरें शुद्धोपवासीं । क्रमें उदकतक्रसवतूशीं । दिनाष्टकेंसीं सौम्यकृच्छ्र ॥३२५॥प्रातस्त्रिदिन हविशान्न । त्रिदिन सायं हविर्भोजन । त्रिदिन अयाचित हविपान्न । त्रि उपोषण मध्यकृच्छ्र ॥२६॥ग्रासमात्र प्रभाते प्रथम । द्वितीय सायाह्नीं तितुकाचि नेम । ग्रास एक अयाचित धर्म । तृतीय दिवशीं भक्शणें ॥२७॥चतुर्थादिवशीं उपोष्बण । अतिकृच्छ्राचा एक चरण । अपर अतिकृच्छ्रलक्षण । श्रोते विचक्षण परिसतु ॥२८॥एकैक ग्रास प्रातस्त्रिदिन । तैसेंचि एकैक सायं त्रिदिन । अयाचित एकैक ग्रास त्रिदिन । त्रि उपोशण अतिकृच्छ्र ॥२९॥प्रातस्त्रिदिन हविर्भोजन । तैसेंचि सायाह्नीं त्रिदिन । त्रिदिन अयाचित हविपाशन । त्रि उपोषण प्राजापत्य ॥३३०॥एक दिवशीं गोमूत्रपान । द्वितीय दिवशीं गोमयाशन । तृतीय दिवशीं गोक्षीरग्रहण । दधिसेवन चतुर्थीं ॥३१॥गोघृताशन पंचमेहनि । षष्ठीं कुशोदक प्राशूनी । एक रात्र उपोषणीं । कृच्छ्रसांतपन या नांव ॥३२॥शुक्लपक्शीं एकैक ग्रास । पूर्णिमेपर्यंत कीजे र्हास । तेथून वर्धविजे ग्रासांस । अमावास्येस परिपूर्ति ॥३३॥हा एक चांद्रायणाचा पक्ष । अपर पूर्णिमेपासूनि लक्ष । ग्रासा र्हास करिती दक्ष । पुनः सपएक्ष पूर्णिमा ॥३४॥असो कृच्छ्रीं चांद्रायणीं । पश्चात्तापें तनुशोषणीं । तपश्चर्या करिती मुनि । चित्तशोधन प्रवर्तती ॥३३५॥ज्ञानें होय मलक्षालन । अन्न शुद्ध सत्यें करून । विद्या तपें तनुशोषण । चित्तशोधन सत्कर्में ॥३६॥ज्ञानें होय बुद्धि शुद्ध । इत्यादि स्थूलतपोनुवाद । अधिकार उजळलिया दुःखद । सहसा विरुद्ध मग न रुचे ॥३७॥एकनिष्ठ भगवद्रति । ते काळींची तपःसंपत्ति । कायिका वाचिक मानसगति । तपोभिव्यक्ति गुणभेदें ॥३८॥शैवी वैष्णवी उपासना । तदर्थ करितां कर्माचरणा । नियमपूर्वक तनुशोषणा । कायिक संज्ञा त्या होय ॥३९॥कीं गुरुगृहींचा परिचारक । होऊनि परिचर्या सम्यक । एकनिष्ठा निष्कामुक । हेंही कायिक बोलिजे ॥३४०॥आणि गुरुसमान जे जे प्राज्ञ । त्यांचें कीजे दास्याचरण । सर्वभावें विप्रार्चन । परोपकरण सर्वत्र ॥४१॥नित्य नैमित्त शौचाचारें । ब्रह्मचर्यादि व्रतनिर्धारें । भूतदया सरलांतरें । निर्विकारें तपोनिष्ठा ॥४२॥ऐसें शुद्ध कायिक तप । ईश्वरप्राप्तीचा संकल्प । अन्य कामना नुपजे अल्प । वाद्मयजल्प तो ऐका ॥४३॥प्राणिमात्रांचें ज्यामाजि हित । शंकाभयोद्वेगरहित । जगत्प्रियकर आणि सत्य । परमार्थ सुनिश्चित मितवाक्य ॥४४॥द्विजालागीं श्रुतीचें पठन । सामान्यवर्णा स्तोत्रपुराण । कीं एकनिष्ठ नामस्मरण । कामनाशून्य अविकारे ॥३४५॥या नांव बोलिजे वाड्मय तप । शरीरक्लेशीं न करितां अल्प । ईश्वरप्राप्तीचा उजळी दीप । जेंवि सुरपादप कृषिरहित ॥४६॥मानसतपाचें लक्षण । निर्विकार सुप्रसन्न । आपणा लक्षूनि आपण । निश्चळ उन्मन पूर्णत्वें ॥४७॥इक्षूपासूनि निवडला रस । खंडपर्यंत विकारविशेष । मग जे मिष्ठताचि निःशेष । तेंवि मानससौम्यता ॥४८॥इंद्रियव्यापार मांदुळती । मुनिमर्यादामौनवृत्ति । सबाह्य प्रकटे आत्मस्थिति । बाह्यप्रकृति नुमसतां ॥४९॥आत्माकारकरित मन । आत्मारामचि सुखसंपन्न । भावाभावसंकल्पशून्य । मानससाधनतप ऐसें ॥३५०॥मखजपसंयमस्वाध्याय । अन्य विविध श्रेयोपाय । अनंत जन्में साधितां होय । साध्यभक्ति श्रीकृष्णीं ॥५१॥उद्धव म्हणे गोपींप्रति । ऐसी आत्यंतिकी भक्ति । अनंतजन्मकृतसुकृतीं । तुम्ही श्रीपति अनुभविला ॥५२॥श्रोते शंका करिती येथ । होमस्वाध्यायदनादि व्रत । वर्णविशेषें पुरुषांसि उक्त । स्त्रिया येथ अनर्हा ॥५३॥तरी जायापरिग्रह असे ज्यांसी । तेचि अधिकारी ग्रुहमेधासी । तेथींच्या अच्छिद्र सुकृतासी । दंपतीसि अधिकार ॥५४॥म्हणोनि गोपींचीं सुकृतें । उद्धवें अनुमानिलीं तियें सत्यें । निष्कामकर्में जन्में बहुतें । तैं सप्रेमभरितें हरिभक्ति ॥३५५॥व्रजवनितांतें उद्धव म्हणे । ऐसी अगाध तुमचीं पुण्यें । भूतभविष्यवर्तमानें । कोण्ही तुलने न तुलती ॥५६॥भगवत्युत्तमश्लोके भवतीभिरनुत्तमा । भक्तिः प्रवर्तिता दिष्ट्या मुनीनामपिप दुर्लभा ॥२५॥उत्तमश्लोक श्रीभगवान । अतितर श्रेष्ठ तत्प्रेम गहन । तुमच्यय अदृष्टपुण्येंकरून । असाध्यसाधन हें घदलें ॥५७॥येर्हवीं ऐसी दुर्लभ भक्ति । निसर्गजनित भगवद्रति । अनन्तजन्मार्जितसुक्रुतीं । त्या मुनींहीप्रति दुर्लभ पैं ॥५८॥अदृष्टपुण्य म्हणाल कैसें । तें कथिजेल दैवविशेषें । जेणें तोडिले भवसुखफांसे । स्वस्थमानसें तें परिसा ॥५९॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP