मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४७ वा| आरंभ अध्याय ४७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ६९ अध्याय ४७ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीकृष्णपरब्रह्मणे नमः ॥ षड्गुणांचें अधिष्ठान । गोविंदसद्गुरु श्रीभगवान । भवीं बुडतां मादृशदीन । तदुद्धरणा अवतरसी ॥१॥तव यश गाती निगमागम । शेषविरंचिमुनिसत्तम । हरिहरसुरवर पादपद्म । नमिती सप्रेम स्वसुखार्थ ॥२॥पायाभ्रमभर भवाची वाडी । वेली वाढतां चढोवढी । सृष्टिस्थितिलय स्वकार्य ओढी । भरली भवंडी अभिमानें ॥३॥विसरोनि आंगींची एकात्मता । प्रकृतिगुणीं निबद्ध होतां । भेदें पसरे अनेकता । हे क्षोभकता गुणांची ॥४॥तया गुणक्षोभापासून । मुक्त करिसी प्रबोधून । यालागीं हरिहरकमलासन । सुरमुनिगण यश गाती ॥५॥मोक्षश्रीचा कल्पद्रुम । ईश्वरा करिसी पूर्णकाम । यालागीं शक्तीसि श्रीपदप्रेम । बोधी निःसीम परिचर्या ॥६॥तुझें उदारत्व कोणा । न तुळे कैवल्यकृपाघना । न कडसितां थोरां लहाना । साम वदान्या वर्षसी ॥७॥जीवत्वावदशा दवडूनी । संपन्न करिसी ईश्वरपणीं । कीं जीवेश्वराची आटणी । ब्रह्मनिर्वाणीं समरसतां ॥८॥इंद्रियद्वारा विश्व अशेष । उमाणी धरूनि विषयसोस । तों विपरीत ज्ञानें चिदाभास । मानी विशेष चिद्भासा ॥९॥तुझें ज्ञान नोहे तैसें । येणें त्रिपुटी निःशेष पुसे । ज्ञेय ज्ञान ज्ञाता ऐसें । कोण उमसे ते ठायीं ॥१०॥वास्तवबोधें ब्रह्मानंद । त्रिपुटीवर्जित जो अभेद । अमृतत्वीं अमृतस्वाद । हें ज्ञान विशद तव कृउपा ॥११॥जया ज्ञानाचिया उजिवडें । ईश्वरही स्वकार्य मानी उबडें । मुरडोनि स्वानंदडोहीं बुडे । मग अनिवडे साक्षित्वें ॥१२॥जें या ज्ञानाचें भाजन । तें वैराग्य तुझें गहन । मिथ्या कळल्या विवर्तभान । रंगे कोण ते ठायीं ॥१३॥स्वप्नप्रियेचा सुरतानंद । सुशुप्तिभ्रमामाजि विशद । जागृति येतां चिळसीप्रद । विषयस्वाद तेंवि भवीं ॥१४॥मिथ्याविवर्तप्रतीति । ज्ञानी निश्चय करी वसती । तैं ब्रह्मांडगर्भितविषयविरक्ति । भेदोपहतीमाजि मिरवे ॥१५॥एवं यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य मिरवी धैर्य । तें तव सत्तेचें ऐश्वर्य । त्रैलोक्यधुर्य धुरंधरा ॥१६॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । गोमयवेत्ता आब्रह्मभुवन । असद्बोधातें निरसून । सद्बोधपूर्ण सद्गुरु तूं ॥१७॥अचिंत्यैश्वर्य अपार । तें वर्णिलें षड्गुणाकार । षण्णाम जो भग उच्चार । तो भगवान्साचार गुरुवर तूं ॥१८॥मादृशदीनाचिये करुणे । जाकळोनियां अवतार धरणें । तें षड्गुणांचीं अळंकरणें । विश्वीं प्रकटणें तनुविभवीं ॥१९॥अनेक जन्म निष्कामभजनीं । जिहीं केलासि सेवाऋणी । तयां सभाग्यांच्या ऋणोत्तीर्णीं । सद्गुण लेवूनि अवतरसी ॥२०॥तेव्हां जगदघभ्रमांधकार । निरसूनि चिद्बोधदिवाकर । प्रकट होतां जगदुद्धार । हा बडिवार बिरुदाचा ॥२१॥माझा कारुण्यकलवळा पोटीं । म्हणोनि अद्वैतबोधहातवटी । सप्रेमभजन अभेदगोठी । टीका मर्हाठी हरिवरदा ॥२२॥वाखाणवितां सधमस्कंधा । त्यामाजि उद्धवें नंदयशोदा । प्रबोधिलीं तो अध्याय समुदा । शेचाळिसावा संपला ॥२३॥यावरी सत्तेचाळिसावा । अध्याय आरंभिला बरवा । प्रज्ञाप्रकाशें सिद्धी न्यावा । हें गुरुदेवा प्रार्थितसें ॥२४॥अतिदुर्बोध भ्रमरगीत । परमरहस्यचातुर्यभरित । परमहंसीं रमिजे जेथ । श्रुतिसिद्धांत सद्भक्ति ॥२५॥नंदद्वारीं देखोनि रथ । गोपी वितर्किती समस्त । तंव पातला उद्धव तेथ । प्रातःस्नानकृताह्निक ॥२६॥श्रीकृष्णाच्या गुह्यगोठी । विशेष अध्यात्मपरिपाठीं । सम्यक बोधूनि व्रजगोरटी । येईल भेटी कृष्णाचे ॥२७॥तेथ उद्धवातें देखून । निवाले व्रजवधूंचे नयन । तयाचें रूपलावण्य पूर्ण । नृपा कथन करी शुक ॥२८॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP