मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३० वा| श्लोक १६ ते २० अध्याय ३० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ३० वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर दैत्यायित्वा जहारान्यामेका कृष्णार्भभावनाम् । रिंगयामास काप्यंघ्री कर्षंती घोषनिःस्वनैः ॥१६॥एकी गोपी नंदकुमर - । रूपें होती क्रीडापर । एकी चक्रवाताकार । गगनीं सत्वर उडविती ॥४८॥गुरुतर सलंब कंठीं कृष्ण । होऊनि उत्पतनीं असहिष्ण । तेणें होऊनि गतप्राण । अधःपतन अनुकरती ॥४९॥एकी कृष्णत्वें बाळभावें । रिंगणाकार घेती धांवे । चपळ जानुघर्षणा सवें । रशना नुपूरें गर्जती ॥१५०॥घंटा किंकिणी वांकी वाळे । गर्जतां छंदें चपळ चौताळे । ऐसे कृष्णाचे बाळलीले । प्रज्ञाबळें अनुकरती ॥५१॥चपळ पळतां जानुघर्षणीं । एकी सवेग कटिकर्षणीं । वोढूनि घेती आकर्षूनी । जाती पळोनि चपळांगी ॥५२॥कृष्णरामायिते द्वे तु गोपायंत्यह्च काश्चन । वत्सायतीं हंति चान्या तत्रैका तु बकायतीम् ॥१७॥एकी कृष्णाचे अनुकार । दावूनि म्हणवी नंदकिशोर । एकी म्हणवी रोहिणीकुमर । रामानुकार दावूनी ॥५३॥कित्तेकी जालिया सवंगडे । भोंवतें कृष्णा मागें पुढें । एकी वत्सासुराचेनि पाडें । कैतवक्रीडे अनुकरती ॥५४॥वत्सासुराचा केला वध । तैसे अनुकार दाविती विशद । एकी बकाकार प्रसिद्ध । तैशाच तद्वध अनुकरती ॥१५५॥आहूय दूरगा यद्वत्कृष्णमनुर्कुवतीम् । वेणुं क्कणंतीं क्रीडंतीमन्याः शंसंति साध्विति ॥१८॥धेनुरूपें दूरतरा । एकी अवगती व्रजसुंदरा । एकी वाहोनि वेणुस्वरा । घालिती कुकारा कृष्णत्वें ॥५६॥कृष्णवेणूचिया क्कणिता । दूरस्थ धेनु तृणासक्ता । ऐकोनि धांवती जेंवि त्वरिता । तद्वत वनिता अनुकरती ॥५७॥सप्तस्वरांचिया भंगी । वेणुक्कणितें विविधा रंगीं । दाविती कृष्णाचिया मार्गीं । अन्या चांगीं प्रशंसिती ॥५८॥तालबद्ध मानउत्तरें । तेथ सुष्ठुत्व आविष्कारें । धन्य भला या उत्तरें । चमत्कारें शंसिती ॥५९॥कस्यांचित्स्वभुजं न्यस्यं चलंत्याहापराननु । कृष्णेऽहं पश्यत गतिं ललितामिति तन्मनाः ॥१९॥भूषामंडित बाहु खांदा । ठेवूनि एकीच्या एक प्रमदा । कृष्णावबोधें वदती शब्दा विन्यासभेदा दावुनी ॥१६०॥पहा गे व्रजींच्या समस्त युवति । स्वयें कृष्ण मी माझी गति । न येचि मयूरां हंसांप्रति । लाजोनि ठाती गजगमना ॥६१॥म्हणोनि डोलविती सुंदर आंगें । ललित पाउलें ठेविती चांगें । अमंद ना मंद वेगें । गमनें सुभगें शोभविती ॥६२॥जेंवि शिल्पिकाचिये मती - । माजि अवतरे अव्यक्त मूर्ति । तो जेंवि आणूनि दावी व्यक्ति । नाना आकृति लेख्यादि ॥६३॥नाना अध्वर्यूंची प्रज्ञा । तादात्म्ययोगें कवळीं यज्ञा । किंवा सांख्य समष्टिभाना । व्यतिरेकान्वयपूर्वक ॥६४॥कीं ध्याननिष्ठांचें मानस । क्षीराब्धि श्वेतद्वीप अशेष । गुणोपकरणें भूषा वेष । पावे अभ्यासतादात्म्यें ॥१६५॥तैशा तन्मना व्रजांगना । कृष्ण होऊनि ललितगमना । चालोनि दाविती तें तव मना । कुरुभूषणा कळलें कीं ॥६६॥मा भैष्ट वातवर्षाभ्यां तत्त्राणं विहितं मया । इत्युक्त्वैकेन हस्तेन यतंत्युनिदधेंऽबरम् ॥२०॥तंव एकी म्हणे बल्लववनिता । भेऊं नका हो वृष्टिवाता । मी तयाच्या निवारणार्था । आलों तत्त्वता गिरिधर ॥६७॥निर्भय स्थान म्यां निर्मिलें । ते तुम्हीं पाहिजे आश्रयिलें । ऐसें म्हणोनि उचलिलें । शाठी वस्त्र गिरिभावें ॥६८॥यत्नपूर्वक सत्वर । दावूनि गोवर्द्धनानुकार । लावूनियां एक कर । उत्तरीयांवर उचलिलें ॥६९॥ N/A References : N/A Last Updated : May 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP