अध्याय ४६ वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


धारयंत्यतिकृच्छ्रेण प्रयः प्राणान्कथंचन । प्रत्यागमनसंदेशैर्बल्लव्यो मे मदात्मिकाः ॥६॥

गोपी माझिया विरहानळें । भस्म झालियाचि असती न कळे । येवढ्या वियोगदुःखें बहळें । जीवनकळे नुरणूक ॥९२॥
परंतु एक भरवंसा मना । महता क्लेशें धरिती प्राणा । विश्वासोनि माझिया वचना । प्रत्यागमना लक्षिती त्या ॥९३॥
बहुतेक माझिया त्या बल्लवी । मदात्मिका सर्वभावीं । मी सर्वस्वें त्यांच्या जीवीं । यास्तव जीववीं जगज्जीवन ॥९४॥
शीघ्र येईन ऐसी वाणी । स्वमुखें बोलिलों चक्रपाणि । त्या विश्वासें पंचप्राणीं । शरीरभुवनीं वसिजेल ॥९५॥
ऐशा सक्लेश प्राण धरिती । बहुतेक वाटतें माझ्या चित्तीं । तरी त्वं जावोनि तयांप्र्ति । मम वचनोक्ति बोधाव्य ॥९६॥
त्या वचनोक्ति म्हणसी कैशा । तुम्ही प्रियतमा मम मानसा । मजसीं वियोग नाहीं सहसा । हृदयीं ठसा ठसावतां ॥९७॥
मी तुमचिया अभ्यंतरीं । तुम्ही मत्प्रेमें मजमाझारी । असतां न बाधी विरहलहरी । मम वैखरी हे बोधीं ॥९८॥
चतुरा उपदेशवचान एका । शताब्द बोधितां न बणे मूर्खा । सुरेज्यशिष्य उद्धव निका । वृत्तांत असिका त्या कळला ॥९९॥
शुक म्हेणे गा परीक्षिति । उद्धवें परिसोनि कृष्णोक्ति । कैसा चालिला गोकुळाप्रति । तें तूं सुमति अवधारीं ॥१००॥

श्रीशुक उवाच - इत्युक्त उद्धवो राजन्संदैशं भर्तृरादूतः । आदाय रथमारुह्य प्रययौ नंदगोकुलम् ॥७॥

गुह्यगोष्टी परम रहस्य । वदतां साशंक मानस । त्याही निःशंक उद्धवास । बोलिला परेश निष्कपट ॥१॥
भर्ता बोलिजे आपुला स्वामी । तेणें योजिलें रहस्यकामीं । त्याचे निरोप हृदयपद्मीं । धरूनि सद्मींहूनि ऊठला ॥२॥
आज्ञा घेऊनि निज नाथाची । रथ सज्जिला समयीं तेचि । रथीं बैसोनि गोकुळींची । मति विवंची चालतां ॥३॥
धन्य नंदाचें गोकुळ । धन्य धन्य तो बल्लवपाळ । धन्य यशोदा सुकृतशीळ । मानिती बाळ जगज्जनका ॥४॥
धन्य धन्य तो बल्लवीगण । न कळे त्याचें सुकृत कोण । ज्याच्या प्रेमें श्रीभगवान । कळवळून मज बोधी ॥१०५॥
ऐसिया नंदगोकुळाप्रति । रथीं बैसोनि उद्धव सुमति । अस्तगिरीं पावे गभस्ति । जाता झाला ते समयीं ॥६॥

प्राप्तो नंदव्रजं श्रीमान्निम्लोचति विभावसौ । छन्नयानः प्रविशतां पशूनां खुररेणुभिः ॥८॥

विभावसूचिय मंडळा । चुंबीत असतां अस्ताचळा । ऐसिये समयीं नंदगोकुळा । उद्धव पावला सप्रेमें ॥७॥
पशूंचे कळप सायंकाळीं । प्रवेशतां घोषमंडळीं । त्यांच्या खुरें उधळल्या धुळी । जीमूतावळीसम गमती ॥८॥
तया खुररेणूंहीं रथ । झांकोळला गोकुळेंसहित । नंद्सदनद्वारीं स्वस्थ । नेऊनि केला सारथियें ॥९॥
गोपी रथातें लक्षून । नेणतां कोणाचा हा कोण । म्हणती अक्रूरें आणिला कृष्ण । कीं आमुचे प्राण नेईल हा ॥११०॥
असो गोपींचे वितर्क । व्रजवर्णना करी शुक । ते संक्षेपें पांच श्लोक । श्रोतीं सम्यक परिसावे ॥११॥

वासितार्थेऽभियुद्ध्यद्भिर्नादितं शुष्मिभिर्वृषैः । धावंतीभिश्च वास्राभिरूधोभारैः स्ववत्सकान् ॥९॥

प्रवेशकाळींची गोकुळशोभा । ऐकें कुरुभूतवल्लभा । धेनु ऋतुमति निमित्त वृषभा । युद्धें क्षोभा पावविती ॥१२॥
युद्धें करिती वृषभ ऐसे । सकाम उन्मत्त तनुआवेशें । डारक्या फोडिती गंभीरघोषें । मेघ जैसे प्रावृटीं ॥१३॥
तयां उक्षांच्या फुंपाटध्वनि । युद्धार्थ इतस्ततः धावनीं । ऐसी गोकुळशोभा नयनीं । उद्धव पाहोनि संतुष्ट ॥१४॥
वत्सासाठीं नवप्रसूता । वोरसें दाटोनि वत्समाता । धेनु धांवती त्वरान्विता । तिहीं तत्वता व्रज शोभे ॥११५॥
वोहे दटले दुग्धभारें । सस्निग्धवत्सांच्या हुंकारें । स्तनीं लागले दुग्धझरे । तें पाझरे भूतळीं ॥१६॥
अचलाग्रींहूनि जैसें जल । तळवटीं धांवे उताविळ । तेवीं वत्सार्थ धेनुमेळ । जवनशीळ क्षोभ्ती ॥१७॥
गाई धांवती वत्सांसाठीं । तेवीं औत्सुक्य वत्सां पोटीं । ऐकें तयांची राहटी । स्नेहाळें पोटीं परस्परें ॥१८॥

इतस्ततो विलंघद्भिर्गोवत्सैर्मंडितं सितैः । गोदोहशब्दाभिरवं वेणूनां निःस्वनेन च ॥१०॥

ऐकोनि धेनूंने हुंकर । धांवो इच्छिती वत्सें समोर । कंठीं निरुद्ध पाशदोर । तेणें आतुर उफाळती ॥१९॥
इतस्ततः उडिया घेती । गाई समोर उकावती । क्षुधातुरें हुंकारती । स्थिर न होती आंवरितां ॥१२०॥
काळी निळी धवळी पिवळी । धेनुवत्सांची मंड्ळी । तेणें व्रजशोभा आगळी । दृष्टि निहाळी उद्धव ॥२१॥
गोदोहनें बल्लव करिती । पात्रीं पयधारा वाजती । तेणें वत्सें हुंकारती । सशब्द भ्र्मती मार्जारें ॥२२॥
सोडा सोडा रे वांसुरें । प्यालीं अखंडा म्हणती त्वरें । घ्या घ्या म्हणती दोहिलीं पात्रें । पुन्हा सत्वरें द्या म्हणती ॥२३॥
तर्णकांचे हुंकारगजर । वेणुध्वनि त्यांमाजी मिश्र । तेणें नादें व्रज समग्र । नादाकार ब्रह्म गमे ॥२४॥
ऐसी व्रजशोभा उद्धवें । श्रवणें नयनें पाहतां निवे । गोपी गाती सप्रेमभावें । तें परिसें आघवें हरिचरित ॥१२५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP