मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४६ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ४६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ४६ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर एतौ हि विश्वस्थ च बीजयोनी रामो मुकुन्दः पुरुषः प्रधानम् । अन्वीय भूतेषु विलक्षणास्य ज्ञानस्य चेशात इमौ पुराणौ ॥३१॥राममुकुन्द हे सहोदर । निखिल विश्वाचे मातापितर । बीजशब्दें जनकोच्चार । मातृजठर त योनि ॥३२॥नंदा म्हणसी प्रकृतिपुरुषें । इयें विश्वाचीं जननीजनकें । तेचि हे राममुकुन्दवेखें । प्रधानपुरुष जाणावे ॥३३॥हेंचि कानडें वाटेल जरी । तरी निमित्तोपादनभेदकुसरी । वाखाणिजे वेदांतशास्त्रीं । ते हे निर्धारीं बळकृष्ण ॥३४॥निमित्तकारण संकर्षण । कृष्ण केवळ उपादान । सांख्यसिद्धांतीं व्याख्यान । ऐसेंचि जाणा केलेंसे ॥३३५॥रासभचक्रादि उपसंपत्ति । निमित्तकारण यातें म्हणती । उपादान तें केवळ माती । घटदृष्टांतीं समजावें ॥३६॥निमित्तकारणे मातीच घट । तेंवि विश्व हें ब्रह्मचि स्पष्ट । भ्रमनिमित्तें दृष्टादृष्ट । कर्म प्रकट रूढवी ॥३७॥कुलाल कर्ता जेवीं मृद्धटा । संकल्पकर्ता ब्रह्मांडमठा । एवं घटमठदृष्टांतवाटा । वास्तव निष्ठा टाकाव्या ॥३८॥संकल्पशुद्ध सत्व ईश्वर । तो हा बळराम रोहिणीकुमर । उपादान जें निर्विकार । कृष्ण साचार परब्रह्म ॥३९॥एवं अभेद वस्तु एक । परंतु विधि कृतसंस्थापक । काळकुळनानुरूप विवेक । लेऊनि सम्यक अवतरती ॥३४०॥ तोचि अवतरता प्रकार । ऐकें नंदा सविस्तर । करावया जगदुद्धार । करूणाकार काय करी ॥४१॥आपुली अभिन्न चिदात्मशक्ति । सत्तामात्र निर्गुण ज्ञप्ति । जीतें म्हणती अभेदभक्ति । तीतें विभक्ति उपजवी ॥४२॥निर्विषयिक चिदात्मरति । निरुपाधिक सुखविश्रांति । चिद्विलासीं अभेदस्फूर्ति । द्विधा व्यक्ति पावोनि ॥४३॥एकमेकांसाठीम झुरती । एकमेकांची आवडी धरिती । परस्परें उपजे प्रीति । स्वविस्मृतीमाजिवडी ॥४४॥नारी नरातें मानी प्रिय । रमता प्रेमा सर्वांतरीं । कीर्ति नोहे जगदुद्धारीं । तैं द्विधा करी निजभक्ति ॥३४५॥ऐसी क्रीडा परस्परीं । रमतां प्रेमा सर्वांतरीं । कीर्ति नोहे जगदुद्धारीं । तैं द्विधा करी निजभक्ति ॥४६॥एकी नामें आराधनी । दुजी बोलिजे विरोधिनी । सवेग पक्षद्वय धरूनी । समस्त जनीं विरूढल्या ॥४७॥विरोधभक्ताचा विभाग । आसुरी संपत्ति असुरा चांग । दैवी संपत्ति यथासांग । आराधनांग दैवपक्षीं ॥४८॥भक्ति विरोधी एक मुख्य । तेथ मिळे तो असुरपक्ष । ते अवघेचि विरोधिभजक । करिती सम्यक एकवळा ॥४९॥आराधकांसि विधिविरोध । करिती धर्माचा उच्छेद । ते ते पावोनियां खेद । स्मरती गोविंद संकटीं ॥३५०॥तेव्हां आराधकांच्या कैवारें । विरोधियांच्या आविष्कारें । युगीं युगीं स्वयें अवतरे । तद्विकारें उपयुक्त ॥५१॥सुखदुःखादि भयाभय । यश अयश आपणचि विये । वांटूनि दोघां देता होय । तेही सोय अवधारीं ॥५२॥आराधकासि अयश आपणचि विये । वांटूनि दोघां देतां होय । तेही सोय अवधारीं ॥५२॥आराधकासि विधीचें भय । विरोधी धृष्ट आणि निर्भय । विरोधियांचें सुख तें विषय । भक्त निर्विषय वैराग्यें ॥५३॥आराधकांसि यश निर्मळ । विरोधकांसि अपयश समळ । दोहीं रूपें एक गोपाळ । मोडल्या खेळ स्वयें निवडे ॥५४॥भक्त मोक्षाचे अधिकारी । विरोधी कैसेनि पां संसारी । ज्यांसि अवतरोनि देव मारी । ते नरकीं घोरीं कें पचती ॥३५५॥एवं देवासुरपक्षग । यथाधिकारें अवघेंचि जग । प्रसवले रामकृष्ण हेचि दोघ । प्रधान पुरुष जगज्जनक ॥५६॥ऐसें जनकत्व प्रतिपादिलें । आतां ईशत्व कवण्या बोलें । तेंही पाहिजे श्रवण केलें । जैसें कथिलें मुनिवर्यें ॥५७॥विरोधियां आणि भक्तां । दोघां द्विविध ज्ञानदाता । नंदा म्हणसी कोण तत्वता । निर्धारितां ईश्वर हे ॥५८॥जे जे मुकुंद संकर्षण । कथिले पुरुष आणि प्रधान । तेचि नियंते ईश्वर जाण । द्विविधज्ञानप्रेरक ॥५९॥श्लोकार्ध पोरोवश्लोकस्य । अन्वीय भूतेषु विलक्षणस्य । ज्ञानस्य चैशात इमौ पुराणौ ॥३१॥पंचधाप्रकृतिजनित भूतें । अनुप्रवेश करूनि तेथें । गौण ज्ञान इंद्रियांतें । विषयस्वार्थें प्रेरक हे ॥३६०॥गुणानुसार देवासुर । भक्त आणि विरोधकर । प्रवृत्तिसारिखे ज्ञानांकुर । उद्बोधकर बळकृष्ण ॥६१॥भूतें होऊनि भूतीं प्रविष्ट । तत्प्रवृत्तिज्ञान श्रेष्ठ । गुणानुरूप जें अभीष्ट । इष्टानिष्टद्योतक हे ॥६२॥आणि प्रवृत्तीहूनि विलक्षण । निवृत्तिरूप जें अपरोक्षज्ञान । तदुद्बोधक हेचि पूर्ण । रामकृष्ण जाणावे ॥६३॥एवं प्रवृत्ति निवृत्ति । बहुविध ज्ञानें जीवांप्रति । त्यांचे नियंतार ज्ञानदाते नियामक । ईश्वर निष्टंक केवीं हे ॥३६५॥तरी हे पुराणपुरुष आद्य । वेदवेदांतीं प्रतिपाद्य । इयें अवतारनाट्यें विशद । करिती विबुधकैवारें ॥६६॥हे अनादि विश्वकारण । तरी सहजचि यातें जनकपण । आणि उभयज्ञानप्रेरक जाण । नियंते म्हणोन ईश्वर हे ॥६७॥जरी तूं म्हणसी जीवांप्रति । प्रजाजनें जनकत्वप्राप्ति । तरी सृष्ट्यादिकर्मावेशगति । जगदुत्पत्तिकारक हे ॥६८॥कर्मवासनाबीजें जीव । जन्ममरणें भोगिती भव । तेंवि यांतेंही गर्भीं प्रभव । तैं विशेष गौरव यां कैसें ॥६९॥तरी तूं नंदा ऐसें न म्हण । यांचें अवधारीं महिमान । श्लोकद्वयें तें निरूपण । श्रोतीं श्रवण करावें ॥३७०॥यस्मिञ्जनः प्राणवियोगकाले क्षणं समावेश्य मनो विशुद्धम् । निर्हृत्य कर्माशयमाशु याति परां गति ब्रह्ममयोऽर्कवर्णः ॥३२॥जनासमान कैसे नव्हती । तें तूं ऐकें बल्लवपति । जनामाजि जो विशुद्धमति । तो प्राणांतीं स्मरे ज्या ॥७१॥ज्याचे रूपीं विशुद्ध मन । क्षणैक प्रवेशूनि सज्जन । अंतकाळीं सोडी प्राण । पद निर्वाण तो पावे ॥७२॥आंगीं असतां जीवदशा । निर्वाणपदवी पावे कैसा । ऐसी शंका तव मानसा । तरी तूं व्रजेशा अवधारीं ॥७३॥कर्मवासना बीजरूप । हेंचि जीवांचें स्वरूप । तो त्यागोनि कर्मलेष । ब्रह्मेस्वरूप मग होय ॥७४॥रूपनाम ब्रह्मीं नाहीं । तरी ब्रह्मस्वरूप कैसा काई । परोक्षज्ञानवंत पाहीं । शुद्ध लक्ष्यांशें निवडला ॥३७५॥विश्व केवळ अर्कवर्ण । शुद्धसत्त्वात्मक होऊन । परांगति जें पद निर्वाण । शीघ्र सन्मय तेथ मिळे ॥७६॥ज्याचे रूपीं मन निमग्न । करूनि जो जन सोडी प्राण । तो वासनाक्षय करून । ब्रह्म निर्वाण पद पावे ॥७७॥त्यासि जीवासमान गणणें । तेव्हां मूर्खत्वा काय उणें । तुम्ही कृतकृत्य दोघे जणें । कवण्या गुणें तें ऐका ॥७८॥तस्मिन्भवंतावखिलात्महेतौ नारायणे कारणमर्त्यमूर्तौ ।भावं विधत्तां नितरां महात्मन्किंवाऽवशिष्टं युवयोः सुकृत्यम् ॥३३॥अखिलचराचरात्मक बीज । नारायण तो मायामनुज । तो भावूनि आत्मतनुज । भजलां सहज अनुरागें ॥७९॥आजवरी तुमचाचि बाळक । आतां तैसाचि वसुदेवतोक । न तो कवणाचा निष्टंक । आदिपुरुष परमात्मा ॥३८०॥तो अवतारी मानवमूर्ति । त्याचे ठायीं तुमची रति । जडली तेणें भवविरक्ति । आणि उपरति साधली ॥८१॥इहामुत्रार्थफळसाधन । प्रवृत्ति प्रकटी वेदविधान । ते प्रवृत्तीचेंचि अस्तमान । मन निमग्न जें कृष्णीं ॥८२॥तो तुम्हांसि कृष्णानुराग । त्यालागीं इहामुत्रार्थभोगविराग । नित्यानित्यवस्तु चांग । तुम्हींच सांग विवरिली ॥८३॥नित्यवस्तु ब्रह्म निर्गुण । तो हा जगदात्मा श्रीकृष्ण । ईश्वरपर्यंत प्रपंचभान । अनित्य म्हणोनि विसरलां ॥८४॥ईश्वर अनित्य म्हणाल कैसा । तरी कर्ता ज्ञाता हे ईशत्वदशा । लेवविली ते माये सरिसा । अनित्य ऐसा जाणावा ॥३८५॥मायोपाधीचें निरसन । जालिया कैंचें ईश्वरपण । प्रतिबिंबेंसीं बिंबा जाण । अस्त्तमान एकचि ॥८६॥वट मानूनि अनित्य । वटबीजातें म्हणती नित्य । भव अनित्य ईश्वर नित्य । हा सिद्धान्त तयांचा ॥८७॥यावरी शंका न संभवे । तथापि कोणी बालिशभावें । म्हणती कृष्णीं नित्यत्व फावे । तरी अनित्य मानावें कां ईशां ॥८८॥कृष्ण मायामय मानव । पूर्वींच निरूपिलें हें सर्व । मायातीत वासुदेव । ब्रह्म वास्तव अविरोध ॥८९॥हा नित्यानित्यवस्तुविचार । तुम्ही न करितां घडला सार । साधनषट्काचा प्रकार । तो सविस्तर अवधारा ॥३९०॥कृष्णीं लागतां अनुराग । भवविषयात्मकवासनात्याग । न लगे दमावा इन्द्रियवर्ग । शमदम सांग सहजेंचि ॥९१॥तुमचें मानस कल्पनाशून्य । कृष्णाकार झालें पूर्ण । प्रपंचापासूनि प्रत्यक्प्रवण । कोण ते जाण याहूनी ॥९२॥कृष्णीं विरोनि गेलिया चित्ता । द्वंद्वतापसहिष्णुता । घडली साक्षी चिंतनसत्ता । कोण जाणता द्वंद्वातें ॥९३॥आतां श्रद्धा म्हणिजे प्रीति । तिणें कृष्णें केली रति । तेणें पारुषली प्रवृत्ति । एकान्तभक्ति फावली ॥९४॥विश्वास गुरुवेदान्तवचनीं । ते परोक्षश्रद्धा षट्कासाधनीं । अपरोक्षप्रेमा तुमचा कृष्णीं । मोक्षामूर्ध्नीं जो मिरवे ॥३९५॥कृष्णवियोगें पावतां शीण । यालागीं कथिलें कृष्णमहिमान । तें विवरून माझें वचन । एकाग्र मन करावें ॥९६॥श्रीकृष्णरूपीं एकाग्रमन । यापरौती समाधि कोण । एवं न करितां षट्साधन । तुम्हीं संपूर्ण साधिलें ॥९७॥कृष्णविक्योगें असहिष्णुता । हेचि मुख्य मुमुक्षुता । ज्ञानें मोक्ष सिद्ध तत्वता । तेंचि आतां विवरा हो ॥९८॥अन्वयव्यतिरेकेंकरून । कृष्णरूपीं विरतां मन । साधिलें सिद्धान्त अपरोक्षज्ञान । झालां म्हणोनि कृतकृत्य ॥९९॥कृष्ण परब्रह्म सुनिश्चित । तेथ क्षणमात्रही थारतां चित्त । प्राणि होय कृतकृत्य । हा सिद्धान्त श्रुतिमाथां ॥४००॥ज्याचें क्षणैक कृष्णीं मन । स्थिर होय समरसोन । तेणें सांग सर्व यज्ञ । केले संपूर्ण व्रजपाळा ॥१॥ब्रह्मांडींचिया तीर्थीं सकळीं । तदुचित माहात्म्य पर्वकाळीं । यथाविधानें स्नानें घडलीं । जैं कृष्णीं जडली मति राहे ॥२॥देश काळ पात्र शोधूनी । वेदविहितविधिविधानीं । कनकरत्नीं भरूनि अवनी । दिधली दानीं पैं तेणें ॥३॥तेणें समस्त पितृगण । तारिले संसारापासून । पावविले ब्रह्मसदन । कृष्णीं मन स्थिर होतां ॥४॥सर्वव्रतें अनुष्ठिलीं । सर्व तीर्थीं स्नानें केलीं । जेव्हां कृष्णीं स्थिर झाली । चित्तवृत्ति क्षण एक ॥४०५॥रत्नीं भरूनि पृथ्वी दिधली । पितृमंडळी मोक्षा नेली । जेव्हां कृष्णीं स्थिर झाली । चित्तवृत्ति क्षण एक ॥६॥सर्ववेदाध्ययनें केलीं । तपश्चर्या सिद्धी नेली । जेव्हां कृष्णीं स्थ्रिर झाली । चित्तवृत्ति नावेक ॥७॥यालागीं तुमची चित्तवृत्ति । कृष्णीं रंगोनि ठेली पुरती । तेणें झाली भवनिवृत्ति । विषयभ्रांति पारुषली ॥८॥क्षणैक कृष्णीं राहतां मन । तेणें कृतकृत्य होती जन । तुम्हांसि अवशिष्ट कृत्य कोण । कृष्णीं संपूर्ण रंगलिया ॥९॥जागृतिस्वप्नसुषुप्तीआंत । कृष्णाकार तुमचें चित्त । सबाह्य साधला एकान्त । कृतकृत्यार्थ सर्वत्र ॥४१०॥आतां असो हा परमार्थ । कृष्णें ज्यालागीं धाडिलें येथ । तो कृष्णाचा निज गुह्यार्थ । तुम्हीं यथार्थ मानावा ॥११॥आगमिष्यत्यदीर्घेण कालेन व्रजमच्युतः । प्रियं विधास्यते पित्रौर्भगवान्सात्वतां पतिः ॥३४॥अदीर्घ म्हणिजे स्वल्पकाळान्तीं । अच्युत येईल व्रजाप्रति । ऐश्वर्यसंपन्न सात्वतपति । देईल विश्रांति तुम्हां पितरां ॥१२॥हत्वा कंसं रंगमध्ये प्रतीपं सर्वसात्वताम् । यदाहं वः समागत्य कृष्णः सत्यं करोति तत् ॥३५॥कंस यदुकळाचा द्वेष्टा । र्म्गीं मारूनि तया दुष्टा । कृष्नें येऊनि तुम्हां श्रेष्ठां । स्वमुखें निष्ठा हे कथिली ॥१३॥जें ताता जावें व्रजाप्रति । मी ही येईन शीघ्रगति । स्निग्ध यादव दुःखावाप्ति । त्यांसि विश्रान्ति देऊनी ॥१४॥तें यथार्थ करील शौरी । सत्य मानीं हे मम वैखरी । प्रतीक्षा करितां शिणलों भारी । म्हणाल तरी अवधारा ॥४१५॥कृष्ण कधीं येईल न कळे । वियोगें विलंब असहनशीळें । वाट पाहतां शिणले डोळे । तरी तुम्हांचि जवळी हरि नांदे ॥१६॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP