मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ११ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ११ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ५५ अध्याय ११ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - गोपा नंदादयः श्रुत्वा द्रुमयोः पततो रवम् ।तत्राऽऽजग्मुः कुरुश्रेष्ठ निर्घातभयशंकिताः ॥१॥शुक म्हणे गा कुरुनायका । गोकुळवासियां नंदप्रमुखां । द्रुमपतनाचा ऐकोनि खडका । झाली शंका मानसीं ॥४७॥विद्युत्पात मानूनि सर व। बल्लवबल्लवीसमुदाव । मिळाले धरूनि म्हणती भेव । महा अभिनव वर्तलें ॥४८॥भूम्यां निपतितौ तत्र ददृशुर्यमलार्जुनौ । बभ्रमस्तदविज्ञाय लक्ष्यं पतनकारणम् ॥२॥भूमीं पडले उन्मळून । देखती ते यमलार्जुन । त्यांच्या पतनाचें कारण । प्रत्यक्ष असोन नेणती ॥४९॥बद्ध उलूखल - दामोदर । येणें उन्मळले तरुवर । प्रकट लक्षूनि ते समग्र । करिती विचार पतनाचा ॥५०॥नेणोनि त्याची अचिंत्य शक्ति । तेथ बल्लव भ्रम पावती । उखळेंसहित कृष्णमूर्ति । देखोनि करिती वितर्क ॥५१॥उलूखलं विकर्षंतं दाम्ना बद्धं च बालकम् । कस्येदं कुत आश्चर्यमुत्पात इति कातराः ॥३॥भ्रांतिवितर्कप्रकारु । म्हणती राक्षसें उपटिले तरु । हें राक्षसी कर्म घोरु । इतर करूं न शकता ॥५२॥उखळ दांवें बांधिलें पोटीं । मृणालकोमळ अंगयष्टि । बाळक खेळतां तळवटीं । वृक्ष उत्पाटी हे कवण ॥५३॥उखळ ओढितां वासुदेव । अर्जुनातळवटीं हें अभिनव । झालें कोण्या कारणास्तव । उत्पातभेव मानिती ॥५४॥बाला ऊचुरनेनेति तिर्यग्गतमुलूखलम् । विकर्षता मध्यगेन पुरुषावप्यचक्ष्महि ॥४॥तंव तीं बाळें धाकुटीं । बोबड्या बोलीं सांगती गोष्टी । म्हणती आम्हीं देखिलें दृष्टीं । यथार्थ पोटीं मानावें ॥५५॥उखळ ओढीत जनार्दन । गेला तरुवरांमधून । आडवें उखळ पडतां कृष्ण । बळें कर्षण करितां तें ॥५६॥उभय कोटी दोहींकडे । यमलार्जुनीं तें उखळ अडे । बळें ओढितां कडाडें । दोन्ही झाडें उपटलीं ॥५७॥झाडें पडतांचि भूमीशीं । सूर्या ऐसे तेजोराशि । द्रुमार्जुनीं निघाल्या पुरुषीं । श्रीकृष्णासी वंदिले ॥५८॥हात जोडूनि उभे ठेले । कांहींबांहीं बहु बोलिले । फिरोनि कृष्णाभोंवताले । नमूनि गेले नभःपथें ॥५९॥आम्हीं प्रत्यक्ष हें देखिलें । म्हणोनि बाळकीं सांगितलें । तार्किकीं सत्यत्वें न मानिलें । इतरीं मानिलें संशयें ॥६०॥न ते तदुक्तं जगृहुर्न घटेतेति तस्य तत् । बालस्योत्पाटनं तर्वोः केचित्संदिग्धचेतसः ॥५॥केवळ बाळक रिंगमाण । याचेनि द्रुमांचें उन्मूलन । हें तो केवळ अघटमान । बालभाषण अलीक ॥६१॥एक म्हणती पूर्वीं येणें । गाडा मोडिला पदचालनें बाळें कथितां यथार्थ नमनें । परी हें करणें याचेंची ॥६२॥यशोदा धर्षितां मृद्भक्षणीं । विश्व दाविलें मुख पसरूनि । ऐशी याची अतर्क्य करणी । मिथ्या कैसेनि म्हणावी ॥६३॥होय न होय हा अनुवाद । अवघेचि संशयें संदिग्ध । भ्रांत झाले विबुधाबुध । करिती विविध वितर्क ॥६४॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP