मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४६ वा| आरंभ अध्याय ४६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ४६ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीमत्सद्गुरुगोविंदाय नमः ॥ जय जय प्रणतचकोरचंद्रा । जय जय सच्चित्सुखसमुद्रा । जय जय त्रितापनिदाघहरा । भवभ्रमतिमिरा ग्रासूनी ॥१॥आम्रेडिती बोलिजे जय । तुझा सर्वत्र ऊर्जितोदय । ब्रह्मांडमंडित व्यतिरेकान्वय - । बोधें अव्यय अव्याहत ॥२॥ईश्वरपर्यंत मायामय । म्हणोनि सहजचि त्यातें व्यय । काळकलनाजनित भय । पावती लय अव्याहत ॥३॥म्हणोनि काळकलनातीत । अवशिष्ठ शेष श्रुतिसंकेत । जाणोनि सुरवर मुनिवर मर्त्य । होती प्रणत तव चरणा ॥४॥जन्मसहस्रांचिया कोडी । तपोध्यानयोगपरवडी । मोडतां प्रणतजनांची मोडी । तैं सुकृतजोडी निष्काम ॥५॥निष्कामसुकृता जैं ये शीग । गुरुपदप्रेमा तैं अभंग । अनन्यभावें भजनमार्ग । मिथ्यावियोग विरहद ॥६॥ऐसे जे कां प्रणतचकोर । तत्तर्पक तूं सुधाकर । ऊर्जितसच्चित्सुखसमुद्र । भवमृगनीरनिरसिता ॥७॥भवमृगनीरानिमित्त भ्रमतां । देखोनि तापत्रयसंतप्तां । स्वप्रकाशें रोहिणीभर्ता । भ्रांतां निवविता सहज पैं ॥८॥एवं चंदनीं सहज सुगंध । सहज पीयूषीं सुस्वाद । तेंवि गुरुपदभजनीम बोध । सहजसिद्ध सर्वदा ॥९॥तस्मात् अतीत जितुकीं जन्में । तत्कृत सुकृत तो नामगमे । परंतु वर्तमानप्रेमसंभ्रमें । विषयभ्रमें न बधिजे ॥१०॥याचिवरूनि भूतावगम । वर्तमान श्रीपदप्रेम । सहजभावीं द्वैतोपरम । अपरोक्ष सुगम अमृतत्व ॥११॥जैसी समुद्रावरी वृष्टि । तें जल पूर्वीं समुद्रापोटीं । पतनें समुद्रा ये भेटी । तेंवि हे गोठी त्रिकालीन ॥१२॥ऐसिया स्तवनें प्रणतपाळा । स्तवितां कृपेचिया निहाळा । करूनि विकाशी हृत्पद्ममुकुळा । योजी स्वलीलागुणकथनीं ॥१३॥आरब्ध श्रीमद्भागवत । दशमस्कंध भगवच्चरित । विद्याभसनीं गुरुतोषार्थ । दक्षिणे गुरुसुत अर्पिला ॥१४॥पंचेताळिसावे अध्यायीं । इतुकी कथा संपली पाहीं । तें परिसोनि प्रायोपशायी । मननें हृदयीं नृप ठेवी ॥१५॥मुखींचा केवळ गिळिला बाळें । जाणोनि माउली निजकरतळें । मुखी संतर्पी द्वितीय कवळें । तेंवि स्नेहाळें मुनिवर्यें ॥१६॥गत कथेचें जाणोनि मनन । पुढें आदरी निरूपण । तो हा शेताळिसावा पूर्ण । अध्याय पावन परिसावा ॥१७॥ये अध्यायीं उद्धवाप्रति । व्रजा धाडील लक्ष्मीपति । नंद यशोदा सहव्रजयुवति । शोकनिवृत्ति करावया ॥१८॥क्षात्रकुळीं अवतरोन । वैश्यकुळीं शिशुक्रीडन । संस्काररहित शूद्रपण । स्वैराचरण गोपींसीं ॥१९॥कंसहननांतीं श्रीपति । ज्ञातिसंस्कारविद्यावाप्ति । गोपीविरहशोकापन्ति । उद्धवाप्रति निरूपी ॥२०॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP