मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३० वा| श्लोक ६ ते १० अध्याय ३० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ३० वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर कचित्कुरबकाशोकनागपुन्नागचंपकाः । रामोनुजो मानिनीनां गतो दर्पहरस्मितः ॥६॥आपुल्या कुसुमामोददानें । श्रांतां विश्रांति अर्पणें । महानुभावांचीं आचरणें । उदारपणें वागविती ॥५९॥म्हणोनि तरुवरां पुण्यशीलां । कृष्णपदवी पुसती अबळा । चंपकादि वृक्षमेळा । संबोधिती पृथक्त्वें ॥६०॥श्वेतरक्तपीतादिक । चतुर्विधकुसुमांचे कुरबक । श्वेत रक्त द्विविधाशोक । आणि चंपक कनकाभ ॥६१॥नाग पुन्नाग पाटळ । इत्यादि पुष्पतरूंचा मेळ । त्यांसि पुसती उताविळ । तुम्हीं गोपाळ देखिला हो ॥६२॥बळरामाचा अनुज हरि । स्मितईक्षणें ललनान्तरीं । रिघोनि सदर्प मानस हरि । तो कांतारीं देखिला ॥६३॥तुम्ही सदय परोपकारी । उदार सत्पुरुषाचे परी । त्याविण आम्ही दुःखिता नारी । वार्ता तर्ही वदा त्याची ॥६४॥ऐशा पुसोनि तरुवरांसी । पुढें शोधितां श्रीकृष्णासी । तंव ते वनीं कल्याणराशि । देखिली तुळसी हरिप्रिया ॥६५॥कच्चित्तुलसि कल्याणि गोविंदचरणप्रिये । सह त्वाऽलिकुलैर्बिभ्रद्दृष्टस्तेऽतिप्रियोऽच्युतः ॥७॥गोपी म्हणती अवो तुळसी । गोविंदाच्या श्रीचरणासीं । परम प्रियतम सुकृतराशी । तुज अहर्निशी न विसंबे ॥६६॥वनमाळांसह वैजयंती । हृत्पद्मस्था पद्मा सती । त्याहूनि विशेष तुजवरी प्रीति । तुज एकांतीं न विसंबे ॥६७॥तूतें प्रियतम श्रीअच्युत । अळिकुळमाळाअभिवेष्टित । पावन सुरभि गंधासक्त । धरितो अभिरत होत्साता ॥६८॥त्या कृष्णाची सांगें शुद्धि । आमुची हरूनि मानसबुद्धि । देखिला असेल काननसंधीं । तरी दावीं त्रिशुद्धी तो आम्हां ॥६९॥मालत्यदर्शि वः कच्चिन्मल्लिके जाति यूथिके । प्रीतिं वो जनयन्यातः करस्पर्शेन माधवः ॥८॥नम्रा गुणाढ्या ज्या युवति । नंदनंदन त्यां वशवर्ती । गुणसंपन्ना मालती जाति । देखोनि पुसती गोपिका ॥७०॥गुणसंपन्ना सुगंधगुणी । नम्रा तनुलाघवें करूनी । यालागीं यांही चक्रपाणि । असेल नयनीं देखिला ॥७१॥मालती जाती नामीं दोहीं । वल्ली गुल्म भेद पाहीं । भाषा नामें बोलिजे जाई । त्यांसै लवलाहीं हरि पुसती ॥७२॥मल्लिका आणि जे यूथिका । आबई जुई नामात्मका । त्यांतें पुसती व्रजनायका । असे ठावुका तरी सांगा ॥७३॥तुम्हां स्पर्शोनि शंतम करी । प्रीति प्रकटोनि अंतरीं । जातां देखिला असेल हरि । तरी झडकरी सांगा हो ॥७४॥दीन दयाळ फलाढ्य तरु । सर्वप्राणितर्पणपर । ज्यांचा सर्वांतरी उपकार । म्हणोनि श्रीधर यां विदित ॥७५॥चूतप्रियालपनसासनकोविदारजंब्वर्कबिल्वबकुलाम्रकदंबनीपाः ।येऽन्ये परार्थभवका यमुनोपकूलाः शंसंतु कृष्णपदवीं रहितात्मनां नः ॥९॥चूत आम्र दोन्ही जाति । काळवैशिष्ट्यें बोलिजती । एक हेमंतीं मुहुरती । आम्र शिशिरीं सर्वत्र ॥७६॥चूताम्राचे जातिभेद । तैसेचि कदंब नीप विशद । लंब वर्तुअळ पर्णी बोध । रक्तश्वेतप्रभेदीं ॥७७॥अहो आम्र अहो चूत । अहो कदंब नीप समस्त । अहो बकुल पारियात । अहो श्लेष्मांत कोविदार ॥७८॥जंबू बिल्वादि आमलकी । चारी बोरी भल्लातकी । ताल तमाल केतकी । हरितकी खर्चूरी ॥७९॥करंज कुटज असन पनस । तिंतिणी गोस्तनी पलाश । पिचुमंदादि चंदनास । पुसती परेश व्रजललना ॥८०॥कारी कर्वंदी कर्मठी । अंजन धामोडे धायटी । शाल्मली आरग्वध मर्कटी । राजादना पुसताती ॥८१॥जितुके यमुनेसमीप द्रुम । जैसे दयाळ मुनिसत्तम । परोपकारार्थ ज्यांचे जन्म । वर्णाश्रम तीर्थाश्रित ॥८२॥पत्रें पुष्पें फळें मूळें । काष्ठ त्वचा अग्र कोवळें । न वंचिती कोण्ह्या काळें । छाये शीतळे निवविती ॥८३॥वृष्टि आतप वात शीत । सर्व साहती जेंवि व्रतस्थ । ऐसे जे परोपकारार्थ । जन्म धरूनि राहिले ॥८४॥परदुःख हरूनि सुखी करिती । म्हणोनि गोपिका त्यांतें पुसती । विरहतप्ता आम्ही युवति । कोण्ही श्रीपती सांगो कां ॥८५॥कृष्णें मानस हिरोनि नेलें । हृदयशून्य आम्हांसि केलें । कोण्ही असेल त्या देखिलें । तरी सवेग कथिलें पाहिजे ॥८६॥दुःख हिरोनि सुखी करणें । कैवल्य साधे या साधनें । यालागिं कृष्णपदवीकथनें । आमुचे प्राणे न वचतां ॥८७॥कृष्ण गेला कोणे वाटे । सूचिजे चालवूनि सूक्ष्म फाटे । तुम्ही सदय स्नेहाळ मोठे । तरी सांगा कोठें हरि गेला ॥८८॥ऐशी द्रुमांतें करूनि ग्लानि । पुढें चालिल्या विरहिणी । तृणीं टवटवीत देखोनि धरणी । तयेलागूनि प्रशंसिती ॥८९॥किं ते कृतं क्षिति तपो बत केशवांघ्रिस्पर्शोत्सवोत्पुलकितांगरुहैर्विभासि ।अप्यंघ्रिसंभव उरुक्रमविक्रमाद्वा आहो वराहवपुषः परिरम्भणेन ॥१०॥अवो धरित्री सांगें गुज । कोण तपश्चर्या घडली तुज । जेणें कृष्णाचे पदरज । तुजला सहज लाभले ॥९०॥तेणें केशवांघ्रिस्पर्शें । तूं मिरवसी हर्षोत्कर्षें । रोमांचिता तृणविशेषें । परमोल्हासें मंडित ॥९१॥उत्कट तपांचें ऐसें फळ । श्रीकृष्णाचें चरणकमळ । स्पर्शोत्साहें आनंदबहळ । तूं निर्मळ भाससी ॥९२॥अहो हा उत्साह येचि काळीं । वृंदावनीं श्रीवनमाळी । क्रीडतां स्पर्शोनि श्रीचरणकमळीं । तुज वेल्हाळी जोडला ॥९३॥तूं विस्तीर्ण वसुंधरा । वृंदावनादि वनसंचारा । क्रीडतां एकदेशी या श्रीधरा । पदाधिकारा लाधलीसी ॥९४॥तया पुण्याचें हें फळ । भोगिसी स्पर्शानंदबहळ । किंवा निखिल ब्रह्मांडगोळ । त्रिविक्रमें आक्रमिता ॥९५॥तैं साकल्यें सन्निधान । स्पर्शले सर्वांगीं श्रीचरण । तेणें उत्साहयुक्त पूर्ण । प्रेमरोमांच वाहसी ॥९६॥अथवा त्याहूनि पूर्वीं सुभगें । आलिंगितां वराहभोगें । कृपेनें स्पर्शिलीं सर्वांगें । अद्यापि तद्योगें सोत्साह ॥९७॥एवं तुझिया तपोराशि । अमोघ अक्षय निश्चयेंशीं । प्रत्यवतारीं हरिचरणांसी । तूं भोगिसी सौभाग्यें ॥९८॥आम्ही अल्पका मंदभाग्या । चरणस्पर्शासि अयोग्या । सप्रेम श्रीकृष्णासी भोग्या । मां कैसेनि अभाग्या हों शकों ॥९९॥म्हणोनि सुभगे धरादेवी । सांगोनि श्रीकृष्णाची पदवी । निजात्मवल्लभ हरि भेटवीं । स्वसुखीं निववीं संतप्तां ॥१००॥परोपकाराएवढें पुण्य । त्रिजगीं दुसरें नाहीं ज्राण । म्हणोनि श्रीकृष्णाचे चरण । दावूनि उपकार तूं घेईं ॥१॥ऐशा पुसोनि धरणीप्रति । वनीं विरहिणी हरि शोधिती । तंव हरिणींची देखोनि पंक्ति । त्यांतें पुसती तें ऐका ॥२॥ N/A References : N/A Last Updated : May 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP