मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४७ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ४७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ६९ अध्याय ४७ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर दिष्ट्या पुत्रान्पतीन्देहान्स्वजनान्भवनाति च । हित्वाऽवृणीत यूयं यत्कृष्णाख्यं पुरुषं परम् ॥२६॥पुत्रासाठीं घेती गळ । पायीं तुडविती इंगळ । व्रतें उपवास स्थळोस्थळ । करिती चिरकाळ बहुनेमें ॥३६०॥देवद्वारीं घेत्ती धरणें । नागबळी घालिती राहणे । ऐसे यत्न पुत्राकारणें । स्नेहबंधनें प्रसवलिया ॥६१॥ऐसा पुत्रस्नेह कठिन । दैवबळें तो खंडून । तुम्ही पावलां श्रीकृष्ण । पूर्वसाधनयोगबळें ॥६२॥पतीपासूनि विषयसुख । इहलोक आणि परत्र देख । संतति संपत्ति सांसारिक । बंध निष्टंक सस्त्रिग्ध ॥६३॥त्या पतिस्नेहपाशाचा भंग । करूनि पावलां श्रीरंग । पूर्वसुउकृतसाधन सांग । दैव चांग यास्तव हें ॥६४॥आपला देह असतां बरवा । अधिकारसंसारगौरवा । रूपलावण्यभूषणभावा । सर्व वैभवा मंडन जो ॥३६५॥त्या देहाचें प्रेम गहन । मुनीश्वरांही न सुटे जाण । तुमच्या पूर्वसुकृतेंकरून । तनुविस्मरण दैवबळें ॥६६॥माता पिता सासू श्वशुर । भाऊ बहिणी भावे देवर । व्याही जामात सुहृद अपर । मोह दुस्तर पैं यांचा ॥६७॥लज्जेसाठीं देती प्राण । तया सुहृदवर्गा लंघून । तुम्हीं टाकिला श्रीभगवान । दैव गहन हें तुमचें ॥६८॥ प्राणा पढियंतीं मंदिरें । स्नेहें कवळिलीं अत्यादरें । बांधतां तत्स्नेहाच्या दोरें । तुम्ही सत्वर निष्ठलां ॥६९॥याचिमाजि घनगोधनें । ऐशीं सप्तविध बंधनें । तुम्हीं छेदूनि निष्ठुरमनें । भगवद्ध्यानें वेधलां ॥३७०॥जो कां परमपुरुष भगवान । तो हा नंदाचा नंदन । नामें म्हणती ज्या श्रीकृष्ण । तुम्हीं संपूर्ण तो वरिला ॥७१॥ज्या कारणास्तव कृष्णीं रति । ते पूर्वार्जित दैवसंपात्त्ति । भाग्यें वरिला जगत्पति । मज विश्रांति तद्योगें ॥७२॥सर्वात्मभावोऽधिकृतो भवतीनामधोक्षजे । विरहेण महाभागा महान्मेऽनुग्रहः कृतः ॥२७॥पतिपुत्रादि स्वजन धन । यातें आत्मत्वें कवळी मन । सर्वात्मभावे एकवटून । तुम्हीं भगवान वरियेला ॥७३॥अक्षजज्ञान ज्याहूनि अध । तो अधोक्षज अगाधबोध । त्याच्या ठायीं साधनसिद्ध । एकान्तभक्ति लाधलां ॥७४॥विरहव्यंगोक्त सुखाची वाजी । प्रसंगें महदनुग्रह आजी । मजवरी संतुष्टोनि श्रीभगवंतें । संदेशनिरूपणाच्या अर्थें ॥३७५॥अनंतजन्मार्जित सुकृतें । मजवरी संतुष्टोनि श्रीभगवंतें । संदेशनिरूपणच्या अर्थें । मजलागिं येथें पाठविलें ॥७६॥तुम्ही प्रसंगें विरहवार्ता । मजवरी अनुग्रह केला पुरता । आतां एकांतगोष्टी भर्ता । वदला तत्वता त्या ऐका ॥७७॥श्रूयतां प्रियसंदेशो भवतीनां सुखावहः । यमादायागतो भद्रा अहं भर्तू रहस्करः ॥२८॥भद्रा म्हणिजे कल्याणमूर्ति । भगवत्संगमलब्धा सती । तुमचा प्रियतम जो श्रीपति । तेणें मजप्रति प्रेरिलें ॥७८॥त्याचा एकान्त गुह्य वृत्तांत । तुम्हांसि सुखावह परमामृत । जो मी घेऊनि आलों येथ । देऊनि चित्त तो ऐका ॥७९॥येथ शंकों नका कांहीं । रहस्य वदतां ऐकतां पाहीं । मजहूनि रहस्यवक्ता नाहीं । म्हणोनि ये ठायीं धाडिलें ॥३८०॥मी स्वामीचा रहस्यकर । यास्तव मम मुखींचें उत्तर । तें कृष्णोक्तिचि साचार । जाणोनि सादर परिसा हो ॥८१॥श्रीभगवानुवाच - भवतीनां वियोगो मे न हि सर्वात्मना क्कचित् ।यथा भूतानि भूतेषु खं वाय्वग्निर्जलं मही ॥तथाऽहं च मनःप्राणभूतेंद्रियगुणाश्रयः ॥२९॥व्रजललनांतें शेषशायी । म्हण तुमचा मजसीं कांहीं । विवेकें पाहतां वियोग नाहीं । ऐका तेही विवंचना ॥८२॥काय म्हणोनि वियोग न घडे । ऐसी शंका करणें घडे । मी सर्वात्मा कोण्या पाडें । हें निवाडें उमजा हो ॥८३॥जें जें उपादानकारण । याचा तत्कार्येंशीं जाण । वियोग म्हणतां पडे मौन । अभेद म्हणोनि वनिता हो ॥८४॥हेम आत्मा सर्व नगां । तीय आत्मा सर्व तरंगां । माती आत्मा घटमठलिंगा । तेंवि मी जगा जगदात्मा ॥३८५॥आत्मा शब्दें बोलिजे देह । तो सर्वात्मा मीच होय । कीं मनोबुद्धिजीवसमूह । चैतन्यविग्रह तद्गत मी ॥८६॥यदर्थीं दृष्टान्त शुकप्रणीत । भौतिकें जैसीं भूतां आंत । कार्यकारणबोधें स्थित । अनुस्थूत अभिन्नत्वें ॥८७॥स्थावरजंगमें जें जें भूतें । महाद्भूतें उपादान त्यांतें । कार्यकारणविवेकज्ञाते । ते हे जाणते तत्त्वज्ञ ॥८८॥चेपूनि पाहतां एक शीत । पक्कापक्क जाणिजे भात । तेंवि हा भूतभौतिकवृत्तान्त । थोडेनि बहुत विवरावा ॥८९॥वटबीज पाहतां अणुसमान । भूम्याधारें वर्धक जीवन । तेज प्रकाशक परिपाककरण । वायु विस्तीर्ण पाल्हाळ ॥३९०॥आकाश सच्छिद्र व्यापकत्व गगनाचें । तिर्यकपाल्हाळत्व वायूचें । ऊर्ध्व वाढवणें तेजाचें । जळें मूळाचें अधोगमन ॥९२॥तेथ जडतां तें पार्थिव । आणि गंधगुण स्वभाव । रसाळ स्वादुत्व टवटव । इत्यादि सर्व तोयगुण ॥९३॥रूपलाण्यझगमग । तेजें परिणाम परिपाक सांग । शीतोष्णमृदुकठिनभाग । स्पर्शादिलिंग वायूचें ॥९४॥पोकळ सच्छिद्र म्हणोनि ध्वनि । हा शब्दगुण गगनींहूनि । स्थावरादिभौतिकस्थानीं । अभिन्नपणीं प्रकाशे ॥३९५॥एवं वटाचा विस्तार । पारंबियांस्तव अपार । त्याचा होतां उपसंहार । निवडे साचार भूतत्वें ॥९६॥खणूनि समूळ छेदितां वट । असंभाव्य भरती शकट । शोषूनि दाहितां हव्यवाट । मृदंश अवशिष्ट तद्भस्म ॥९७॥तेणें मूळगर्ताचि भरे । सहसा विशेष होऊनि न थरे । जळांश परिणमे स्नेहाकारें । वैश्वानरें तो शोषे ॥९८॥वायु क्षोभवी वैश्वानरा । तो निजांशा निवडी धूम्रा । गगन सच्छिद्र अंबरा । मिळतां पदरा न राखे ॥९९॥याचि प्रकारें चराचरीं । भूतें अभिन्न भौतिकाकारीं । शेखीं उरती उपसंहारीं । निज निर्धारीं निजरूपें ॥४००॥तेंवि मी सर्वात्मा उपादान । मनोबुद्धिप्राणेंद्रियादि गुण । एतदाश्रय अभिन्न पूर्ण । वियोग म्हणोन न मनावा ॥१॥अभेदें ऐक्य बोलिलें ऐसें । तथापि कार्यकारणवशें । भेदावाप्ति संचली असे । तरी कायसें एकत्व ॥२॥कीं सर्वांमाजि अनुगत आत्मा । परि सर्वत्वाची पृथग्गरिमा । ऐसिया द्वैतापत्तिधर्मा । भेदनामा न म्हणावें ॥३॥ऐसा भेद मानाल जरी । यदर्थीं परिहार बोले हरि । तो ऐकोनि अभ्यंतरीं । व्रजसुंदरीं विवरा हो ॥४॥आत्मन्येवात्मनात्मानं सृजे हन्म्यनुपालये । आत्ममायानुभावेन भूतेंद्रियगुणात्मना ॥३०॥तरी सर्व आणि सर्वानुगत । कार्यकारण अभेद नित्य । हाचि उमजेसा वृत्तांत । नावेक स्वस्थ परिसा हो ॥४०५॥आपुले ठायीं आपणा करून । आपणापेंचि सृजी जाण । आपण आपुलें करी पालन । आत्मोपसंहरण आत्मत्वीं ॥६॥जैसा एकचि सुप्त पुरुष । अन्यथाबोधें स्वप्नाभास । सृजूनि व्यवहार पालनें तोष । ग्रासी अशेष चेइरा ॥७॥आत्मा म्हणाल स्वतःसिद्ध नित्य । तेथ कें सृष्टि स्थिति अंत । तरी मनोबुद्धिगुणेंद्रियसंघात । मायाबिंबित प्रकाशी ॥८॥जेंवि मनेंचि स्वप्न दिसे नासे । तेंवि अविकार आत्मा मायावशें । सृजनावनांत अभेददशे । भेदाचि ऐसें प्रतिपादी ॥९॥म्हणाल आत्मा निर्विकार । तो जरी मायागुणीं सविकार । तैं त्या गुणदोषसंचार । दिसे साचार झळंबला ॥४१०॥येही शंकेचा परिहार । ऐका साध्वी हो साचार । आत्मा शुद्ध निर्विकार । गुणादिविकार त्या न शिवे ॥११॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP