मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ११ वा| श्लोक ५१ ते ५५ अध्याय ११ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ५५ अध्याय ११ वा - श्लोक ५१ ते ५५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५१ ते ५५ Translation - भाषांतर श्रुत्वा तद्विस्मिता गोपा गोप्यश्चातिप्रियादृताः । प्रेत्यागतमिवौत्सुक्यादैक्षन्त तृषितेक्षणाः ॥५१॥तें ऐकोनि व्रजनिवासी । गोपी गोपाळ विस्मयासी । पावोनि सप्रेम मानसीं । श्रीकृष्णासी लक्षिती ॥२८०॥कोणी मरोनि स्वर्गा गेला । तेथूनि पुढती भेटों आला । जेंवी तो अलभ्य लाभ झाला । तेंवी मानिला उत्साह ॥८१॥तेणें उत्साहें नरनारी । कृष्ण प्राशूनि नेत्रद्वारीम । नेऊनियां अभ्य़ंतरीं । मूर्ति गोजिरी कवळिती ॥८२॥ऐसें अंतरीं भोगूनि सुख । नेत्र उघडूनि पाहती सन्मुख । देखोनि श्रीकृष्णाचें मुख । सबाह्य हरिख कोंदाटे ॥८३॥अहो बतास्य बालस्य बहवो मृत्यवोऽभवन् । अप्यासीद्विप्रियं तेषां कृतं पूर्वं यतो भयम् ॥५२॥परमाश्चर्य मानिती गौळीं । केवढी भाग्याची नव्हाळी । जैंहूनि कृष्ण जन्मला कुळीं । दशा गोकुळीं तैंहूनि ॥८४॥अखिलब्रह्मांडगर्भीचें भाग्य । तें वैभव गोकुळा योग्य । होती दुर्घट विघ्नयोग । तें अभाग्य आमुचें ॥२८५॥कृष्णप्राप्तिपरमानंद । विघ्नप्रसंगें वाटे खेद । हृदयीं कवळूनि मुकुंद । करिती अनुवाद बल्लव ॥८६॥केवढें आश्चर्य पहा हो नयनीं । अपमृत्यूच्या अनेकश्रेणि । याचि बालकृष्णाचे हननीं । गेल्या होऊनि अघटित ॥८७॥परी ते विघ्नासीच विघ्न आलें । मृत्यु मरण पावोनि गेले । त्यांचें त्यांसचि कपट फळलें । केलें पावले पूर्वील ॥८८॥तिहीं पूर्वीं पीडिले प्राणी । तें फळ पावले परतोनी । ज्यांची त्यांस दुष्टकरणी । लागे फिरोनि भोगावी ॥८९॥निजमुखाची अळंकरणें । पुढें प्रकटीजती दर्पणें । तैसें परासि करितां पुरें उणें । उसणें देणें तें लागे ॥२९०॥तैसें पूतनादि बकपर्यंत । कृष्णासि करूं आले घात । ते ते पावले फिरोनि अंत । कृष्ण निवांत हरि रक्षी ॥९१॥अथाप्यभिभवन्त्येनं नैव ते घोरदर्शनाः । जिघांसयैनमासाद्य नश्यंत्यग्नौ पतंगवत् ॥५३॥पूर्वीं झालें तें असो परतें । अद्यापिही जे कृष्णातें । अनिष्ट करूं म्हणती चित्तें । तें तें यातें न बाधी ॥९२॥प्रवर्तोनि कृष्णघाता । नाना उपायें आकळूं जातां । दीपीं पतंगाचिया चळथा । तेंवी ते आतां पावती ॥९३॥अहो ब्रह्मविदां वाचो नाऽसत्याः सन्ति कर्हिचित् । गर्गो यदाह भगवानन्वभावि तथैव तत् ॥५४॥नंदप्रमुख आश्चर्यें म्हणती । ब्रह्मवेत्ते जे ब्रह्ममूर्ति । त्यांच्या वाणी मिथ्या होती । हें कल्पांतीं घडेना ॥९४॥वेदवेत्ता गर्गमुनि । त्याची ऐशी भविष्यवाणी । म्हणे नारायणसमो गुणी । चक्रपाणि तव सुत हा ॥२९५॥पुढें पुढें कळेल तुज । ऐसें रहस्य वदला बीज । त्याचा प्रत्यय येतो मज । अघटित चोज देखोनि ॥९६॥जैसा जैसा वदला मुनि । तैसें देखोनि नयनीं । तस्मात् सत्पुरुषाची वाणी । मिथ्या कोणी न म्हणावी ॥९७॥इति नंदावयोगोपाः कृष्णरामकथां मुदा । कुर्वन्तो रममाणाश्च नाविंदन् । भववेदनाम् ॥५५॥ऐसें नंदादि बल्लवगण । रामकृष्णाचें गुणकीर्तन । परमानंदें सुखावोन । करितां भवभान विसरले ॥९८॥अज्ञानें पशूंचीं लेंकुरें । ठकितां दंभें वत्सासुरें । झुगारिला तो जगदीश्वरें । विवेकनिकरें भवंडोनी ॥९९॥असो अज्ञानियां माजील दंभ । त्याचा कृष्णें छेदिला कोंभ । परी ज्ञानियांमाजी जो स्वयंभ । बकसन्निभ मावकर ॥३००॥मौननिष्ठा मुनिवृत्ति । भस्मोद्धूलनें श्वेतकांति । आमिष लक्षी चित्तवृत्ति । ध्यानस्थिति बहिरंग ॥१॥तेणें ग्रासितां गोपाळ । कंठीं प्रज्वळला वडवानळ । मग उगळोनियां तत्काळ । चंचुविशाळ टोंचीत ॥२॥तंव अधोर्ध चंचु दोहीं करीं । धरूनि बकातें कृष्ण चिरी । शकलें पडतां क्षितिवरी । केली निर्जरीं पुण्यवृष्टि ॥३॥जो मुनिवेषधारी दंभबक । ज्ञानियांमाजी कपटी ठक । तों न्रिदळितां मायिक । पारमार्थिक हरिखले ॥४॥इतुकेनि संपला एकादश । ऐकोनि परीक्षिति पावला तोष । हें जाणोनि व्यसऔरस । हर्षें द्वादश आरंभी ॥३०५॥द्वादशामाजी निरूपण । कोहोअघासुराचें मर्दन । करूनि आरी जनार्दन । जो विरोधभजनें फळदाता ॥६॥बकाचे कंठीं प्रवेशोन । स्वयें निघालों बक मर्दून । हें आश्चर्य मानूनि गौण । श्रीभगवान विचारी ॥७॥गडियांसहित अघाउदरीं । प्रवेशोनि अघासुर मारी । गडि घेऊनि ये बाहेरीं । द्वादशामाझारीं हे कथा ॥८॥तें हें श्रीमद्भागवत । महापुराण श्रीकृष्णचरित्र । दशमस्कंधींचा वृत्तांत । शुक सांगत नृपातें ॥९॥एकनाथवंशमाळे । रत्नापरीस रत्न आगळें । भानुप्रभेचीं सोज्वळें । अतिनिर्मळें प्रकाशती ॥३१०॥तत्पदपदकमंडित ग्रीवा । भूषण मिरवे दयार्णवा । गोविंदकुप्रेचा सांठोबा । ग्रंथ आघवा रसरत्न ॥११॥नवरसरसरत्नाचें सार । भक्तिप्रेम मनोहर । श्रवणें पडणें सालंकार । वरदोद्गार जग करी ॥१२॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां द्शमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां वृंदावनक्रीडायां वत्सासुरबकासुरवधो नामैकादशोऽध्यायः ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥५६॥ टीका ओंव्या ॥३१२॥ एवं संख्या ॥३६८॥ अकरावा अध्याय मिळून ओवीसंख्या ॥६३०६॥अकरावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP