अध्याय ३० वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तैस्तैः पदैस्तत्पदवीमन्विच्छंत्योऽग्रतोबलाः । वध्वाः पदैः सुपृक्तानि विलोकार्ताः समब्रुवन् ॥२६॥

ऐशीं कृष्णपदें विविक्तें । ध्वजांकुशादिसुचिह्नितें । तिहीं करूनि तत्पदवीतें । गिंवसीत चालती पुढें पुढें ॥९३॥
तंव अकस्मात कृष्णपदां - । माजि वधूचीं पाउलें प्रमदा । देखूनि झालिया मन्मथक्षुब्धा । करिती अनुवादा ते काळीं ॥९४॥
कृष्णवियोगें विरहग्रस्ता । सापत्नभावें विशेष आर्ता । होउनि करिती वितर्कवार्ता । श्रवण श्रोतां तें कीजे ॥१९५॥

कस्याःप अदानि चैतानि याताया नंदसूनुना । अंसन्यस्तप्रकोष्ठायाः करेणोः करिणा यथा ॥२७॥

कोणे स्त्रियेची इयें पाउलें । भूषाचिह्नित दशांगुळें । कृष्णें नेली जातिये वेळे । कीं जिचें आगळें बालभ ॥९६॥
श्रीकृष्णाचे स्कंधदेशीं । स्थापूनि बाहुप्रकोष्ठासी । हस्तिनी जैसी मदगजासी । स्कंधीं शुंडा वाहुनी ॥९७॥
अंसन्यस्तबाहु तैशी । श्रीकृष्णाच्या पदविन्यासीं । मिश्रपावलीं चाले सरिशी । गति गमकेशी गजगमना ॥९८॥
आम्ही केतकीकंटकपत्रा । समान झालों क्लेशपात्रा । कृष्णभ्रमरें भोगिलें गात्रा । पुष्पमात्रासम तीच्या ॥९९॥
तस्मात् तीच्या सुकृतराशि । समता न करवे निर्जरांशीं । म्हणूनि प्रियतम श्रीधराशीं । कीं त्यासरिसी विहरतसे ॥२००॥

अनयाऽराधितो नूनं भगवान्हरिरीश्वरः । यन्नो विहाय गोविंद प्रीतो यामनयद्रहः ॥२८॥

राधा म्हणिजे हे त्रिशुद्धि कृष्णाराधनाची संसिद्धि । मूर्तिमंत हे यथाविधि । भोगी गुणनिधि हरिप्रेमें ॥१॥
राध साध हे दोन्ही धातु । संसिद्धी विषयीं व्याकरणप्रणीत । राधो ऐसा प्रवर्तत । हिंसाविषयीं धात्वर्थ ॥२॥
तस्मात्संसिद्धिरोपराधा । भगवत्प्रेमाकार जे मुग्धा । यास्तव बाहु ठेवोनि खांदा । श्रीगोविंदासवें विचरे ॥३॥
परम निश्चयेशीं इणें । संतोष केला हरिकारणें । करूनि तीव्र अनुष्ठानें । व्रताचरणें तपश्चर्या ॥४॥
जो कां ईश्वराचा ईश्वर । पूर्णब्रह्म सर्वेश्वर । आराधिला तो मुरलीधर । भजनीं तत्पर होउनि ॥२०५॥
यास्तव सांडूनि अवघ्या जणी । आम्ही अपतस्का विरहिणी । इशींच नेतो चक्रपाणि । एकांत स्थानीं प्रियभावें ॥६॥

धन्या अहो अमी आल्यो गोविंदांघ्र्‍याब्जरेणवः । यान्ब्रह्मेशो रमा देवी दधुर्मूर्ध्न्यघनुत्तये ॥२९॥

ऐका सख्या हो एकी म्हणती । परमाश्चर्य मानूनि चित्तीं । कृष्णांघ्रिकमळस्पर्शें माती । धन्य त्रिजगतीं आम्हांहूनि ॥७॥
गोविंदपदाब्जरेणु धन्य । कमला कमलोद्भव ईशान । कृष्णप्राप्ति अभिवांछून । ज्यातें धरिती निजमौळीं ॥८॥
रजतमादि अघनिवृत्ति । न होतां दुर्लभ भगवत्प्राप्ति । यालागीं हरिपदकमळींची माती । मुकुटीं धरिती अघशमना ॥९॥
धन्य हे गोविंदपदाब्जरेणु । ज्यातें रमादि ब्रह्मेशानु । अघनाशनार्थ मुकुटीं धरून । आनंदती हृत्कमळीं ॥२१०॥
चरणसेवनाचेनि मिसें । रमेसि लाभलें भाग्यविशेषें । त्रिभुवन मोजितां पदविन्यासें । दैवें विखनसें मोजिते ॥११॥
तेचि गोविंदपादोद्भवा । त्रिजगत्पावनीं । अगाधविभवा । स्वयंभ मुकुटीं धरितां भवा। पदरज ठेवा लाधला ॥१२॥
विधिहरकमले अलभ्यप्राप्ति । तेथ इतरांचा केवा किती । अहो आश्चर्य दैवगति । आम्हां संप्राप्ति हरिपद तें ॥१३॥
अनेक सुकृतें वैकुंठ । न टके करितां तपादि कष्ट । भाग्यें जोडल्या गरुडपृष्ठ । मग होय प्रविष्ट अक्लेशें ॥१४॥
तेंवि हे श्रीकृष्णपदाब्जरेणु । आम्हां जोडलें भाग्येंकरून । यांच्या अभिषेकें जनार्दन । विधिहरां समान पावों गे ॥२१५॥
हरिप्राप्तीचें द्वार मुख्य । हरिपदधूळीचा अभिषेक । येणें श्रीकृष्णाचें ऐक्य । घडतां अशक्य न मनावें ॥१६॥
ऐसा ऐकोनि निर्धार । पदाब्जरेणुवंदनपर । होतां आणिकी गोपी क्रूर । वदल्या उत्तर तें ऐका ॥१७॥

तस्या अमूनि नः क्षोभं कुर्वंत्युच्चैः पदानि यत् । यैकापहृत्य गोपीनां रहो भुंक्तेऽच्युताधरम् ॥३०॥

कृष्णपदाब्जधूळि मौळीं । वंदिती विरंचिरमाशूळी । आम्हांसि सुलभ ते ये काळीं । म्हणोनि भूतळीं न्याहाळिती ॥१८॥
तंव ते लागिं नीचीं इयें पदें । कृष्णपदाब्जामाजि विशदें । पाहतां आमुचें हृदय खेदें । विरहविषादें झडपिलें ॥१९॥
पाहतां श्रीकृष्णपदाब्जरेणु । तंव त्यांमाजि मिश्रित तीचे चरण । देखतां क्षोभाचें कारण । काय म्हणोन तें ऐका ॥२२०॥
आम्हां समस्ता गोपिकांचा । जीवनकंद जो कां साचा । तो अधरोष्ठ अच्युताचा । एकली एकांतीं ते प्राशी ॥२१॥
समस्त गोपींचें जीवन । श्रीकृष्णाचें अधरपान । एकली एकांती नेऊन । भोगी संपूर्ण स्वच्छंदें ॥२२॥
कृष्णांघ्रिमाजि तिचीं पदें । आमुचे दृष्टी पडतां विशदें । चित्तें क्षोभविती विरहविषादें । दुःख नुसधें वाढविती ॥२३॥
कृष्णचरणकमळींचे रेणु । वंदिती रमा विरंचि ईशान । आम्हां आनंद तो न फवोन । दुःख दारुण सापत्न्यें ॥२४॥
यालागीं तिचीं पदें नसतीं । ऐसिया कृष्णपदाची प्राप्ति । लाहों तैं वंदों माती । सुखविश्रांतिकारणें ॥२२५॥
ऐसा सापत्न्यवितर्क । करूनि अमिश्र हरिपदांक । हुडकिती तो भावार्थ अचुक । वदला शुक तीं श्लोकीं ॥२६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP