मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ११ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ११ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ५५ अध्याय ११ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर तत्तत्राद्यैव यास्यामः शकटान्युंक्त मा चिरम् । गोधनान्यग्रतो यांतु भवतां यदि रोचते ॥२६॥ऐसें सुखकर वृंदावन । एथ उत्पातभय दारुण । यास्तव तेथ आजिच गमन । शकट जुंपून करूं चला ॥६७॥विचारणा जे केली बरवी । मान्य कीजेल तुम्हीं सर्वीं । तरी गोधनें पुढें न्यावीं । त्वरा करावी समस्तीं ॥६८॥तच्छ्रुत्वैकधियो गोपाः साधु साध्वितिवादिनः । व्रजान्स्वान्स्वान्समायुज्य ययू रूढपरिच्छदाः ॥३७॥ऐकोनि तें उपनंदनवचन । एकचित्त बल्लवगण । सर्वीं संतोषें केलें मान्य । साधु म्हणोन गौरविला ॥६९॥मग गोकुळवासिये सकळ । जावया लागीं उतावीळ । सिद्ध झाले पैं सकळ । शकटीं बैल जुंपूनी ॥१७०॥गृहसमृद्धि सर्वोपकरणें । दांवीं दावनी पशुबंधनें । वत्सें बालकें धनें वसनें । घेऊनि प्रयाण आदरिती ॥७१॥वृद्धान्बालांस्त्रियोः राजन्सर्वोपकरणानि च । अनस्स्वरोप्य गोपाला यत्ता आत्तशरासनाः ॥२८॥शुक म्हणे गा कुरुभूषणा । गोप घेऊनि धनुष्यबाणा । पृष्ठीं तूण खङ्गें नाना । कटिप्रदेशीं बांधिलीं ॥७२॥वृद्धें बाळें आणि स्त्रिया । अनेक सदनसामग्रिया । सर्वीं शकटीं भरूनियां झाले जावया सन्नद्ध ॥७३॥गोधनानि पुरस्कृत्य शृंगाण्यापूर्य सर्वतः । तूर्यघोषेण महता ययुः सहपुरोहिताः ॥२९॥पुढें करूनि गोधनथाट । मागें चालती मंद शकट । महावाद्यांचा बोभाट । बिरुद भाट वानिती ॥७४॥श्रृंगें वाजती नानापरी । घन कांसोळ वंश मोहरी । पुरोहितेंशीं उत्साहगजरीं । गोपाळभारीं चालती ॥१७५॥गोप्या रूढरथा नूत्नकुचकुंकुमकांतयः । कृष्णलीला जगुः प्रीता निष्ककंठ्यः सुवाससः ॥३०॥नूतन कुचकलशांच्या व्यक्ति । वरी चर्चित कुंकुमकिंजल्ककांति । सालंकृता विराजती । गोपयुवती रथस्था ॥७६॥महामूल्यें ग्रैवेंयकें । परिधानें अमूल्य अंशुकें । कृष्णलीला गाती मुखें । प्रेमोत्कृष्टें संतुष्टा ॥७७॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP