मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४७ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ४७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ६९ अध्याय ४७ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर विसृज शिरसि पादं वेद्म्यं चाटुकारैरनुनयविदुषस्तेऽभ्येत्य दौत्यैर्मुकुंदात् ।स्वकृत इह विसृष्टापत्यपत्यन्यलोका व्यसृजदकृतचेताः किन्नु संधेयमस्मिन् ॥१६॥क्षमापनार्थ पुढें पुढें । रिघोनि चरण धरिसी चाडे । येणें आमुचें प्रसादन न घडे । वाक्य रोकडें हें मानी ॥८१॥पद विसर्जूनि परता सर । कासया चरणीं ठेविसी शिर । आम्ही जाणतों तवांतर । तूं तत्पर स्वकार्या ॥८२॥निर्भर्त्सितां न वचसी मागें । हें लाघव तुजचि जोगें । प्रसादनाचीं जितुकीं आंगें । तें तें श्रीरंगें तुज कथिलीं ॥८३॥यालागीं तूं प्रार्थनाचतुर । निर्भर्त्सितांही स्वकार्यपर । विनयभावें होसी नम्र । हेंही समग्र जाणतसों ॥८४॥मुकुंदापासूनि आलासि येथें । तेणें दौत्य शिक्षिलें तूतें । तदनुसार तूं आम्हांतें । निज इंगितें प्रकटिसी ॥१८५॥चाटु चटुला रसिका वाणी । सलगी करूनि धरिजे पाणि । निर्भर्त्सितां लागिजे चरणीं । हे शिकवणी पैं त्याची ॥८६॥अनुनयविदुषा तच्छिक्षिता । यालागीं तुझा विश्वास चित्ता । नुपजे तद्वत करिसी घाता । या वृत्तांता शंकतसों ॥८७॥म्हणसी तुमचा अपराध काय । करूनि गेला यादवराय । तरी हा ऐकें अभिप्राय । उकलूं हृदय तुजपुढें ॥८८॥अधरमाधुरी वेणुमयी । श्रवणें प्राशिली जिये समयीं । तेव्हांचि वेध लावूनि हृदयीं । प्रपंचविषयीं स्मृति हरिली ॥८९॥मग हा एकचि आवडला । जीवभाव यासीच जडला । इंद्रियग्राम उद्वस पडला । तेणें विघडला संसार ॥१९०॥येणें वेधूनि निजात्मवेधें । प्रपंच भंगिला प्रवृत्तिरोधें । आम्ही भाळलों सुरतानंदें । शेखीं मुकुंदें विसर्जिलें ॥९१॥पति अपत्यें जनानी जनक । स्वजन सोयर आप्तलोक । इष्ट मित्र गोत्र अशेख । त्यजिलीं सम्यक मदर्थ ॥९२॥मजकारणें इहामुत्र । त्यागूनि जालिया एकाग्र । ऐसें जाणोनियां यदुवीर । जाला निष्ठुर कृतघ्नवत् ॥९३॥यालागीं तो अनियतचित्त । म्हणतां संदेह असे येथ । ऐसींचि कर्में असंख्यत । स्मरती हृदयांत तें ऐक ॥९४॥मृगयुरिव कपींद्रं विव्यधे लुब्धधर्मा स्त्रियमकृत विरूपां स्त्रीजितः कामयानाम् । बलिमपि बलिमत्त्वाऽवेष्टयद्ध्वांक्षवद्यस्तदलमसितसख्यैर्दुस्त्यजस्तत्कथार्थः ॥१७॥अरे भ्रमरा निश्चयें जाण । पूर्वींच कृष्णाचें कर्माचरण । हृदयामाजी अनुस्मरण । होतां दारुण भय वाटे ॥१९५॥पूर्वीं यीणें राघवरूपें । केलीं क्रूरकर्में अमूपें । मधुपा ऐक सांगों तुजपें । नमनीं सोपें स्नेह याचें ॥९६॥लुब्धकापरी लपोनि येणें । वाळी कपींद्र घेतला प्राणें । वृथा क्रूर हा कार्याविणें । अंतःकरणें द्रवेना ॥९७॥पारधी मांसभक्षणासाठीं । लपोनि मृगातें वधी कपटी । वाळी मारोनि कोण ते गोष्टी । येणें शेवटीं साधिली ॥९८॥ऐसा वृथाचि निर्दय क्रूर । कपटि कृतघ्न हा निष्ठुर । कळों नेदी निजांतर । परम कातर कितवेंद्र ॥९९॥स्त्रियां लेंकुरें याचीं रडती । ऐसा कळवळा न धरी चित्तीं । लपोनि मारिला वानरपति । कोण संपत्ति जडियली ॥२००॥कोण सुकृत कीं यश कीर्ति । याची कीजे केंवि संगति । स्मरतां ऐसी पूर्वस्थिति । रोमांच येती सर्वांगा ॥१॥आणिक याची ऐकें गोठी । सीता हरविली पंचवटी । तिच्या विरहें फिरतां सृष्टी । न मनी पोटीं शुभाशुभ ॥२॥सीता परतंत्र केवळ । स्त्रीजितपणाचें दावी शीळ । आत्माराम हा शब्द विफळ हृदय कुटिळ नैर्घृण्यें ॥३॥कामसंप्राप्तिसाधनपरा । येणें प्रेरूनि सहोदरा । विटंबिली सकाम दारा । सघ्रानश्रोत्रा छेदूनी ॥४॥शूर्पणखा ते राक्षसवनिता । विटंबिली स्मर याचितां । ऐसीं याचीं कर्में स्मरतां । उपजे चित्ता घोर भय ॥२०५॥याहूनि पूर्वीं वामनरूपें । साक्षर देखोनियां साक्षेपें । शुक्रें वर्जितांही बळिनृपें । विविधा कल्पें समर्चिला ॥६॥त्याचा सेवूनि दत्त बळी । त्रिपादभूदानाच्या छळीं । बलात्कारें बांधोनि बळी । मग पाताळीं घातला ॥७॥विष्टपापासोनि अधोगति । केली सुतळलोकावाप्ति । अगाध त्याची प्रतापशक्ति । तेणें द्वास्थीं प्रतिष्ठिला ॥८॥इत्यादि कर्में पुरातनें । याचीं होतां अनुस्मरणें । आंत बाहिर काळा मनें । त्यातें सौजन्यें न भजों रे ॥९॥तथापि मधुपा ऐसें म्हणसी । विरहें गातां कां दिननिशीं । आम्ही नाठवूं जर्ही त्यासी । तद्गुण आम्हांसि बळें स्मरती ॥२१०॥पिसें उमजोनि पिसेपणा । सांडूनि धरूं पाहे स्मरणा । परी ते दुस्त्यज भ्रांति करणां । भुलवूनि मना बव्रळवी ॥११॥तेंवि तत्कथारूप अर्थ । दुस्त्यज मानसा तद्गत स्वार्थ । येणें बुडविला उभय स्वार्थ । वृथा किमर्थ प्रार्थिसी ॥१२॥जर्ही आमुच्या कळलें चित्ता । त्रिवर्गाची सफळित लता । उपडोनि सांडीं यांची कथा । तथापि समर्था न हों त्यागीं ॥१३॥ऐसियासि कीजे काय । भ्रमरा सांगें कांहीं उपाय । विरहिणीचा पाड काय । विदुषसमुदाय भ्रमग्रस्त ॥१४॥यदनुचरितलीलाकर्नपीयूषविप्रुट्सकृददनविधूतद्वंद्वधर्मा विनष्टाः । सपदि गृहकुटुंबं दीनमुत्सृज्य दीना बहव इह विह्म्गा भिक्षुचर्यां चरंति ॥१८॥ज्या हरीचीं अवतारचरितें । अनुस्मरतां त्या लीला चित्तें । श्रवणामृतें सेवितयांतें । अगाध सुकृतें तो लाभ ॥२१५॥लीलाश्रववनसुधेची कणिका । एकवारही सेविता रसिका । द्वंद्वधर्मादि कळिमळपंका । धुनी होय तत्काळ ॥१६॥सूर्योदयीं निरसे तम । कीं स्पर्शमणीच्या संगें हेम । सांडी लोहकाळिमा नाम । द्वंद्वधर्म तेंवि हरती ॥१७॥लीलाश्रवणामृतकनिकापान । करितां निर्द्वंद्व होती सुज्ञ । अतएव विनष्ट त्या अभिधान । नष्टांसमान नैष्ठुर्यें ॥१८॥नष्टांसमान म्हणाल कैसे । कुटुंब पावतां दीनदशे । कृपेनें न द्रवती मानसें । तद्दुःखलेशें झळंबोनी ॥१९॥निर्दय म्हणोनि असत्तुल्य । येर्हवीं केवळ वैराग्यशीळ । स्वप्नाभास प्रपंच टवाळ । कुटुंब सकळ त्यासि गमे ॥२२०॥स्वयें कुटुंबाचिया बिघडें । अन्नवसनांचें सांकडें । भोगविहीन्न जैसें मडें । तैसें कोरडें तनुचव्र्म ॥२१॥ त्यांसि धरावया डाहाळी । ना बैसावयासि साउली । दीनें बापुडीं भगणें केलीं । लीलाश्रवणें याचेनी ॥२२॥विहंग भ्रमती नभोमंडळीं । नभ त्याभवतें वरतें तळीं । तैसी जयासि सर्वकाळीं । हरिवेगळी अकिंचनता ॥२३॥प्राणप्रवृत्तीलागिं द्रुमा । टाकूनि जाणें विहंगमा । तेंवि क्षुत्तृड्भयोपशमा । भिक्षुधर्मा अनुसरणें ॥२४॥ज्याचेनि लीलाश्रवणामात्रें । भ्रमती ऐसीं विज्ञानपात्रें । ऐसें कळतां आम्ही श्रोतें । ऐकोनि वक्त्रें गातसों ॥२२५॥निर्दय कृतघ्न तापकर । प्रत्यक्ष कलतांही अंगार । होऊं न शकती जन निष्ठुर । होती सादर तत्संगा ॥२६॥तैसें लीलालावक याचें । प्रत्यक्ष भ्रमकर कळतां साचें । त्यागूं न शको हें तयाचें । योगसत्तासामर्थ्य ॥२७॥दुस्त्यज याचें लीलाश्रवण । म्हणोनि भ्रमती होऊनि दीन । त्यागूं शकते जरी सज्जन । तरी संपन्न्न ते असते ॥२८॥लीलादुस्त्यजत्व निंदून । ऐसें वदलें बल्लवीवदन । तें हें केलें निरूपण । परमार्थकथन तें ऐका ॥२९॥हरिचरितामृतलीलाकणिका । श्रवणदुर्लभ ब्रह्मादिकां । सुकृती लाहती न फवे आणिकां । जेंवि वनिकां नृपपदवी ॥२३०॥लीलाकणिकामृतरसपानें । एकवारही मातले मनें । तत्काळ द्वंद्वधर्मादि वृजिनें । जालीं भग्नें निःशेष ॥३१॥निर्ममनिर्द्वंद्व निरंतर । तत्काळ कुटुंबगृहपरिवार । त्यजिती मानूनि स्वप्नाकार । तुच्छ निःसार फळकट जें ॥३२॥धीर म्हणिजे व्यवसितमति । दीन म्हणिजे अकिंचन वृत्ति । अपरिग्रही अनिकेतस्थिति । बहुधा भ्रमती परमहंस ॥३३॥विह्म्गमांमाजि हंसवर । कां जे निवडिती क्षीरनीर । तैसे सारासारविचारचतुर । हंसांसमान परमहंस ॥३४॥सारासारविवेकज्ञानें । असारप्रपंचा सांडणीं । सारामृतत्व अपरोक्षपणें । लीलाश्रवणें पावले ॥२३५॥याम्सि दुस्त्यज तत्कथार्थ । त्यांचा हाचि परम पुरुषार्थ । हा त्यागूनि कोण तो स्वार्थ । भवअनर्थ जोडावा ॥३६॥भ्रमरा तूं जरी बोलसी ऐसें । पूर्वीं एकांतीं हृषीकेशें । काय हेंचि कथिलें नसे । निश्चय वसे तुजपासीं ॥३७॥तरी येविषीं ऐकें मात । आम्ही मानोनि वचन सत्य । नेणों कपटाचा वृत्तांत । विश्व्वासघातकारक जो ॥३८॥वयमृतमिव जिह्मव्याहृतं श्रद्दधानाः कुलिकरुतमिवाज्ञाः कृष्णवध्वो हरिण्यः ।ददृशुरसकृदेततन्नखस्पर्शतीव्रस्मररुज उपमंत्रिन्भण्यतामन्यवार्ता ॥१९॥अरे उपमंत्री दौत्यचतुरा । न वदें तद्वार्ताउत्तरा । ज्या कारणास्तव त्या विचारा । ऐकें विचारा सांगतसों ॥३९॥कुलिक म्हणिजे मृगयानिरत । कपटें गाऊनि गोरीगीत । कृष्णमृगांगना कापट्यरहित । मानिती सत्य श्रवणसुधा ॥२४०॥नेणती निषादहृदयींच्या कपटा । सत्य मानूनि धरिती निष्ठा । तंव अकस्मात देखती कष्टा । बाणीं वोखटा विंधी तैं ॥४१॥मग त्या सक्षतहृदया वनीं । दुःखें भोगिती कुरंगिणी । याचिप्रकारें आम्ही विरहिणी । विश्वासोनि दुखावलों ॥४२॥जिह्म म्हणिजे जो कुटिल कृष्ण । सत्य मानूनि तद्भाषण । आम्ही विश्वासलों पूर्ण । स्पृहा धरून तद्रसा ॥४३॥पारधियाच्या गायनापरी । सत्य मानूनि अभ्य़ंतरीं । विश्वासलो कुरंगनेत्री । कपटकातरी नेणोनी ॥४४॥तंव निषादें कपतमारें । हरिणी विंधिल्या क्रूरशरें । तैसेंचि आम्हांसि केलें येरें मधुरोत्तरें भुलवूनी ॥२४५॥विश्वासताम्चि सुखसंगमा । नखखरक्षतें उरोजपद्मम । करूनि प्रदीप्त केलें कामा । पावलों भ्रमा स्मररुग्णा ॥४६॥ कंदर्पबाणांच्या वेदना । निषादबाणापरिस कठिना । यास्तव न करीं तद्गुनकथना । अन्यवार्ता वद वदनें ॥४७॥ऐसें म्हणोनि निष्ठुर चित्तें । भ्रमरा झाडूनि टाकिलें हातें । उडोनि गेला मथुरापंथें । पुढती तेथेंचि पातला ॥४८॥त्यातें देखोनि वदती काय । तो गोपींचा अभिप्राय । परिसावया सावध होय । म्हणे मुनिवर्य कुरुनाथा ॥४९॥प्रियासख पुनरागाः प्रेयसा प्रेषितः किं वरय किमनुरुंधे माननीयोऽसि मेंऽग । नयसि कथमिहास्मान्दुस्त्यजद्वंद्वपार्श्वं सततमुरसि सौम्य श्रीर्वधूः साकमास्ते ॥२०॥मधुपें जाऊनि मधुपापासीं । आमुची अवस्था सांगूनि त्यासी । पुढती आमुतें न्यावयासी । तत्प्रेषित पातला ॥२५०॥यया भावना त्या भ्रमरातें । बोलती विरहाकुलितचित्तें । प्राणप्रियाच्या सखया येथें । कीं तेणें तूतें पाठविलें ॥५१॥आमुचा प्रियतम जो मुरारि । तेणें द्रवोनि अभ्यंतरीं । तुज पाठविलें झडकरी । कोणा विचारीं आलासी ॥५२॥कोमळ संबोधनें अंग । म्हणती भ्रमरा वृत्तांत सांग । आम्हांसि मान्य तूं परम योग्य । काय श्रीरंग तुज वदला ॥५३॥कोणे प्राप्तीची इच्छा पोटीं । ते तूं निःशंक सांगें गोठी । ऐशा सम्मानें पावल्या तुष्टि । पुन्हां वाक्पुटीं त्या वदती ॥५४॥त्यापें आम्हांसि नेसी काय । तरी तूं ऐकें अभिप्राय । आम्ही न सांडितां आपुले ठाय । परी दुस्त्यज होय तन्मिथुन ॥२५५॥त्याचा द्वंद्वीभाव हृदयीं । आम्हां दुस्त्यज बैसले ठायीं । ऐसियाचे पार्श्वसोयी । कोण्या उपायीं तूं नेसी ॥५६॥दुरी असतां द्वंद्वचिंतन । दुस्त्यज त्यागूं न शकेमन । मा समीप नेलिया पुढती जाण । गेलिया प्राण न टाकवे ॥५७॥म्हणसी लौकिकीं स्त्रियांचा संग । करूं न शकें मेघरंग । तरी श्रीनामका वधू चांग । वसवी सांग निज हृदयीं ॥५८॥ श्रीसहवास निरंतरीं । न लजे धरितां हृदयावरीं । त्याचें पार्श्वीं आम्ही नारी । कवणें प्रकारीं न शोभों ॥५९॥ऐसिया बोलोनि व्यंग्योक्ति । तेणें प्रसन्न केली मति । ऐसें भावूनि आपुल्या चित्तीं । सप्रेम पुसती हरिवृत्त ॥२६०॥सौम्य म्हणिजे विषादरहित । आमुच्या प्राणप्रियाचा दूत । साधु जाणसी दौत्यकृत्य । मान्य संमत तूं आम्हां ॥६१॥बत या अव्ययाचा अर्थ । गोपीमानस संतोषभरित । अपि म्हणिजे कांहीं हेत । धरूनि स्मरत हरि आम्हां ॥६२॥तोचि वृत्तांत सविस्तर । सौम्यनामें बोधूनि भ्रमर । गोपी पुसती तो विचार । श्लोकाधारें परियेसा ॥६३॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP