मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४६ वा| श्लोक ४६ ते ४९ अध्याय ४६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ४६ वा - श्लोक ४६ ते ४९ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४६ ते ४९ Translation - भाषांतर उद्गायतीनामरविंदलोचनं व्रजांगनानां दिवमस्पृउशद्ध्वनिः । दध्नश्च निर्मंथनशब्दमिश्रितो निरस्यते येन दिशाममंगलम् ॥४६॥ऐशिया व्रजांगना निर्दोष । गाती उच्चस्वरीं हरियश । मिश्रितदधिनिमर्थनीं घोष । तो ध्वनिविशेष नभ व्यापी ॥१७॥कमललोचनाप्रति गौळणी । सप्रेम गाती उच्चस्वनीं । माजी मिश्रित मथनध्वनि । फांके गगनीं दशदिशा ॥१८॥हरियशोध्वनि श्रवणीं पडतां । दशदिशांची अमंलता । हरूनि प्रकटी सुमंगलता । तें नृपनाथा अवधारीं ॥१९॥मधुरस्वरीं वल्लकी वाजे । तेणें तोषती सुर नर राजे । रासभहेषित गगनीं गाजे । तें धिक्करिजे सर्वत्रीं ॥५२०॥तैसें विषयार्थ जें गायन । तें तें रासभहेषित जाण । अचेतवल्लकीसमान मान । एकाग्र मन हरिरंगीं ॥२१॥गायनविद्या सप्तवरीं । अभ्यासिली कळाकुसरी । मन कल्पना विषयीं करी । तैं रासभस्वरी विताळ तें ॥२२॥अभ्यासरहित सप्रेमभरें । हरियश गातां उच्चस्वरें । चितैकाग्र्यें विवर्त विसरे । मंगळ पसरें तद्गाना ॥२३॥काष्ठवल्लकीसमान तारा । अभ्यास्त गायन सप्तस्वरा । माजी प्रेमाचा उभारा । एकाग्रचित्तें शोभविला ॥२४॥हरि सर्वात्मा निर्विकार । होतां सप्रेम कीर्तनगजर । कीर्तनीं प्रकटे सत्य साचार । हरिजागर या नांव ॥५२५॥अभ्यास सप्रेम वरिष्ठ । अभ्यासी कीर्तननिष्ठ । गाती सप्रेमें वैकुंठ । वेधें प्रकट हरि होय ॥२६॥एवं सप्रेम हरिजागर । प्रेमरहित जे सप्तस्वर । ते उलूकजंबुकसूकरखर । वृथा करकर पोटार्थ ॥२७॥सप्रेमगानें वेधे वृत्ति । तेणें अमंगळ भेदनिवृत्ति । अभेद मंगळ सर्वां भूतीं । हरिगुणकीर्ति विस्तारी ॥२८॥एवं दधिमथनाचा ध्वनि । मिश्रित गोपी उद्गायनीं । गाती सप्रेम चक्रपाणि । तैं दिड्मंडळ छेदूनि मंगळ दे ॥२९॥इत्यादिध्वनींचिया गजरीं । चेइली संपूर्ण व्रजपुरी । शौचवीथींत तंद्रिता नारी । परस्परें गुजबुजिती ॥५३०॥उद्धवनंदसंवादगती । सरोनि गेली सर्व राती । उषःकाळाची अभिव्यक्ति । केली ग्रंथीं ते कथिली ॥३१॥प्राची अरुणें सुरंग झाली । कीं त्या कुंकुम रेखीलें भाळीं । उद्धवें स्नान तेचि काळीं । यमुनाजळीं सारिलें ॥३२॥स्नानसंध्या जपादिनियम । स्तोत्रपाठ रविप्रणाम । प्रातराह्निक करितां याम । यमुनातीरीं लागला ॥३३॥तंव येरीकडे वर्तली कथा । ते तूं ऐकें धरित्रीनाथा । भास्करमंडळ उदया येतां । व्रजजनवनिता विलोकिती ॥३४॥भगवत्युदिते सूर्ये नंदद्वारि व्रजौकसः । दृष्ट्वा रथं शातकौम्भं कस्यायमिति चाब्रुवन् ॥४७॥फांकतांचि सूर्यकरीं । व्रजौकसांच्या नंदद्वारीं । दृष्टी जदलिया रहंवरीं । भवंतीं भंवरी मिळाली ॥५३५॥जडितरत्नीं कनकरथ । देखोनि व्रजवासी समस्त । म्हणती कोणाचा हो येथ । अकस्मात उदेला ॥३६॥ऐसा व्रजजन चर्चा करी । तंव त्या गोपी विरहातुरी । वितव्र्क तर्किती परस्परीं । तें अवधारीं कुरुवर्या ॥३७॥अक्रूर आगतः किं वा यः कंसस्यार्थसाधकः । येन नीतो मधुपुरीं कृष्णः कमललोचनः ॥४८॥सक्रोध म्हणती अगे पहिला । हा काय अक्रूरचि येथ आला । जो कंसार्थसाधक भला । मथुरे नेला हरि येणें ॥३८॥कोमलारविंदलोचन । तो मथुरे येणें नेऊनि कृष्ण । केलें कंसकार्यसाधन । पुढती आन करूं आला ॥३९॥किं साधयिष्यत्यस्माभिर्भर्तुः प्रीतस्य निष्कृतिम् । इति स्त्रीणां वदंतीनामुद्धवोऽगात्कृताह्निकः ॥४९॥एकी म्हणती कृष्ण नेला । तेणें कंस निर्दाळिला । बर्रवा स्वामिकार्यार्थ केला । आतां आला किमर्थ हा ॥५४०॥तंव येरी म्हणे हा प्रियतम कंसा । याचा कंसासि भरंवसा । तदुत्तीर्णालागीं आपैसा । पहिल्या ऐसा येथ आला ॥४१॥येथ येऊनि करील काय । तरी मृतप्राय आमुचे देह । इहीं करूनि साधिता होय । कंसकार्य ये काळीं ॥४२॥आम्हां मारूनि आमुच्या पिशितीं । पिंड देईल कंसाप्रति । तेणें पावेल तो सद्गति । आला उपकृतिनिस्तरणा ॥४३॥आमुच्या मांसपिंडदानें । कंसालागीं सद्गति देणें । बहुतेक इतक्याचि कारणें । याचें येणें गमतसे ॥४४॥ऐशा परस्परें वनिता । विरहें सक्रोध वितर्क करितां । उद्धव त्या समयाआंतौता । आह्निक करूनि पातला ॥५४५॥तिहीं उद्धव देखतां नयनीं । अक्रूर नव्हे हें कळलें मनीं । उद्धवावयव श्रीशुक वर्णीं । वक्ष्यमाणीं तें ऐका ॥४६॥सत्तेचाळिसावे अध्यायीं । भ्रमरगीतव्याख्यान पाहीं । तया श्रवणाची नवाई । पवित्रीं हृदयीं सांठविजे ॥४७॥आदिनारायण निर्गुण । प्रणवांकुरें झाला सगुण । नाभिकमळीं कमलासन । निजनंदन बोधिला ॥४८॥विधीनें देवर्षि नारद । चतुःश्लोकीं बोधिला विशद । तेनें बोधिला अत्रिवरद । दत्तात्रेय परमात्मा ॥४९॥म्हणल अत्रि परम श्रेष्ठ । महर्षि आणि ब्रह्मनिष्ठ । तेणें अध्यात्मविद्या स्पष्ट । स्वपुत्रा कां न बोधिली ॥५५०॥तरी महर्षींतें सृष्टिवर्धना । केली विरंचीनें आज्ञा । कर्माचरणें स्रुजनाभिमाना । पात्र झाले ते सर्व ॥५१॥तें न चुचेचि दत्तात्रेया । बालोन्मत्तपिशाचचर्या । वर्ततां देखोनि अनसूया । कांतासहित सचिन्त ॥५२॥तेथ पातला तो देवर्षि । देखोनि आनंद उभयतांसी । गुह्य कथिलें तयांपासीं । मग तो दत्तासी प्रबोधी ॥५३॥दत्त नोहेचि सृजनीं रत । नारदें केला ब्रह्मनिरत । तेणें ब्रह्मविद्या कळिकाळांत । जनार्दनपंता बोधिली ॥५४॥एकोपंतीं छात्रदशा । साधूनि केली अभेद शुश्रूषा । जनार्दनकृपेनें ब्रह्मरसा । दत्तप्रसादा साधिलें ॥५५५॥एकनाथकृपामृत । चिदानंदासि झालें प्राप्त । तेणें स्वान्म्द केला तृप्त । कृपापीयूश वर्शोनी ॥५६॥स्वानंदाचिये कृपादृष्टीं । गोविंद लाधला ब्रह्मपुष्टि । तेणें कैवल्यरसाची वृष्टि । दयार्नवगर्तेवरी केली ॥५७॥एवं परंपराक्रमें प्राप्त । तें हें श्रीमद्भागवत । अध्याय षट्चत्वारिंशत । झाला समाप्त ये ठायीं ॥५८॥इति श्रीमद्भागवते महापुराणेंऽष्टादश साहस्र्यां पारमहंस्यां संहित्तायां दशमस्कंधे श्रीशुकपरिक्षित्संवादें हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां कृष्णाज्ञयोद्धवव्रजाभिगमनयशोदानंदप्रबोधनं नाम षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४६॥श्रीकृर्ष्णापणमस्तु ॥ ओव्या ॥५५८॥ श्लोक ॥४९॥ एवं संख्या ॥६०७॥ ( शेहेचाळिसावा अध्याय मिळून ओवी संख्या २०९५९ )शेहेचाळिसावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP