मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४६ वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ४६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ४६ वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर गायंतीभिश्च कर्माणि शुभनि बलकृष्णयोः । स्वलंकृताबहिर्मोपीभिर्गोपैश्च सुविराजितम् ॥११॥जन्मापासूनि रामकृष्णीं । जे जे क्रीडा व्रजभुवनीं । केली ते ते गाती वदनीं । मनीं स्मरोनि तद्वेधें ॥२६॥रामकृष्णांचीं कल्याणकर्में । हृदयीं स्मरोनियां सप्रेमें । विवशवृत्ति मनोधर्में । गाती नामें गुणगरिमा ॥२७॥राकारमणवदना गोपी । प्रथमवयसा नवकंदर्पी । दिव्याभ्रणीं रविभा लोपी । ज्यंचे रूपीं हरि वेधें ॥२८॥आणि सांडूनि त्रिविष्टप । त्रिदश जेथें जाले पशुप । तो हा नंदव्रज अमूप । शोभामंडप मिरवीतसे ॥२९॥गोपगोपी लावण्यराशि । सालंकृता शुभवाससी । स्वसौंदर्यें व्रजभुवनासी । शोभाविशेषीं शोभविती ॥१३०॥आणखी गोपाळांची वसती । सकळ स्वधर्में गुणसंपत्ति । तेणें गोकुळ शोभविती । तें तूं भूपती अवधारीं ॥३१॥अग्न्यर्कातिथिगोविप्रपितृदेवर्चनान्वितैः । धूपदीपैश्च माल्यैश्च गोपावासैर्मनोरमम् ॥१२॥अग्न्यवरदान सायंहोमीं । प्रभाते होमिती सूर्यनामीं । अतिथिपूजिचिया नियमीं । पुरुषोत्तमीं समरसती ॥३२॥गोगोपांचें कुळदैवत । अनन्यभावें विप्रभक्त । सर्वदा पितृभजनीं निरत । अतंद्रित सुरार्चनीं ॥३३॥मलापकर्षण शुद्धशानें । दिव्यवसनें दिव्याभरणें । धूपदीपदिव्यसुमनें । सुगंधचुर्णें चर्चिती ॥३४॥अमृततुल्य षड्रस अन्नें । सुगंध शीतळ पवित्र जीवनें । फलतांबूलहेमरत्नें । जे दक्षिणे समर्पिती ॥१३५॥नीराजनें मंत्रकुसुमें । प्रदक्षिणा करिती नियमें । निगमप्रणीत । सूक्तोत्तमें । स्तविती प्रेमें पूजान्तीं ॥३६॥प्रार्थनापूर्वक क्षमापन । अच्युतस्मरणें न्यून तें पूर्ण । करिती ऐसे बल्लवगण । तिहीं करून व्रज शोभे ॥३७॥ऐसे आभीर सन्मार्गनिरत । अग्निसूर्यअतिथिभक्त । गोसुरभूसुरभजनीं निरत । अतंद्रित पैतृकीं ॥३८॥आर्यमुखें अध्यात्मश्रवण । स्वमुखें करिती हरियशःकथन । नित्य नियमें हरिकीर्तन । पादसेवन पूज्यांचे ॥३९॥ऐसियांचियें वसतीकरून । नंदगोकुळ विराजमान । देखोनि उद्धवाचे न्यन । सुप्रसन्न निवाले ॥१४०॥असो ऐसे व्रजनिवसी । स्ववासें शोभविती व्रजासी । भवतीं वनें विपिनें कैसीं । वृंदावनासी शोभविती ॥४१॥सर्वतः पुष्पितवनं द्विजालिकुलनादितम् । हंसकारंडवाकीर्णैः पद्मखंडैश्च मंडितम् ॥१३॥वनें वाटिका उद्यानें । सुपुष्पितें शृंगारवनें । कदळीखंडें च्यूतविपिनें । विविधकाननें विराजती ॥४२॥भंवाते अनेक विटपाराम । रामकृष्णीं धरूनि प्रेम । मुनिवर झाले कल्पद्रूम । सुकृतधाम व्रजविपिनीं ॥४३॥फळप्रसूनीं नवपल्लवीं । शीतळ छाया श्रमितां निववी । ऐसिया तरुवरीं शोभा नवी । व्रजा शोभवी स्वतेजें ॥४४॥वनोपवनीं द्विजांच्या पंक्ति । फळें भक्षूनि विराव करिती । हंसकारंडवादिजाति । पिका कूजती शुकादिक ॥१४५॥तडागसरोवरें उदंडें । त्यांमाजी विचित्रें पद्मखंडें । गुंजारवती भ्रमर कोडें । तुच्छ त्यापुढें अमरपुरी ॥४६॥इत्यादिगुणीं वृंदावान । उद्धवें देखिलें शोभायमान । परमाह्लादें निवालें मन । नंदसदन पातला ॥४७॥तमागतं समागम्य कृष्णस्यानुचरं प्रियम् । नंदः प्रीतः परिष्वज्य वासुदेवधियार्चयत् ॥१४॥श्रीकृष्णाचा अनुचर प्रिय । येतां देखोनि नंदराय । मेळवूनियां हृदय हृदय । प्रम सदय भेटला ॥४८॥यान विश्रामविलें वाटीं । उद्धव धरूनियां मनगटीं । गृहामजीं रत्नपीठीं । सुखसंतुष्टी बैसविला ॥४९॥प्रत्यक्ष मानूनियां रामकृष्ण । किंवा वैकुंठ श्रीभगवान । ऐसिया बुद्धीं उद्धवर्चन । करी आपण व्रजपति ॥१५०॥चरण क्षाळूनि शुद्धोदकें । सदन प्रोक्षी पादोदकें । भाळ शोभवी केशरतिलकें । मलयजपंकें तनु चर्ची ॥५१॥अक्षता माणिक्यरंगाकार । कंठीं घातले सुमनहार । परिमळद्रव्याचा धूसर । पवन श्रमहर जाणविती ॥५२॥दशांग धूप एकारती । उजळूनियां कर्पूरज्योति । महानिवेद्य यशोदसती । कनकताटीं विस्तारी ॥५३॥भोजितं परमान्नेन संविष्टं कशिपौ सुखम् । गतश्रमं पर्यपृच्छत्पादसंवाहनादिभिः ॥१५॥परमान्न पर्पट पयाज्य सिता । नंदें नैवेद्य समर्पितां । हरिस्मरणें उद्धव भोक्ता । झाला तत्त्वता ते काळीं ॥५४॥भाव देखोनि निवाला मनीं । तृप्त झाला प्रियभोजनीं । गंडूषपात्रीं उष्ण पाणी । आंच्वनार्थ अर्पिलें ॥१५५॥प्रक्षाळूनियां करपदवदन । पुसिलें विशुद्धवसनें करून । मंचकीं कशिपु उपवर्हण । मृदुलासनीं बैसविला ॥५६॥मार्गश्रमा विसर्जूनी । सुखें बैसतां मंचकासनीं । नंदें चरणसंवाहनीं । सन्निधानीं बैसविला ॥५७॥स्वागत स्वर्चित सुभोजित । मंचकीं बैसला श्रमातीत । ऐसियातें यशोदाकांत । पुसे वृत्तांत तो ऐका ॥५८॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP