मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३० वा| श्लोक १ ते ५ अध्याय ३० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ३० वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच :- अंतर्हिते भगवति सहसैव व्रजांगनाः । अतप्यंस्तमचक्षाणाः करिण्य इव यूथपम् ॥१॥तेंवि गोपी भगवत्संग । लाहतां मदगर्वाचा योग । अंतर्धान अंतरंग । करी श्रीरंग जाणोनि ॥२१॥अकस्मात अंतर्धान । पावला असतां जनार्दन । गोपी विरहतापें करून । करिती गवेषण संतप्ता ॥२२॥मधुमासींच्या मधुतर शाखा । करिणी भक्षूनि मिथुनोन्मुखा । इच्छूनि अभीष्ट मन्मथसुखा । निजनायका वेष्टिती ॥२३॥त्यांतील जैसा यूथपति । वनीं अंतरतां विहारवृत्ति । विरहतप्ता त्या हुडकिती । तेंवि व्रजयुवति कृष्णातें ॥२४॥शक्तिपातोत्थित जैसा शिष्य । देहादिभवभानीं वैरस्य । पावोनि अभीष्ट सामरस्य । लाहे अवश्य विनिमयता ॥२५॥कीटकी जैसी भिंगुरटी । ध्यानतादात्म्यें तनु पालटी । तेंवि कोहंसा उफराटी । वळे उलटी सोहंते ॥२६॥हरिसुखभुक्ता तेंवि ललना । प्रेष्ठ पावतां अंतर्धाना । वेधें करितां तीव्र ध्याना । ज्ञप्तितादात्म्यें पालटल्या ॥२७॥गत्यानुरागस्मितविभ्रमेक्षितैर्मनोरमालापविहारविभ्रमैः ।आक्षिप्तचित्ताः प्रमदा रमापतेस्तास्ता विचेष्टा जगृहुस्तदात्मिकाः ॥२॥भगवंताचे पदविन्यास । लक्षितां असाम्य गमती हंस । जडतां तीव्रध्याना ध्यास । पावे मानस तन्मयता ॥२८॥चंद्रापासूनि चकोरनयनां - । पर्यंत पीयूषरसाचा पान्हां । तेंवि इंगितेंसहित ध्याना । वेधक तनुमना अनुराग ॥२९॥सस्निग्ध तान्हुलें आणि जननी । सकाम कामुक आणि कामिनी । गुरुशिष्यांचा अभेदभजनीं । अवंचकपणीं अनुराग ॥३०॥सूर्यदर्शनें पद्मिनी । कां शशांकोदयीं कुमुदिनी । तैसी सानुरागनिरीक्षणीं । मिथा विकसित स्मितवक्त्रें ॥३१॥कटाक्षविक्षेपमनोहर । सानुरागविलसपर । मधुरगायन आलाप रुचिर । क्रीडाविहार स्मरवृद्धि ॥३२॥इत्यादि रमारमणइंगितें । हरितां व्रजरमणींचीं चित्तें । तादात्म्य पावोनि त्या चेष्टांतें । घेत्या झाल्या शिक्षितवत् ॥३३॥वादककौशल्य वाजंतरीं । कीं बिंबींचे विकार दर्पती मुकुरीं । तेंवि तादात्म्यवेधनिर्भरीं । गोपीशरीरीं हरिचेष्टा ॥३४॥हरितादात्म्यें हरिइंगितें । घेऊनि हरिपण आपणांतें । भावूनि विसरल्या पूर्वावस्थे । भजती स्मृतीतें कृष्णत्वें ॥३५॥कोहं विसरोनि सोहंबोधें । प्रत्यक्चैतन्य स्वरूपवेधें । वेंठतां मिथ्यात्वें विवर्तरोधें । फावे नुसधें एकत्व ॥३६॥तेंवि गोपिका कृष्णात्मका । कृष्णानुराग लाहतां निका । करिती तच्चेष्टा एकैका । व्रजनायका भावूनी ॥३७॥गतिस्मितप्रेक्षणभाषणादिषु प्रियाः प्रियस्य प्रतिरूढमूर्तयः ।असावहं त्वित्यबलास्तदात्मिका न्यवेदिषुः कृष्णविहारविभ्रमाः ॥३॥केवळ कृष्णइंगितेंसहित । आपण होऊनि मूर्तिमंत । एकीमेकींतें सांगत । मी नंदसुत म्हणोनी ॥३८॥कृष्णाचिये चालती चाली । कृष्णमधुरता बोलती बोलीं । कृष्णकृपेच्या न्याहाळीं । न्याहाळिती त्या तादात्म्यें ॥३९॥हास्यवक्त्रें विभ्रमापांग । कृष्णमयचि ज्यांचें सांग । कृष्णा ऐसा स्वजनानुराग । एवं अव्यंग हरिचेष्टा ॥४०॥ऐशा गोपी हरिम जाल्या । वेधें तनुभावा विसरल्या । पूर्वस्मृतीसी अंतरल्या । मग संचरल्या वनांतरीं ॥४१॥गायंत्य उच्चैरमुमेव संहता विचिक्युरुन्मत्तकवद्वनाद्वनम् ।पप्रच्छुराकाशवदंतरं बहिर्भूतेषु संतं पुरुषं वनस्पतीन् ॥४॥कृष्णविरहें भ्रमिता अबळा । सबाह्य प्रवृत्ति मार्गीं बरळा । उचस्वरीं श्रीगोपाळा । गाती वेल्हाळा निर्लज्ज ॥४२॥कृष्णविरहें भ्रमिताचिये परी । रात्रीं भरल्या वनांतरीं । आलापूनि उच्चस्वरीं । श्रीमुरारि हुडकिती ॥४३॥ग्रहपिशाचभ्रमोपहत । मदिरामदें जेंवि उन्मत्त । तैशा फिरती वनाआंत । तीं चिह्नें समस्त अवधारा ॥४४॥कृष्णा म्हणोनि उच्चस्वरीं । हाका मारिती वनान्तरीं । धांवती उन्मत्ताचिये परी । घोर कांतारीं हरिवेधें ॥४५॥वनें लंघूनि वनाप्रति । विखुरल्या सैराटा वनीं भ्रमति । हरिगुण उच्चस्वरीं गाती । वोळखी देती नामाची ॥४६॥ये गा अघबळसंहर्त्तिया । ये गा गोवर्धनधर्त्तया । ये गा स्वजना सुखकर्त्तया । परिहर्त्तया उपसर्गा ॥४७॥पूतनास्तनगरप्राशनकरणा । ये गा गोपीचीरापहरणा । ये गा यमलार्जुनोद्धरणा । दुर्घटहरणा दुरितारि ॥४८॥ये गा मुरलीवादनशीला । ये गा ललनालालनलोला । ये गा प्रमदामानसकमला । अळिउळप्राय अभिरमका ॥४९॥ऐशा गाती अनेक परी । धुंडित होत्सात्या कांतारीं । पुसती विरुद्ध द्रुमवल्लरी । सबाह्याभ्यंतरीं नांदतया ॥५०॥अंतर्बाह्य जैसे गगन । तैसा भूतीं जो परिपूर्ण । पुसती वनस्पतींलागून । जातां श्रीकृष्ण देखिला ॥५१॥त्या गोपींच्या उन्मत्त रीति । स्थावरजंगमीं ज्या प्रश्नोक्ति । श्लोकनवकें वदल्या युवति । तें सावध श्रोतीं परिसिजे ॥५२॥गोप्य ऊचु :- दृष्टो वः कच्चिदश्वत्थ प्लक्ष न्यग्रोध नो मनः । नंदसूनुगतो हृत्वा प्रेमहासावलोकनैः ॥५॥पिंपरी म्हणिजे प्लक्षतरु । वट अश्वत्थ थोर थोर । उच्चपणें दूरद्रष्टार । म्हणोनि श्रीधर त्यां पुसती ॥५३॥अगा अश्वत्था प्लक्षा वटा । आमुच्या चित्ताचा चोरटा । कृष्ण जातां इया वाटा । तुम्हांसि अवचटा आढळला ॥५४॥आकर्षूनि मुरलीगानें । वनीं आणूनि सन्निधानें । प्रेमहासावलोकनें । आमुचीं मनें हरतिलीं ॥५५॥गायनरूप घालूनि फांसा । तेणें आकर्षिलें मानसा । शस्त्रासमान विलोकहासा । प्रेरूनि मानसा चोरिलें ॥५६॥तो आमुचा सर्वस्वहर्ता । तुम्हीं देखिला असेल जातां । झणें असेल अर्ता पर्ता । त्याची वार्ता सांगा हो ॥५७॥ऐशा पुसोनि पुढें जाती । तंव देखिल्या पुष्पजाती । विरहाकुळा बल्लवयुवति । त्यांतें पुसती हरिवार्ता ॥५८॥ N/A References : N/A Last Updated : May 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP