अध्याय ४६ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - वृष्णीनां प्रवरो मंत्री कृष्णस्य दयितः सखा ।
शिष्यो बृहस्पतेः साक्षादुद्धवो बुद्धिसत्तमः ॥१॥

गोपीस्नेहाचें अवतरण । विविध विलास स्नेहाचरण । कोणापासीं न करवे कथन । जाकळे मन तत्स्मरणें ॥२१॥
मम वियोगें मातापितरें । स्वभुक्तगोपीअभ्यंतरें । करपती वियोगविरहांगारें । हृदयीं श्रीधरें जाणोनी ॥२२॥
आपण गेलिया न सुटे मिठी । न वाचतांचि वियोगहव्यवाटीं । व्रजनिवासी लहानें मोठीं । शोकसंकटीं बुडतील ॥२३॥
ऐसें विवरूनियां श्रीपति । त्यांचिया शोकाचे निवृत्ति । हृदयामाजी योजिली युक्ति । कुरुभूपति तें ऐकें ॥२४॥
जरी श्रीपति जगन्मित्र । तथापि न वदे रहस्यमंत्र । सद्गुणसंपन प्रिय सत्पात्र । उद्धव स्वतंत्र एकाद्मा ॥२५॥
वृष्णिकुळींचा मंत्रिवरिष्ठ । कृष्णप्रियतम एकनिष्ठ । अमृतापरीस वक्ता मिष्ट । जीवोपदिष्ट सच्छिष्य ॥२६॥
अनन्य अनिंदक सद्बुद्धि । दोषदर्शन न करी कधीं । साक्षात् बृहस्पति ज्यासि बोधी । तो हा त्रिशुद्धि उद्धव ॥२७॥
ऐसा लक्षूनि जगदीश्वरें । नेला एकांतीं धरूनि करें । कथिता झाला गुह्योत्तरें । तीं उत्तराकुमरें परिसावीं ॥२८॥

तमाह भगवान्प्रेष्ठं भक्तिमेकांतिनं क्कचित् । गृहीत्वा पाणिना पाणिं प्रपन्नार्तिहरो हरिः ॥२॥

व्यभिचाररहितभक्तिमंत । अनन्य प्रियतम आत्मनिरत । त्याप्रति षड्गुणैश्वर्यवंत । बोले भगवंत निजगुह्य ॥२९॥
हस्त धरूनियां हस्तीं । कांहीं क्कचित्त गुह्य उक्ति । कथिता झाला करुणामूर्ति । प्रपन्नार्तिपरिहर्ता ॥३०॥
शरणागताचें आर्तिहरण । क्ररावयाचें ज्यातें व्यस्न । तो व्रजविरहें कळवळून । सांगे वचन तें ऐका ॥३१॥

गच्छोद्धव व्रजं सौम्य पित्रोरनु प्रीतिमावह । गोपीनां मद्वियोगाधीं मत्संदेशिर्विमोचय ॥३॥

सौम्य ऐसें संबोधन । कीं श्रमह्र्ता तूं सोमसमान । तनुताप निरसी अमृतकिरण । निरसे तुझेन मनोग्लानि ॥३२॥
उद्ध्वा जाऊनि व्रजाप्रति । स्वमुखें नंद यशोदासती । मझी निवेदूनियां विनति । बोधूनि आर्ति निरसावी ॥३३॥
गोपी माझिया वियोगदुःखें । सदा संतप्त विरहशोकें । माझे निरोप संगोनि मुखें । त्वां त्य स्वसुखें निववाव्या ॥३४॥
माझ्या परिसोनि वेणुगीत । गोपी झाल्या भवसुखविरता । सांडूनि धनसदनदिकांतापत्यां । मम एकांता अनुसरल्या ॥३५॥
मत्प्रेमवेधें रंगलीं मनें । इहमुत्रार्थफळभोगवमनें । मानूनि भजल्या मजकारणें । भववेदने विसरोनी ॥३६॥
ईषणात्रय घालूनि मागें । वोटंगल्या वाड्मनआंगें । नित्य रंगल्या मत्प्रेमरंगें । मग म्यां श्रीरंगें रमविल्या ॥३७॥
धर्मशास्त्रार्थ बहुधा नीति । म्यां बोधितां तयांप्रति । त्यांची मन्निष्ठ चित्तवृत्ति । न वचे कल्पांतीं पालटिली ॥३८॥

ता मन्मनस्का मत्प्राणा मदर्थे त्यक्तदैहिकाः । मामेव दयितं प्रेष्ठमात्मानं मनसा गताः ।
ये त्यक्तलोकधर्माश्च मदर्थे तान्बिभर्म्यहम् ॥४॥

त्या मन्मनस्का मत्प्राणा । मदर्थ शरीरसंबंधिजना । त्यागूनि झालिया मदेकशरणा । प्रिय्तम आना न मनिती ॥३९॥
मातेंचि मानिती प्रियतम इष्ट । माझ्याचि ठायीं आत्मनिष्ठ । कायावाचामनें स्पष्ट । ममाभीष्ट तें करिती ॥४०॥
माझी क्रीडा हृदयीं स्मरती । मद्गवेषणा आठविती । वाळवंटीं विरहावर्तीं । गाइल्या उक्ति मम वेधें ॥४२॥
त्यांचें करितां अनुस्मरण । तेणें मन्निष्ठ होय मन । भवव्यवहारीं वृत्तिशून्य । करिती शासन श्वशुरादि ॥४३॥
मातें देखोनि वाळवंटीं । हस्त घालूनि माझ्या कंठीं । सप्रेमभावें पडली मिठी । त्या ते गोठी मनीं स्मरती ॥४४॥
मन्निष्ठ जाणोनि ऐसिया ललना । म्यां तयांच्या भ्रमापरहरणा । हल्लीसक क्रीडारचना । राससंज्ञा निर्मिली ॥४५॥
जितुक्य गोपींचिया व्यक्ति । म्यांही तितुक्या धरूनि मूर्ति । दिधली रासमिषें विश्रांति । अमरांप्रति दुर्लभ जे ॥४६॥
मन्निष्ठचि त्यांचें मन । तें न विसरती अर्ध क्षण । अस्ताव्यस्त प्रवृत्तिभान । करणज्ञान पारुषलें ॥४७॥
ऐसिया गोपी मन्मनस्का । मन्निष्ठ आबाल्यवयस्का । मदर्थ बहुजन्मीं तपस्का । वेधती अयस्कांतापरी ॥४८॥
अक्रूरें मज आणितां मथुरे । ऐकोनि त्यांचीं चित्तें आतुरें । न म्हणती माहेर कीं सासुरें । घरें लेंकुरें विसारल्या ॥४९॥
ठायीं ठायीं मदर्थ रड्ती । मद्वियोगें विकळ पडती । विरहानळें हृदयीं कढती । सप्रेम जडती मच्चरणीं ॥५०॥
म्यां न वचावें सहसा दुरी । ऐसा मनोरथ अभ्यंतरीं । तो सूचिती बहुतां प्री । संकेतकुसरी दाऊनी ॥५१॥
अक्रूरासी करिती विनति । मथुरे न नेईं श्रीपति । आश्वाअसिलें म्यां तयांप्रति । येईन पुढतीं म्हणोनियां ॥५२॥
र्थ हांकितांचि अक्रूरें । मज मीनल्या अभ्यंतरें । मागें टाकिलीं कलेवरें । लोकव्यापारएं सांडविलीं ॥५३॥
मग म्यां पूर्वपरामर्ष । करूनि ओपिला स्मतीचा लेश । तेणें सांडूनियां श्वास । व्रजा सक्लेश परतल्या ॥५४॥
निषादें विंधिली जेंवि हरिणी । तेवीं सक्षता वियोगबाणीं । माझें चिंतन अंतःकरणीं । गृहाचरणीं वैकल्य ॥५५॥
अक्रूरावरी करिती कोप । म्हणती केवढ हा निष्कृप । वृथा अक्रूरसंज्ञाजल्प । कृतांतकल्प निष्ठुर हा ॥५६॥
कृतांताहूनि अधिक क्रूर । कं पां म्हणती या अक्रूर । ग्रहांमाजि जो अंगार । मंगलवासर तो जैसा ॥५७॥
रक्षसा म्हणती पुण्यजन । शस्त्रधारे जळाभिधान । वत्सनाभीतें अमृतपण । अक्रूराभिधान या तैसें ॥५८॥
इशा शापिती गांदिनीसुता । मन्निष्ठ करूनि एकात्मता । मत्संकल्प ग्रथिती चित्ता । तो तूं आतां अवधारीं ॥५९॥
रामकृष्ण रथारूड । वारू चालती झडझड । सवेग रथाची घडघड । मानिती कोड रथयानीं ॥६०॥
मार्गीं अनेक कौतुकें । शकुंतें शुकसारिकप्रमुखें । हंस मयूर मृग जंबुकें । देखती मुखें पथिकांचीं ॥६१॥
तेणें हर्षें पथाक्रमण । अमुचें किमर्थ त्यातें स्मरण । इत्यादि संकल्प बल्लवीगण । चित्तें क्रूनि कल्पिती ॥६२॥
आतां जाती मथुरापुरीं । बंधु बैसोनि रहंवरीं । पुढें येती नगरनारी । चतुरा सुंदरी नागरा ॥६३॥
रत्नजडित त्यांचीं लेणीं । वाड्माधुर्य शब्दकडसणी । बळरामेंसी चक्रपाणि । अर्धक्षणीं भुलविती ॥६४॥
पुन्हा आमुची तेथ वार्ता । कासिया स्मरेल त्याचिया चित्ता । आम्ही घुरटा बल्लववनिता । प्रियतम केउत्या त्यांपुढें ॥६५॥
आजि धन्य त्यांचें नयन । होती देखोनि रामकृष्ण । आजि सफळ त्यांचें पुण्य । दैवहीन पैं आम्ही ॥६६॥
मार्गीं चाल्तां रामकृष्णा । झणे वरपडे होती उष्णा । अन्नपानाची होतां तृष्णा । करिती प्रश्ना अक्रूरा ॥६७॥
उष्णें कोमेजती वदनें । तेव्हां स्मरती निकुंजसदनें । विरहें संतप्त होती मदनें । मान्मथकदनें तैं स्मरती ॥६८॥
अक्रूर नेईल कंसाभेंटीं । कंस दुरात्मा निर्दय कपटी । घालील कवण विघ्नसंकटीं । म्हणोनि पोटीं कळवळती ॥६९॥
ऐसे संकल्प मत्पर । मनें कल्पिती निरंतर । त्यांचा प्राण मी श्रीधर । मदर्थ पतिपुत्र त्यागिले ॥७०॥
सासू श्वशुर देवव्र भावे । तिहीं मदर्थ त्यागिले आघवे । मजसीं ओटंगल्या जीवें । आन नाठवे मजविणें त्यां ॥७१॥
मजकारणें इहामुष्मिक । जिहीं त्यागिले उभय लोक । तदुचित धर्म जे सम्यक । ते निष्टंक त्यागिले ॥७२॥
ऐसे मन्निष्ठ जे जे झले । त्यांचें सर्वस्व मज लागलें । तें म्यां पाहिजे संगोपिले । ओसंडिले न वचती ॥७३॥
योगक्षेमाचें मज ओझें । भरण पोषण करितां न लजे । त्यांचें दास्य बरवे वोजे । करणें माझें बिरुद हें ॥७४॥
वैकुंठक्षीरब्धिप्रमुखें । ऐश्वर्यपदें जे अनेकें । तिहींशित ब्रह्मांड फिकें । तुकितां न तुके तत्संगा ॥७५॥
प्रेमळ संगें जो होय हरिख । न तुके तेणेंसीं ब्रह्मसुख । ब्रह्मसमरसीं होऊनि विमुख । अवतरें देख त्यांसाठीं ॥७६॥
ज्यांचीं माझ्या ठायीं मनें । मन मीनले जीवें प्राणें । मन्निष्ठचि त्यांचीं करणें । विषयाचरणें मदर्थ ॥७७॥
मद्गुणश्रवणीं शब्दग्रहण । मम मूर्तीचें आलिंगन । देव ब्राह्मण गुरु सज्जन । निवती पूर्ण त्य स्पर्शें ॥७८॥
मन्मय पाहती अखिल जग । नेणाती गुणदोषाचें लिंग । कीर्तनसुधारसाचा भोग । जिह्वेसि चांग दाखविती ॥७९॥
अथवा नामामृतरसपानें । जिह्वा सुरंग रंगली स्मरणें । कीं मत्प्रसादतीर्थग्रहणें । फवली रसने रसगोडी ॥८०॥
मदर्चनींच वेधले कर । मत्पर ज्यांचा पदव्यापार । मदर्थ करिती शौचाचार । व्यभिचार मन्निष्ठ ॥८१॥
ऐसे जे कां सर्वांपरी । मज कवळिती अभ्यंतरीं । त्यांची तैसीच मज अवसरी । मी संसारीं त्यांसाठीं ॥८२॥
त्यंचा योगक्षेम मी वाहें । मागें पुढें उभा राहें । त्यांचें विषम मज न साहे । मी लवलाहें तें निरसीं ॥८३॥
त्यांची वाट झाडीं हातें । कृपापीयूषें पोषीं त्यांतें । आपुले शिरीं त्यांचीं दुरितें । घेऊनि सरतें त्यां करीं ॥८४॥
परस्परें प्रेमजिव्हाळा । वदों न शकें मी तेथींची कळा । यालागीं गोपींचा कळवळा । स्मरतां डोळां जळ झिरपे ॥८५॥   

मयि ताः प्रेयसां प्रेष्ठे दूरस्थे गोकुलस्त्रियः । स्मरत्योंऽग विमुह्यंति विर्होत्कंठ्यविह्वलाः ॥५॥

गोपीस्नेहाचें अवतरण । अमनस्का मज होय स्मरण । अवस्था जाकळी मजला पूर्ण । मां त्यांचे प्राण केंवि राहती ॥८६॥
माझ्या ठायीं त्या प्रियतमा । मी तयांचा केवळ आत्मा । दूर अंतरतां मग त्या वामा । गोकुळग्रामामाजिलिया ॥८७॥
स्मरणें झुरझुरूं पंजर होती । विमुह्यंति म्हणिजे भुलती । विरहोत्कंठा वाहतां चित्तीं । विह्वळवृत्ति परवशता ॥८८॥
अंग म्हणोनि संबोधन । उद्धवा संबोधी भगवान । कीं तो अनिंदक अनन्य सुमन । कोमळामंत्रण या हेतु ॥८९॥
गोपी स्मरोनि कृष्ण जैसी । उद्धव अवस्थाभूत तैसा । देखोनि देवाचिया मानसा । गहिंवर सहसा न संवरे ॥९०॥
मग म्हणे गा उद्धवा ऐक । माझे अंतरीं इतुकचि धाक । गोपींसी न साहवे वियोगदुःख । तथापि ऐक रहस्य ॥९१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP