मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ११ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ११ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ५५ अध्याय ११ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर क्कचिद्वादयतो वेणुं क्षेपणैः क्षिपतः क्कचित् । क्कचित्पादैः किंकिणीभिः क्कचित्कृत्रिमगोवृषैः ॥३६॥वृषायमाणौ नर्दंतौ युयुधाते परस्परम् । अनुकृत्य रुतैर्जंतूंश्चेरतुः प्राकृतौ यथा ॥३७॥कोठें पाहूनि रम्य स्थळ । रामकृष्णादि गोपाळ । तन्मय करिती प्राणी सकळ । वेणू रसाळ वाजवूनि ॥१७॥कोठें धात्र्यादि नाना फळें । चपळ झेलिती करतळें । मिथ्या दावूनि बाललीले । लक्षूनि स्थळें क्षेपिती ॥१८॥कोठें हावभाव विक्षेपगति । पदविन्यासें नृत्य करिती । किंकिणीनादें अभिरंजिती । विराजती नटनाट्यें ॥१९॥वांकी नूपुरें क्षुद्रघंटा । वेणू लावूनि ओष्ठपुटा । नृत्यगीतवाद्यचेष्टा । करिती मोठा उत्साह ॥२२०॥दोनी दोनी एकत्र गडी । पांघरोनि एकेक घोंगडी । पुच्छें मुखें श्रृंगें जोडी । नटती आवडी गोरूपें ॥२१॥त्यामाजीं रामकृष्ण हे गोर्हे । गर्जती अपेट वृषभाकारें । काममोहित परस्परें । त्या अनुकारें झुंजती ॥२२॥पारावता ऐसे घुमती । कोकिळेहूनि मंजुळ गाती । भृंगा ऐसे रुंजी करिती । मयूराकृति प्लुतशब्द ॥२३॥करी केसरी धेनु व्याघ्र । कपि जंबुक मृग सूकर । सर्व जंतूंचे अनुकार । क्रीडा विचित्र दाविती ॥२४॥जैसे प्राकृत अज्ञान । बाळ । क्रीडती देखिला तैसा खेळ । तैसे सर्वज्ञ रामगोपाळ । क्रीडारोळे अनुकरती ॥२२५॥तेचि सर्वज्ञतेची थोरी । शुक रायातें कथन करी । माया केली जे आसुरी । ते अंतरीं ज्या कळली ॥२६॥कदाचिद्यमुनातीरे वत्सांश्चारयतोः स्वकैः । वयस्यैः कृष्णबलयोर्जिघांसुर्दैत्य आगमत् ॥३८॥कोणे एके समयांतरीं । आपुलाले वत्सभारीं । गोपाळेंशीं राम मुरारि । यमुनातीरीं पातले ॥२७॥चारीत होत्साते वत्सथाटी । पातले यमुनेचिये कांठीं । मृदुपुलिनें देखोनि दृष्टीं । सुखसंतुष्टीं क्रीडती ॥२८॥तंव गोपाळेंशीं रामकृष्ण । मारावयाची धरूनि तृष्णा । दैत्य पातला यमुनापुलिना । मायानटना नटोनी ॥२९॥तं वत्सरूपिणं वीक्ष्य वत्सयूथगतं हरिः । दर्शयन्बलदेवाय शनैर्मुग्ध इवाऽऽसदत् ॥३९॥वत्सरूप दैत्य नटला । वत्सयूथीं मिळोनि गेला । कृष्णें दावूनि अग्रजाला । समीप गेला नेणवत ॥२३०॥गृहीत्वाऽपरपादाभ्यां सह लांगूलमच्युतः । भ्रामयित्वा कपित्थाग्रे प्राहिणोद्गतजीवितम् ॥ सकपित्थैर्महाकायः पात्यमानैः पपात ह ॥४०॥ज्याचें ऐश्वर्य अच्युत । तो हा श्रीकृष्ण भगवंत । जाऊनि हळूहळू न कळत । पायीं धरीत दैत्यातें ॥३१॥पुच्छासहित मागल्या पायीं । धरूनि उचलिला दोहीं बाहीं । गरगरां भवंडोनि लवलाहीं । कपित्थाग्रीं झुगारिला ॥३२॥भवंडीसरिसे गेले प्राण । कपट गेलें हारपोन । राक्षसदेह विशाळ गहन । पावला पतन कविठेंशीं ॥३३॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP