मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ११ वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ११ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ५५ अध्याय ११ वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर पश्य पश्य वयस्यांस्ते मातृमृष्टान्स्वलंकृतान् । त्वं च स्नातः कृताहारो विहरस्व स्वलंकृतः ॥११॥पाहें पाहें हे सांगाती । मातृवचना सरिसे येती । स्नानें करूनि अतिप्रीति । पावले तृप्ति जेवूनि ॥६॥त्यांतें देखोनि तूंही हरि । स्नान करोनि भोजन सारीं । शुचिष्मंत सालंकारीं । क्रीडा करीं स्वइच्छा ॥७॥जेणें विधीसि केला बोध । त्यासि यशोदा बुद्धिवाद । स्नेहें शिकवी एवंविध । दावी क्रोध नायकतां ॥८॥निर्मळासि उद्वर्तन । नित्यतृप्तासि भोजन । स्वप्रकाशा अलंकरण । रत्नसुवर्णभूषणीं ॥९॥विशुद्धासि शुचिष्मंत । निर्विकारा क्रीडवित । काळातीतासि झडपीत भूत । म्हणोनि करित रक्षादि ॥११०॥असो हा भक्तिप्रेमभाव । देखोनि लाजिले ब्रह्मादि देव । दावी भक्तीचें लाघव । तें अपूर्व परियेसा ॥११॥क्रीडेमाजी गुंतले सुत । पाचारितां न येती त्वरित । मग यशोदेतें प्रेरित । स्नेहाळ बहुत रोहिणी ॥१२॥नोपेयातां यदाहूतौ क्रीडासंगेन पुत्रकौ । यशोदां प्रेषयामास रोहिणी पुत्रवत्सला ॥१२॥अवो यशोदे चातुर्यखाणी । रामेसहित चक्रपाणि । सवेग हस्तीं धरूनि आणीं । तापले उष्णीं क्रीडतां ॥१३॥क्रीडंतं सा सुतं बालैरतिवेलं सहाग्रजम् । यशोदाऽजोहवीत्कृष्णं पुत्रस्नेहस्नुतस्तनी ॥१३॥ऐकोनि रोहिणीचें वचन । यशोदा मोहें कळवळून । पुत्रस्नेहें दोन्ही स्तन । पान्हा दाटोन पाझरती ॥१४॥चकोरनेत्रांच्या नीहारें । जेंवि चंद्रामृत पाझरे । नानासमुद्रीं भरतें भरे । सुधाकरें उदैजतां ॥११५॥तैशी ते पुत्रवत्सला । पुत्रमोहें उताविळा । बलभद्रेंशीं मेघनीळा । तये वेळां आळवी ॥१६॥बाळकेंशीं खेळतां खेळ । खेळीं गुंतला वाढवेळ । तयातं यशोदा वेल्हाळ । परम कृपाळ आळवी ॥१७॥कृष्ण कृष्णारविंदाक्ष तात एहि स्तनं पिब । अलं विहारैः क्षुत्क्षांतः क्रीडाश्रांतोऽसि पुत्रक ॥१४॥अरे कृष्णा कमलनयना । येईं बापा जगज्जीवना । विश्वीं डोळस तूं देखणा । ये स्तनमान करावया ॥१८॥खेळतां बहुसाळ श्रमलासी । पुरे खेळणें श्रीहृषीकेशी । क्षुधाक्रांत कोमाइलासी । स्तनपानासी स्वीकारीं ॥१९॥हे रामागच्छ ताताऽऽशु सानुजः कुलनंदन । प्रातरेव कृताहारस्तद्भवोन्भोक्तुमर्हति ॥१५॥अरे बापा संकर्षणा । तुझा धाकुटा बंधु कान्हा । सवें घेऊणि मनमोहना । येई पवनासारिखा ॥१२०॥सकळ गोकुळा आनंदन । म्हणोनि म्हणिजे कुलनंदन । विश्वानंद अभिवर्धन । ये जनार्दनासमवेत ॥२१॥अल्प जेवूनि प्रातःकाळीं । वाढवेळ गुंतलां खेळीं आला मध्यान्हीं अंशुमाळी । क्षुधा लागली बहुसाल ॥२२॥भोजना योग्य समय झाला । आतां सत्वर सदना चला । म्हणोनि यशोदा कुमारांला । नानापरी आळवी ॥२३॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP