लोकव्यवहारातील दोन वर्ग
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
( १ ) स्वसंवेद्य, व ( २ ) परतोवेद्य : प्रत्यक्ष लोकव्यवहारात शकुनांचे दोन वर्ग आहेत; त्यांपैकी एकाचा अनुभव स्वत:चे देहातल्या देहात घडणार्या गोष्टींवरून मनुष्य घेतो, अर्थात तो ‘ स्वसंवेद्य ’ आहे; व दुसर्याचा बाहेरल्या भूतसृष्टीत घडणार्या गोष्टींवरून पाहावयाचा असल्याने तो ‘ परतोवेद्य ’ होतो. नेत्रांचे अगर बाहूंचे स्फ़ुरण, मनाला कारणाशिवाय उल्हास वाटणे, हुरहुर लागणे, किंवा उदासीन वृत्ती होणे इत्यादी उदाहरणे पहिल्या वर्गाची होत. दुसर्या वर्गाची उदाहरणे पिंगळ्यांचे शब्द, पालीचे चुकचुकणे, विधवा अगर बोडका पुरुष समोर येणे, इत्यादी नित्याच्या अनुभवांतली अनेक असून, ती साधारण दोन पैसे किंमतीला मिळणार्या पंचांगातसुद्धा छापलेली असतात, यासाठी त्यांबद्दलचा पाल्हाळ येथे करणे नको.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP