मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३० वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ३० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ३० वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर इत्येवं दर्शयंत्यस्ताश्चेरुर्गोप्यो विचेतसः । यां गोपीमनयत्कृष्णो विहायान्याः स्त्रियो वने ॥३६॥कामी गुंतलाचि पाहिजे । जारिणीचें तो होय खाजें । बळें सांडूनिया लाजे । नीच काजें करविती ॥६८॥असो ऐसिया त्या विरहिणी । नानावितर्कीं श्रीकृष्णकरणी । दाविती भावूनि अंतःकरणीं । वनीं उपवनीं हुडकितां ॥६९॥चित्तें गुंतलीं कृष्णापासीं । विचेतसा त्या लावण्यराशि । काननीं भ्रमती जैसीं पिशीं । देहभावासि विसरूनी ॥२७०॥झाडीं खोडीं अरडी दरडी । धांवती सैराट जैशीं वेडीं । रमली गोविंदीं आवडी । वितर्कपरवडी तच्छंदें ॥७१॥असो ऐसा गोपिकांचा । अभेदभक्तिप्रेमा साचा । यावरी महिमा अभिमानाचा । किंचित् वाचा शुक वर्णी ॥७२॥सांडूनि समस्त व्रजकामिनी । एकली प्रियतम ललना वनीं । घेऊनि गेला चक्रपाणि । लावण्यखाणीं रतिरसिका ॥७३॥बाहु ठेवूनियां खांदां । संलग्न होउनि श्रीमुकुंदा । पदोपदीं विचरतां प्रमदा । कृष्णें प्रमोदा पावविली ॥७४॥चरणीं रुतती तरुवर । ललनालालस भयकांतार । स्कंधीं वाहे मुरलीधर । जे कां सुंदर बहुमानें ॥२७५॥जे उतरूनि पृथ्वीवरी उभा ठाकूनि प्रपदांवरी । पुष्पें वेंचूनि श्रीमुरारी । अत्यादरीं दे जीतें ॥७६॥जिचें स्वकरीं श्रीभगवान । करी केशप्रसाधन । विविधा कुसुमीं मौलग्रथन । वेणिकारचन कौशल्यें ॥७७॥मुकुराकार आपुले नयनीं । लावण्य उमाणी चक्रपाणि । झाली तन्मानें मानिनी । प्रमदागुणीं स्मयरूढा ॥७८॥सा च मेने तदाऽत्मानं वरिष्ठं सर्वयोषिताम् । हित्वा गोपीः कामयाना मामसौ भजते प्रियः ॥३७॥ऐसी बहुधा सम्मानिली । पाहिजे विनयभावा भजली । परी ते उचितातें विसरली । गर्वें फुगली उफराटी ॥७९॥पतिव्रता ज्या साध्वी रामा । क्रीडती जाणोनि कांतकामा । वाढवूनिया विनयधर्मा । दास्यकर्मा अनुसरती ॥२८०॥जैसी श्यामाकमंजरी । उभारितांही बळात्कारीं । सहसा आंगीं ताठा न धरी । पुन्हा स्वीकारी नम्रत्व ॥८१॥तैसें नोहे वर्जरीकणिस । ताठे कुलटेसम विशेष । शुद्ध नम्रत्वें उजळी यश । नित्य निर्दोष पतिव्रता ॥८२॥जारिणीपासूनि ऐसें न घडे । सम्मानितां ते गर्वा चढे । कामिक नाचवी आपणां पुढें । करूनि वेडे तृणप्राय ॥८३॥जेंवि कां द्रव्याचेनि बळें । धनिक राबविती आपुलीं कुळें । तेंवि गोवूनि कामकळे । कामिक मोकळे नाचविती ॥८४॥विद्यादानें राबवी शिष्यां । वेतनें स्वामी राबवी दासां । तैशा कामिनी कामुकां पुरुषां । कामसुखाशा नाचविती ॥२८५॥नेत्र मुरडोनि दाविती रुसणें । बळेंचि कुंथूनि काढिती दुखणें । ईर्ष्यारोषें गर्वें फुगणें । न्यून उपसणें पिशुनापै ॥८६॥प्रेमें अर्पितां न घेती अन्न । अव्हेरिती अर्पिलें वसन । न करवे म्हणती पदाभिगमन । अळुमाळ वचन न साहती ॥८७॥जंव जंव जाविती त्या विकार । तंव तंव कामिक मर्कटाकार । त्यांच्या छंदें नर्तनपर । अन्य विचार विसरोनी ॥८८॥तिचेंचि वालभ वाढवी वाड । तिची मोडूं न शके भीड । तिचे ठायीं विश्वास दृढ । वाटे अवघड तीसाठीं ॥८९॥मायबापादि आप्तकोटी । त्यांतें न गणी तृणासाठीं । कोणी प्रियेची मोडितां गोठी । क्षोभे पोटीं अनिवार ॥२९०॥क्षणक्षणा प्रियेचें वदन । पाहोनि जीवाचें उतरी लोण । येरी मानी तृणासमान । डिंगर करूनि राबवी ॥९१॥तैसी श्रीकृष्णलालनें ललना । चढली लावण्यें अभिमाना । येरी समान मानूनि तृणा । भावी आपणा श्रेष्ठत्व ॥९२॥भूस टाकूनि घेती कण । कीं मृगांग टाकूनि कस्तूरीग्रहण । कीं कंटक सांडूनि सेविती सुमन । घेती सुज्ञ गुणलाभें ॥९३॥तैशा समस्त रानटा गोपी । कृष्णें सांडूनि विगुणा विरूपी । मद्गुणलावण्यकंदर्पकल्पीं । कृष्ण प्रतापी तापविला ॥९४॥कुवलयगंधीं चंचरीक । वेधे नागस्वरें पन्नक । चकोरा वेधी जैवातृक । मत्कामुक हरि तैसा ॥२९५॥तस्मात् माझिये सुकुमारते । गुणलावण्यचतुर्यते । अगाध जाणोनि श्रीअनंतें । वनिताशतें । उपेक्षिलीं ॥९६॥कृष्ण भुलविला गुणलावण्या । त्रिभुवनीं एक मी वरांगना । स्कंधीं वाहे समान सुमना । सुगंधव्याजें स्रग्रूपी ॥९७॥जंववरी अम्लानता असे सुमनीं । तंववरी भजिजे गुणज्ञजनीं । तेंवि माझिये सुकुमारगुणीं । चक्रपाणि वशवर्ती ॥९८॥माझें कुशल सुकुमारपण । असतां कृष्ण मज अधीर । माझें उल्लंघूं शके वचन । धरिला अभिमान सुभगत्वें ॥९९॥कृष्णसम्मानें सगर्वा । चढली प्रमदा गुनस्वभावा । काय बोलिली श्रीकेशवा । कुरुपुंगवा तें ऐक ॥३००॥ततो गत्वा वनोद्देशं दृप्ता केशवमब्रवीत् । न पारयेऽहं चलितुं नय मां यत्र ते मनः ॥३८॥आपुल्या हातें सुगंध सुमनीं । कृष्णें जिची गुंफिली वेणी । जे रमविली बहुतां गुणीं । सम्मानूनि सुभगत्वें ॥१॥त्यानंतरें ते सगर्व ललना । वनप्रदेशीं करूनि गमना । श्रीकृष्णातें बोले वचना । वराभिमाना दाखवूनी ॥२॥पुढें न चलवे मजकारणें । जेथें आवडी धरिजे मनें । तेथें स्कंधीं वाहूनि नेणें । लालसपणें मत्प्रेमें ॥३॥येथूनि चालों न शकें पुढां खांदीं वाहून प्रेमचाडा । तुझें मानस सुखसुरवाडा । वांछी तिकडे मज नेईं ॥४॥कामिक जाणोनि चढली डोई । मग म्हणे चालों न शकें भुई । मना मानेल तेथें नेईं । खांदां घेईं प्रियमानें ॥३०५॥तंव तो असंग आत्माराम । अखंड अजस्र पूर्णकाम । जाणोनि वनितास्मयसंभ्रम । पावे उपरम तें ऐका ॥६॥एवमुक्तः प्रियामाह स्कंध आरुह्यतामिति । ततश्चांतर्दधे कृष्णः सा वधूरन्वतप्यत ॥३९॥प्रमादप्रणीत प्रमदावाणी बोलोनि बोधिला चक्रपाणी । मग तो प्रियतम प्रेमवचनीं । स्कंधारोहणीं प्रवर्तवी ॥७॥देखोनि वशवर्ती वनमाळी । खांदीं घ्यावया बैसला तळीं । मग ते सगर्वा वेल्हाळी । पदाब्जं उचली आरोहण ॥८॥मौळ कवळूनि दोहीं करीं । बैसों जातां स्कंधावरी । तंव अंतर्धाम पावे हरि । राहे सुंदरी चवकली ॥९॥दाही दिशा निरखी डोळां । कोठें न देखे गोपाळा । म्हणे म्यां परम अपराध केला । हरि हरविला हातींचा ॥३१०॥जाणोनि वशवतीं श्रीकृष्ण । करूं इच्छीं स्कंधारोहण । विनयभावें न भजे चरण । ऐसी अज्ञान निर्दैवें ॥११॥हातींचा हारविला चिंतामणि । गर्वा चढोनि पडलें वनीं । आतां माझा अपराध न गणीं । कृपें विरहिणी वांचवीं ॥१२॥तुझिया अधरामृताची रुचि । निधानलक्ष्मी लावण्याची । दुर्लभ जाणोनि कमला शोची । गर्वें हातींची ते गेली ॥१३॥ऐसा पावूनियां अनुताप । आंगीं प्रज्वळला कंदर्प । आथवूनि मन्मथबाप । करी विलाप तें ऐका ॥१४॥हा नाथ रमण प्रेष्ठ क्कासि महाभुज । दास्यास्ते कृपणाया मे सखे दर्शय सन्निधिम् ॥४०॥लावण्यगुणा भुलला कृष्ण । वाढला होता जो अभिमान । कृष्णें पावोन अंतर्धान । केलें निरसन तयाचें ॥३१५॥अखंड असंग निजात्मरत । ललनालाघवीं अनावृत । कामिनीकामीं अनासक्त । नित्य निर्मुक्त श्रीकृष्ण ॥१६॥शशांक बिंबला दिसतां जळीं । धीवरा नाकर्षवे तो जाळीं । तैसा नाकळवे वनमाळी । कंदर्पकेलि कुलटांतें ॥१७॥अनासक्तता प्रकटूनि ऐसी । गुप्त होतांचि श्रीकृष्णासी । कामिनी स्फुंदे उकसाबुकसीं । दीर्घस्वरेंशीं आक्रंदे ॥१८॥हाहाकारें आक्रंदोनी । दीर्घविलापें करी ग्लानि । अश्रुधारा स्रवती नयनीं । मनीं स्मरोनि हरिचरिता ॥१९॥कोठें आहेसी प्राणनाथा । प्राणवल्लभा देईं सुरता । मजला सांडूनि न वचे परता । मम दुश्चरिता नाठवीं ॥३२०॥माझिया परमप्रियतम इष्टा । तव वियोगें पावलें कष्टा । तुज म्यां नेणोनि स्वसंतुष्टा । केल्याचेष्टा त्या विसरें ॥२१॥सरल सुपीन सलंब भुज । प्रेमालिंगनीं आनंदभोज । अधर चुंबूनी मकरध्वज । हृदयकंज प्रकाशीं ॥२२॥पाहातां तुझिया आननचंद्रा । स्वानंदभरितें स्मरसमुद्रा । विकसित होय मानसमुद्रा । सौभाग्यभद्रा सम लाभें ॥२३॥तुजवीण दीना मी तव दासी । कोठें सांडून मज गेलासी । एकली विलापें मी वनवासी । सन्निधानासि मज देईं ॥२४॥दावीं आपुलें सन्निधान । माझें नाठवीं गर्हिताचरण । करूं इच्छिलें स्कंधारोहण । तें उद्धरपण विसरिजे ॥३२५॥केशीं झाडीन मी तव चरण । बाहीं देईन आलिंगन । अधरामृताचें देऊन पान । वांचवीं प्राण जाताती ॥२६॥ऐसें विलाप नानापरी करूनि रुदतां दीर्घस्वरीं । तंव पातल्या सख्या येरी । वनीं श्रीहरि गिंवसितिया ॥२७॥ N/A References : N/A Last Updated : May 04, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP