मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ११ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ११ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ५५ अध्याय ११ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर उलूखलं विकर्षंतं दाम्ना बद्धं स्वमात्मजम् । विलोक्य नंदः प्रहसद्वदनो विमुमोच ह ॥६॥भगवन्मायेचा नवलावो । तेणें नंदासि उपजला मोहो । कृष्णप्रेमें वाढला स्नेहो । करी लवलाहो मोक्षणीं ॥६५॥दांवें न बांधिलें माजाडी । इतस्ततः तें उखळ ओढी । ऐसें देखोनि अति तांतडीं । नंद सोडी कुमारातें ॥६६॥हास्य करूनियां नंद । दांवें सोडूनियां गोविंद । हृदयीं कवळी परमानंद । आनंदकंद जगदात्मा ॥६७॥तंव तो वितर्क करी हरि । झणें नंदाचिये अंतरीं । कळल्या गोष्टी नव्हे बरी । मग बाळका परी नट दावी ॥६८॥सजल करूनि नेत्रवाट । धांपा दाटलेंसें पोट । सद्गदित झाला कंठ । काढी ओष्ठ रुदनार्थ ॥६९॥कांपे दचकोनि थरथरां । झणें बैसेल भेदरा । म्हणोनि गोपिका सुंदरा । दामोदरा बुझाविती ॥७०॥गोपीभिः स्तोभितोऽनृत्यद्भगवान्बालवत्क्कचित् । उद्गायति क्कचिन्मुग्धस्तद्वशो दारुयंत्रवत् ॥७॥कळवळूनि गोपी सकळी । तिहीं घेऊनि वनमाळी । हस्तीं वाहविती टाळी गल्लयुगळीं स्पर्शती ॥७१॥हनुवटी धरूनि हालविती । बोबड्या शब्दें आळविती । कृष्ण म्हणवोनि खेळविती । संतोषविती उत्साहें ॥७२॥दोहीं स्वहस्तीं दोहीं करां । करूनि बल्लवी सुंदरा । नाचविती कमलावरा । नाचे श्रीधर तदाज्ञा ॥७३॥ज्याच्या यशाची धवलिमा । ब्रह्मांडगर्भित व्योमा । जो परणूनि पादपद्मा । स्थापी पद्मा सेवावया ॥७४॥जाणोनि सर्वांचें जीवन । अभीष्ट ओपी वैभवदान । विश्वश्रियेसी उदासीन । विरक्त पूर्ण विवर्तीं ॥७५॥सर्वनियंता सर्वात्मक । मायाचक्राचा चाळक । स्वयें होऊनि तो बाळक । करी कौतुक गोपाज्ञा ॥७६॥ऐसा षड्गुणैश्वर्यराशि । क्रीडे क्रीडती बाळकें जैशीं । गोपी रंजविती विशेषीं । झाडावयासि भेदरा ॥७७॥गायन करविती उच्चस्वरीं । तैसाचि गाय मुग्धापरी । पुतळी जेंवि सूत्रधारीं । तेंवि मुरारि तद्वश ॥७८॥स्वाधीन जैसें दारुयंत्र । तैसा श्रीकृष्ण भक्ततंत्र । ये अवतारीं हें चरित्र । दावी विचित्र जगदात्मा ॥७९॥कोठें गावविती गौळणी । गाय तैसाचि चक्रपाणि । कोठें नाचविती करीं धरूनी । नाचे लेवूनि बालत्व ॥८०॥कोठें कोठें कोणी कोणी । जैसें जैसें भाविती मनीं । तेसतैसा आविष्करूनी । ते ते क्षणीं अनुकरे ॥८१॥लेवूनि बाळकाची आवगणी । करी तैशीच संपादणी । ते या श्लोकीं शुक वर्णी । ऐकें कर्णीं कुरुवर्या ॥८२॥बिभर्ति क्कचिदाज्ञसः पीठकोन्मानपादुकम् । बाहुक्षेपं च कुरुते स्वानां च प्रीतिमावहन् ॥८॥कोठें स्वकीय आज्ञा करिती । त्यांची वाढवितां होय प्रीति । वर्ते आज्ञा धरूनि चित्तीं । ते व्युत्पत्ति अवधारा ॥८३॥कृष्णा पैल तें आणीं पिढें । म्हणतां दुडदुडां धांवे पुढें । उचलूं जाता बदबदां पडे । दावी गाढें बळ तेव्हां ॥८४॥कण्हे कुंथे बळें उचली । चांचरी जात चाले पाउलीं । बाळनाट्यें घालूनि भुली । सर्व गोंविलीं प्रीतीनें ॥८५॥धान्यादि मापें जैं आणविती । तैं पादत्राणें धरी हातीं । जैशीं बाळकें नेणती । तैसा श्रीपति चांवके ॥८६॥नानापरी हालवी कर । करी करविती ते अनुकार । बिंबानुरूप प्रकटी मुकुर । जेंवि विकार प्रतिबिंबीं ॥८७॥आणविती तें धांवे आणूं । बाळा ऐसा होय नेणूं । निज ऐश्वर्या बल्लव गुण । नव्हे जाण ते करी ॥८८॥ज्या चैतन्यें अखिल चळे । त्यासि पीठादि पदार्थ नुचले । ऐसें दावूनि बाललीळे । स्वेच्छा खेळे जगदात्मा ॥८९॥करावया साधुसंरक्षण । भूभार दुष्टसंहरण । आणि धर्माचें संस्थापन । इतुकें कारण अवतारा ॥९०॥एथ प्राकृता शिशुपरी । निजैश्वर्य लोपूनि हरि । कोणा कारणास्तव विस्तारी । लीला हे जरी म्हणसील ॥९१॥दर्शयंस्तद्विदां लोक आत्मनो भृत्यवश्यताम् । व्रजस्योवाह वै हर्षं भगवान्बालचेष्टितैः ॥९॥तरी ऐकें गा कुरुपालका । जो नियंता अखिल लोकां । तो मी भक्ताधीन देखा । ब्रह्मादिकां हें प्रकटी ॥९२॥अचिंत्य ऐश्वर्य जाणते । शिवब्रह्मादि कर्ते हर्ते । जे म्हणविती मायानियंते । कौतुक त्यांतें दाखवी ॥९३॥यया मृत्युलोकांच्या ठायीं । भक्ताधीन मी शेषशायी । हें दाखवी नंदालयीं । क्रीडानवाई प्रकटूनी ॥९४॥आपण होऊनि भक्ताधीन । भक्तांसि करी धन्य मान्य । ब्रह्मादि जे पदाभिमान्य । करी सामान्य तद्योगें ॥९५॥ब्रह्मादि वैभवां वरिष्ठां - । पासूनि वरिष्ठ बाल्यचेष्टा । दावूनि व्रजींच्या हरी कष्टा । तुष्टि अभीष्टा वाढवी ॥९६॥कोणी एथ करिती शंका । भगवन्महिमा सनकादिकां । असे साकल्यें ठाउका । तेचि देखा तद्विद ॥९७॥तरी सनकादि आत्मनिष्ठ । स्वात्मावबोधभजनें तुष्ट । तारतम्यें पद निर्दिष्ट । भेदविशिष्ट नेणती ॥९८॥ब्रह्मादि जे जे पदाभिमानी । तारतम्यभेदज्ञानी । भगवदैश्वर्यही कळोनी । अभेदभजनीं वंचले ॥९९॥यांचा गळावया अभिमान । ये अवतारीं भक्ताधीन । होऊनि भक्तीचें महिमान । दावी पूर्ण क्रीडोनी ॥१००॥असो ब्रह्मादिकांची कथा । शुक म्हणे गा जगतीनाथा । ऐकें गोकुळींचिये वृत्तांता । सावध चित्ता करूनी ॥१॥सरित्तीरगतं कृष्णं भग्नार्जुनमथाह्वयत् । जन्मर्क्षमद्य भवतो विप्रेभ्यो देहि गाः शुचिः ॥१०॥उखळीं बांधोनि निजनंदन । यशोदा संपादी गृहविधान । तंव येरीकडे यमलार्जुन । केले भग्न श्रीकृष्णें ॥२॥नंद देखोनि दामोदरा । कळवळोनि सोडी त्वरा । त्यासि रंजवूनि गोपी चतुरा । भयभेदरा विसरविला ॥३॥सवेंचि बाळकांचिये मेळीं । क्रीडतां यमुनेचिये वाळीं । तंव ते यशोदा वेल्हाळी । स्नेहें वनमाळी पाचारी ॥४॥आजि तुझें जन्मर्क्ष जाण । वेगें करूनि मंगल स्नान । ब्राह्मणाकारणें धेनुदान । देईं होऊनि शुचिष्मंत ॥१०५॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP