मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३० वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ३० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ३० वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर अप्येणपत्न्युपगतः प्रिययेह गात्रैस्तन्वन्दृशां सखि सुनिर्वृतिमच्युतो वः ।कांतांगसंगकुचकुंकुमरिजितायाः कुंदस्रजः कुलपतेरिह वाति गंधः ॥११॥अहो ऐका कुरंगिणी । तुम्ही सभाग्या कुरंगपत्नी । तुम्हांसमीप सहकामिनी । कृष्ण येऊनि गेला कीं ॥३॥तुम्हांसि जालें हरिदर्शन । आम्हीं वोळखिलें तुमचें चिह्न । जें पूर्णानंदनिर्भर मन । दिसती नयन संतुष्ट ॥४॥तें हरिदर्शन म्हणाल कैसें । सुंदरीच्या रतिविलासें । ज्याचें सर्वांग चिह्नित दिसे । शोभाविशेषमंडित ॥१०५॥शामतमाललावण्यरसिक । आजानुबाहु मुख शशांक । हृदयीं वधूकुचकुंकुमांक । कज्जलांक गंडयुगीं ॥६॥विरंग अधर वधूनिपीत । परिवेष्टित कटिपट पीत । मदनमोहन मंदस्मित । ललनाभुक्त शुभस्रग्वी ॥७॥ज्याचे कंठींचे कुंदमाळे । कांताअंगसंगाचे वेळे । मिळतां उभय वक्षःस्थळें । कुंकुम लागलें कुचांचें ॥८॥तेणें रंगली लोहीव वर्ण । सकेशरा सुगंध पूर्ण । घ्राणा होतसे अवघ्राण । कीं समीप कृष्ण गमतसे ॥९॥शास्त्रवक्ता सर्वज्ञ मूर्ति । नामें बोलिजे तो कुळपति । कामशास्त्राचे व्युत्पत्ति । गोपी म्हणती कृष्णातें ॥११०॥एवं कृष्णाचिये गळां । कुचकुंकुमाक्त कुंदमाळा । भावूनि तयेचिया परिमळा । पुसती अबळा हरिणींतें ॥११॥कुरंगिणी हो तुमच्या नेत्रां । मदनमोहना स्वकीयगात्रा । दावूनि केलें आनंदपात्रा । तुमची तनुयात्रा धन्यतम ॥१२॥कुरंगनयना कुरंगींप्रति । ऐशा पुसोनि पुढें जाती । फळल्या फळपुष्पीं द्रुमयाति । वितर्क करिती त्यां पाहतां ॥१३॥बाहुं प्रियांस उपधाय गृहीतपद्मो रामानुजस्तुलसिकालिकुलैर्मदांधैः ।अन्वीयमान इह वस्तरवः प्रणामं किं वाऽभिनंदति चरन्प्रणयावलोकैः ॥१२॥सफळ तरु हो सभाग्य तुम्ही । वनीं देखोनि आमुचा स्वामी । विनीत त्याचिये पादपद्मीं । अर्चाधर्मीं अनुसरला ॥१४॥श्रेष्ठ आलिया सदनाप्रति । गृहस्थ पूजिती यथासंपत्ति । कीं उपायनें घेऊनि हातीं । नृपा वंदिती जेंवि प्रजा ॥११५॥तेंवि आपुल्या पुष्पीं फळीं । समीप येतांचि श्रीवनमाळी । पूजा अर्पिली चरणकमळीं । सुकृतबहळीं सज्जन हो ॥१६॥तो बळरामाचा धाकुटा बंधु । मदनमोहन लावण्यसिंधु । रतिरहस्यें लावूनि वेधू । गेला व्रजवधू वधूनिया ॥१७॥वधिल्या बरवें एक्या घायीं । आम्हां न वधूनि वधिलें पाहीं । प्राण असतांही विह्वळ देहीं । हरिली सर्वही मनबुद्धि ॥१८॥बाहु ठेवूनि वनितास्कंधीं । पद्मधारक कौशल्योदधि । मधुप वेधले तुळसीगंधीं । तिहीं मदांधीं अनुयायी ॥१९॥सुगंधतुळसीमाळा गळां । गंधासक्त भ्रमरमेळा । तयां मदांधां अळिउळां । समान काळा अनुयायी ॥१२०॥तुळसीगंधासक्त भ्रमर । जैसे मदांध विवशतर । कामिनीकंठीं घालूनि कर । उभय परतंत्र अनुगामी ॥२१॥मधुपां अनुलक्ष्यें मधुपति । उभयतां समानशील पथीं । येतां देखोनि विनयभक्ति । तुम्ही श्रीपति पूजिला ॥२२॥पुष्पफळोत्करेंशीं मौळी । तुम्ही ठेवितां चरणकमळीं । कृष्णकृपेच्या न्याहाळीं । सुखसुकाळीं डुल्लतसां ॥२३॥ऐसा वनितास्कंधासक्त । पद्मधारक श्रीअच्युत । द्रुम हो सांगा कोठें स्थित । देह संतप्त त्यासाठीं ॥२४॥ऐशा प्रार्थूनि वृक्षांप्रति । कृष्णपदवी अनुलक्षिती । तंव लतावेष्टित वनस्पति । देखोनि बोलती तें ऐका ॥१२५॥पृच्छतेमा लता बाहूनप्यालिष्टा वनस्पतेः । नूनं तत्करजस्पृष्टा विभ्रत्युत्पलकान्यहो ॥१३॥तंव कोणी एका बल्लवी म्हणती । ऐका सखिया हो समस्ती । सन्मुख लता ज्या या दिसती । श्रीकृष्णसंगति यां घडली ॥२६॥बहुतेक कृष्ण स्पर्शला यांसी । म्हणोनि सानंदा मानसीं । यास्तव कृष्ण यांजपाशीं । निश्चयेंशीं हुडकावा ॥२७॥आम्हीं दुर्भगा विरहाकुळा । लता सौभाग्यसुकृतबहळा । कांतसंगतिसुखसोहळा । प्रेमें गोपाळा भोगिती ॥२८॥पति सन्निध असतां आम्हां । पाहणें दुर्घट मेघश्यामा । द्रुमालिंगनीं लतांचा प्रेमा । हरिसंगमा अनुकूल ॥२९॥पति लतांचे तरुवर । त्यांचे बाहु शाखाभार । त्यांसि वेष्टूनि लतांकुर । प्रेमें श्रीधर कवळिती ॥१३०॥कृष्णा क्षेम देती लता । तेणें डोलती उभयता । क्षोभ नुपजे पतींच्या चित्ता । सभग्यता हे यांची ॥३१॥म्हणाल कृष्ण यां भेटला । केंवि तुम्हांसि जाणूं आला । जिहीं चिन्हीं वोळखिला । त्या चिह्नांला परियेसा ॥३२॥कृष्णनखें आमुचे कुच । स्पर्शतां जेंवि येती रोमांच । तेंवि उत्पुलकिता लतां सत्वच । दिसती साच सानुरागा ॥३३॥आपुलाल्या पतिसन्निधि । दुर्लभ क्रीडतां हे सुखवृद्धि । यालागिं श्रीकृष्ण अमृतोदधि । यांहीं त्रिशुद्धि भोगिला ॥३४॥अहो ऐसा करूनि खेद । म्हणती केवढे भाग्य मंद । कृष्णीं रमतां न वटे मोद । द्रुमांसमान पशुपांसी ॥१३५॥शुक म्हणे गा परीक्षिति । कथिली गोपींची उन्मत्तवृत्ति । आतां वस्तुसामर्थ्यशक्ति । तनुविस्मृति तादात्म्यें ॥३६॥आंगींची विसरल्या कामिनीपणें । कृष्णस्मृतीचें लेइल्या लेणें । कृष्णाविर्भावें बोलणें । कृष्णाचरणें अवधारा ॥३७॥इत्युन्मत्तवचो गोप्यः कृष्णान्वेषणकातराः । लीलाभगवतस्तास्ता ह्यनुचक्रुऽस्तदात्मिकाः ॥१४॥कृष्णान्वेषणाचे चाडे । सप्रेमवेधें मानस वेडें । होऊनि उन्मत्तापडिपाडें । पुसती पुढें भेटलिया ॥३८॥वृक्षवल्ली लता द्रुमा । पुष्पपादपा गुल्मा रामा । मृगमानिनी वल्लरीयुग्मा । मेघश्यामा त्या पुसती ॥३९॥एवं उन्मत्ताचिये परी । स्थिरजंगमां पुसतीं हरि । तादात्म्यवेधाचिये भरीं । कृष्णानुकारीं बरळती ॥१४०॥जन्मादारभ्य ज्या ज्या लीला । कृष्ण होऊनि त्या त्या सकळा । स्वयें अनुकरती वेल्हाळा । त्या तूं नृपाळा अवधारीं ॥४१॥चौं श्लोकीं तें अनुकरण । कीजेल शुकोक्तिविवरण । पुढें चौं श्लोकीं व्याख्यान । कथिजेल पूर्ण तन्मयता ॥४२॥पुढती अनुकारचेष्टाकथन । एका श्लोकें अनुकरून । पुढें भूमीं उमटले चरण । बरळती लक्षून व्रजललना ॥४३॥कस्याश्चित्पूतनायंत्याः कृष्णायंत्यपिबत्स्तनम् । तोकायित्वा रुदत्यन्या पदाऽहन् शकटीतयाम् ॥१५॥असो त्यांमाजि अनुकार आतां । प्रथम परिसें धरित्रीकांता । पूतनारूपें बल्लववनिता । कोण्ही एकी अवगल्या ॥४४॥कृष्णरूपें अवगल्या एकी । मौनें निद्रिस्ता मंचकीं । पूतनारूपिणी येऊनि तवकीं । उचलूनि चूचुकीं लाविती ॥१४५॥प्राणासकट प्याला स्तन । म्हणूनि अनुकरती क्रंदून । पसरूनिया करपदवदन । गतप्राण म्हणविती ॥४६॥एकी बाळकरूपें रुदना । करूनि झाडिती कोमळ चरणां । एकीं शकटाकार पतना । तन्निघातें पावती ॥४७॥ N/A References : N/A Last Updated : May 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP