मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४७ वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ४७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ६९ अध्याय ४७ वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर कच्चिद्गदाग्रजः सौम्य करोति पुरयोषिताम् । प्रीति नः स्निग्धसव्रीडहासोदारेक्षणार्चितः ॥४१॥सुशांतवृत्ति सत्वसंपन्न । सौम्य हें त्या संबोधन । यास्तव उद्धवा बल्लवीगण । सौम्य म्हणोनि संबोधी ॥८६॥जो गदाचा बंधु ज्येष्ठ । जैसा आम्हांसि प्रियतम प्रेष्ठ । तैसेच पुरवधूंचे अभीष्ट । काम यथेष्ट पुरवी कीं ॥८७॥स्निग्ध म्हणिजे सप्रेमभरें । मंदस्मितादि सलज्ज वक्त्रें । ललितापांगें मन्मथशरें । आम्ही हरिगात्रें पूजिलीं जें ॥८८॥किंवा नागरी मथुरा वामा । त्याही ऐशाचि मेघश्यामा । अर्चिती म्हणोनि त्यांचिया कामा । कांहीं तैसाचि पुरवी कीं ॥८९॥नागरी वामा कामसक्त । स्मरसंभ्रमें तदनुरक्त । आमुचे ठायीं त्याचें चित्त । कांहीं वृत्तांत स्मरे कीं ॥४९०॥आम्हांवरी कांहींएक । कृष्णस्नेहाचा कटाक्ष । आतां कैंचा निजमनसाक्ष । हरिलें लक्ष पुरवनितीं ॥९१॥तंव आणिकी रानटा रमणी । साबड्या गांवढळा गौळणी । उद्धवेंसी वदती वाणी । सादर श्रवणीं ते ऐका ॥९२॥अपि स्मरति नः साधो गोविंदः प्रस्तुते क्कचित् । गोष्ठीमध्ये पुरस्त्रीणां ग्राम्याः स्वैरकथांतरे ॥४२॥साधु म्हणोनि उद्धवासी । पुसती उघड वृत्तांतासी । गोविंद जो हृषीकेशी । केव्हां आम्हासि स्मरतसे ॥९३॥मथुरापुरींच्या नागरा नारी । कृष्णीं क्रीडतां स्वैराचारीं । स्मरसंभ्रमें तत्सभांतरीं । आम्हां मुरारि स्मतसे ॥९४॥ग्राम्यग्राम्यभोगासक्ता । प्रस्तुत म्हणती कथीं हे वार्ता । काय करावी चातुर्यता । स्मरे स्वसुरता हरि कीं ना ॥४९५॥तंव आणिकी विलासरसिका । उद्धवेम्सीं व्रजनायिका । पूर्वानुभूतमन्मथसुखा । अभिवर्धका प्रश्नमिषें ॥९६॥ताः किं निशाः स्मरति यासु तदा प्रियाभिर्वृंदावने कुमुदकुंदशशांकरम्ये । रेमे क्कणच्चरणनूपुररासगोष्ठ्यामस्माभिरीडितमनोज्ञकथः कदाचित् ॥४३॥म्हणती उद्धवा अवधारीं । केव्हां तर्ही त्या शर्वरी । स्मरतो कीं ना श्रीमुरारि । वद निर्द्धारीं शफथेंसीं ॥९७॥तया शर्वरी कैशा म्हणसी । ज्यांच्या ठायीं पूर्ण शशी । कुमुदां कुंदांतें प्रकाशी । वृंदावनासि ते शोभा ॥९८॥बहळसुगंध वृंदावनीं । सुधाढ्य धवलिमा शशांककिरणीं । वनश्रींच्या लावण्यगुणीं । व्रजकामिनी हरि रमवी ॥९९॥सुभगा सुगौरा लावण्यखाणी । मंडित अनर्घ्यवसनाभरणीं । कृष्णें नर्तितां रासरंगणीं । मन्मथकदनीं रसभरिता ॥५००॥रत्नजडित कार्तस्वर । विलोल श्रवणींचे अलंकार । कंकणें मुद्रिका अनर्घ्य हार । शोभा रुचिर साभरणीं ॥१॥मौलवेणिका नासामुक्तें । रुक्मविरचितें मनिक्ययुक्तें । कंठाभरणें कंठासक्ते । पदें सालक्तें रंगितें ॥२॥कटिमेखळे क्षुद्रघंटी । बाहुभूषणें बाह्यवटीं चरणीं क्कणिक नूपुरदाटी । निजबोभाटीं ध्वनि भरिती ॥३॥ऐसिया वनिता सालंकारा । कृत नर्मोक्ति विविधा मधुरा । रास समाजीं विलासचतुरा । आम्हीं श्रीधरा स्तवितसों ॥४॥जया उक्ति पडतां कानीं । सहस्रगुनित आनंद मनीं । कोंधाटे त्या कथाकथनीं । चक्रपाणि प्रोत्सार्ह ॥५०५॥तेणें उत्साहभरितकामें । आमुसीं रमिजे मेघश्यामें । ज्यांमाजि त्या त्रियामा नर्में । आननपद्में कैं स्मरतो ॥६॥किंवा विसरोनि गेला अवघें । भुलला नवनागराभोगें । असो जें होऊनि गेलें मागें । पुढें सवेगें प्रश्न कथीं ॥७॥अपेष्यतीह दाशार्हस्त्तप्ताः स्वकृतया शुचा । संजीवयन्नु नो गात्रैर्यथेंद्रो वनमंबुदैः ॥४४॥ऐशा अपरा पुसती रमणी । म्हणती कृष्ण चातुर्यखाणी । आपणानिमित्त बल्लवतरुणी । मन्मथकिरणीं संतप्ता ॥८॥कृष्णवियोगशोकदुःखें । गोपीवदनाब्जकानन सुके । हें काय नाहीं त्या ठावुकें । जाणे असिकें सर्वज्ञ ॥९॥तया संतापनिवारणा । सदयहस्तें संस्पर्शना । तत्पीयूषें गात्रजीवना । करील कीं न आ येऊनि ॥५१०॥जैशींच मेघवियोगें वनें । ग्रीष्में संतप्त तीव्रकिरणें । हें जाणोनि संक्रंदनें । सजीव करणें नवमेघीं ॥११॥तैसाचि कृष्ण येईल काय । आम्हां संतप्त्तां जीवनोपाय । करसंस्पर्शें अमृतप्राय । करील निश्चयें वद ऐसें ॥१२॥हें ऐकोनि गोपी येरी । म्हणती कासया मूर्खापरी । वृथा बोलतां विरहातुरी । गोष्टी अंतरीं विवरा गे ॥१३॥कस्मात्कृष्ण इहायाति प्राप्तराज्यो हताहितः । नरेंद्रकन्या उद्बाह्य प्रीतः सर्वसुहृद्वृतः ॥४५॥कोणा कारणास्तव येथें । परतोनि यावें कृष्णनाथें । पावला राज्यैश्वर्यातें । स्वशत्रूतें मर्दुनी ॥१४॥आतां त्यासि काय उणें । सालंकृत स्वगोत्रस्वजनें । नरेंद्राचीं कन्यारत्नें । पाणिग्रहणें पर्णील ॥५१५॥भूपोपभोग नृपासनीं । हयगजसिबिका नानायानीं । विलासकुशळ नृपनंदिनी । मन्मथकदनीं साभरणा ॥१६॥अनुचर किंकर समर्याद । अमात्यसचिवांचे संवाद । भाट बंदी सूत मागध । नाना विनोद रुचविती ॥१७॥सामंतमांडलिकांचे गण । विनीत करित्ती विज्ञापन । तेथ आमुची आठवण । त्यासि कोठून किमर्थ ॥१८॥बाळपणीं व्रजीं होता । आम्हां वांचूनि अन्य वार्ता । नेणे म्हणोनी अनन्यता । क्रीडा करितां सस्निग्ध ॥१९॥आतां महद्भाग्याच्या भरीं । आमुचें स्मरण करील हरि । पुन्हा येऊनियां व्रजपुरीं । आम्हां स्वकरीं स्पर्शेल ॥५२०॥ऐसी किमर्थ धरणें आशा । आमुचा विचंबु त्या कायसा । आम्ही रानटा वनौकसा । मा येरी राजसा तरी पुसे ॥२१॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP