मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ११ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ११ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ५५ अध्याय ११ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर प्रतीक्षते त्वां दाशार्ह भोक्ष्यमाणो व्रजाधिपः । एह्यावयोः प्रियं धेहि स्वगृहान् यात बालकाः ॥१६॥अरे वृष्णिकुळमंडना । वेगीं येईं संकर्षणा । नंद बैसला भोजना । घेऊनि कृष्णा ये वेगीं ॥२४॥प्रतीक्षा करीतसे व्रजपति । कृष्णेंसहित जेवा पंक्ती । जननीजनकाचिये आर्ति । अतिप्रीति पुरविजे ॥१२५॥खेळतां झाला मध्याह्नकाळ । भुकेला संवगड्यांचा मेळ । आपुलालिया गृहा सकळ । बल्लवबाळ जाऊं दे ॥२६॥श्रीशुक उवाच - इत्थं यशोदा तमशेषशेखरं मत्वा सुतं स्नेहनिबद्धधीर्नृप । हस्तें गृहीत्वा सहराममच्युतं नीत्वा स्ववाटं कृतवत्यथोदयम् ॥१७॥ऐशी रोहिणीवाक्यावरून । यशोदाजननी स्नेहाळ पूर्ण । पाचारितां रामकृष्ण । खेळ सांडून न येती ॥२७॥मग ते यशोदा जननी सकृप । सवेग जाऊनियां समीप । हस्तीं धरिला कंदर्पबाप । जो चिद्रूप जगदात्मा ॥२८॥भक्तिप्रेमाच्या बालभें । कुड्मलीकरूनि चैतन्यप्रभे । शिशुत्वनाट्य नतला लोभें । त्या त्या क्षोभें उल्हासे ॥२९॥निर्जरमणीचा मुकुटमणि । जो त्याचिये हृदयभुवनीं । नांदे म्हणोनि चिंतवणी । करी निर्वाणीं जयाची ॥१३०॥तो हा अच्युत नंदनारी । पुत्र भावूनि धरिला करीं । सुतस्नेहाची ममता भारी । नेणें सुंदरी हरिमाया ॥३१॥पुत्रस्नेहें जडली बुद्धि । तेचि सहजें सुखसमाधि । शुकाचार्य जो विवेकनिधि । तो प्रबोधी कुरुपाळा ॥३२॥रामेंसहित अचुत हातीं । सवेग यशोदासती । नेऊनि आपुल्या वाडियाप्रति । करी निगुती अभ्युदयों ॥३३॥आणूनि सुवासिनी ब्राह्मण । सर्व बल्लवी बल्लवगण । वेदमंत्रीं नहाविला कृष्ण । स्वस्तिवाचनविधियुक्त ॥३४॥गौरवूनि वस्त्राभरणीं । पूजिल्या ब्राह्मणसुवासिनी । उत्तम अन्नें समर्पूनी । रत्नीं सुवर्णीं तोषविले ॥१३५॥सालंकृतें धेनुदानें । देऊनि घेतलीं आशीर्वचनें । पुरंध्री करिती निरंजनें । निर्जर सुमनें वर्षिती ॥३६॥तया समाजीं बल्लवथाटीं । परस्परें करिती गोठी । उपडोनि पडिलीं झाडें मोठीं । बाळ तळवटीं वांचलें ॥३७॥उदरीं बांधिलेंसे उखळ । पळों न शके केवळ बाळ । भोंवता लेंकुरांचा मेळ । झाडें विशाळ उन्मळलीं ॥३८॥ब्राह्मणांचे आशेर्वाद । तेणें रक्षिला गोविंद । म्हणती दैवाथिला नंद । लोकापवाद चूकला ॥३९॥आपुलें बाळ आपुल्या हातें । बांधोनि काळा ओपिलें होतें । एवढें निमित्त श्रीअनंतें । कृपावंतें चुकविलें ॥१४०॥पुत्रनाशासारिखी हानि । आणी उघड रडों नल्हातां जनीं । दैवें पावली निर्वाणीं । कुळस्वामिनी जगदंवा ॥४१॥सप्रेमक्रीडेच्या उद्देशें । वृंदावना जावया हर्षें । अंतर्यामीं कृष्णपरेशें । गोप उल्हासें प्रेरिले ॥४२॥गोपवृद्धा महोत्पाताननुभूय बृहद्वने । नंदादयः समागम्य व्रजकार्यममंत्रयन् ॥१८॥तो नेणोनि हरिसंकल्प । समस्त मिळोनि वृद्ध गोप । उत्पातभयाचे विकल्प । करिती जल्प अनुभविले ॥४३॥गोकुळीं झले महोत्पात । ते अनुभवूनि समस्त । पुढें व्रजाच्या कल्याणार्थ । कर्तव्यार्थ विचारिती ॥४४॥नंदप्रमुख गोपवृद्ध । जे गौळियांमाजि प्रसिद्ध । समस्त मिळोनि एवंविध । बुद्धिवाद विवरिती ॥१४५॥तत्रोपनंदनामाऽऽ ह गोपो ज्ञानवयोऽधिकः । देशकालाऽर्थतत्त्वज्ञः । प्रियकृदामकृष्णयोः ॥१९॥ऐसा विचार करितां सकळीं । त्यांमाजीं उपनंदनामा गौळी । वयोवृद्ध बुद्धि आगळी । जो हृतकमळीं स्नेहाळ ॥४६॥देशकालार्थतत्त्वज्ञ । आणि रामकृष्णांचें कल्याण । करूं इच्छितां स्नेहाळ पूर्ण । जो विचक्षण सर्वार्थीं ॥४७॥पर्जन्यकाळीं निर्मळ देश । आश्रयूनि पाविजे तोष । कीं अग्निभयाचा न बाधी लेश । निरिंधन स्थानास वसवितां ॥४८॥तेंवि महोत्पात कां महामारी । काळक्षोभाचिये अवसरीं । स्थान त्यागूनि स्थलांतरीं । सहपरिवारीं नांदावें ॥४९॥उत्थातव्यमितोऽस्माभिर्गोकुलस्य हितैषिभिः । आयांत्यत्र महोत्पाता बालानां नाशहेतवः ॥२०॥गोकुळाचा कल्याणार्थ । करूं इच्छिते आम्ही समस्त । तिहीं एथूनि आजि त्वरित । परिवारयुक्त उठावें ॥१५०॥एथ बाळांचीं नाशकरणें । येती उत्पात महाविघ्नें । आजिपर्यंत नारायणें । महादारुणें वारिलीं ॥५१॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP