मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा| कलंकी अवतार प्रसंग अठरावा प्रशस्ति मनाच्या लीला मन ताब्यांत नाहीं तर दगा निश्र्चित मन जतन केल्यास ब्रह्मप्राप्ती विहंगम मार्ग त्रिकुट ते श्रीहाट कूच गोल्हाट व औटपिठ अर्धमातृका ब्रह्मरंध्रापर्यंत चढाई समाधि समाधीची व्याप्ती समाधि-अवस्था-प्रकार नामस्मरणानुसंधान नामापाशी ईश्र्वर नाममहिमा कर्कोटक कथा कर्कोटक कथा निंदकामुळेंच साधुची मळशुद्धि साधूंस तळमळ यातिवंशाचा संबंध नाहीं वादिक भक्त दुकाळे साधू सोंवळें-ओंवळेपण शुद्ध वैराग्य हरिनाम श्रवण राम कोणता? - श्रावणकथा ईश्र्वर एकच कलियुगधर्म कलंकी अवतार ईश्र्वर निवाडा यमयातना-जीवास दंड सृष्टि-प्रलय ग्रंथसमाप्ति ग्रंथलेखनकाल प्रसंगसमाप्ति प्रसंग अठरावा - कलंकी अवतार श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत कलंकी अवतार Translation - भाषांतर यवन म्हणती कानाधजाल काफर । मर्हाटे म्हणती कलंकी अवतार । तो करील अवघा एकाकार । ईश्र्वर म्हणवील आपणास ॥२६९॥होईल अठरापगड यातींचा राजा । म्हणे माते भजा वोजा । त्यानें अनेक भूषणें वाद्यें वाजती वोजा । परमार्थाचे नांव घेऊं नेदी ॥२७०॥तो सव्वा ताड दीर्घ महा थोर । तो महाकाळ डावा नाहीं नेत्र । समस्त दापील सुरनवीर । सहस्र वरुषें ॥२७१॥तो अवतार जालिया साक्ष परियेसा । रुमी काबीज करील दाही दिशा । मग त्यातें ईश्र्वर करील वळसा । सांगेन परियेसा श्रोतेराज ॥२७२॥शनवाराचा दिवस अवधारा । सायंकाळी सुटेल उत्तरमुखें वारा । तेणें इंद्र चंद्र नव लक्ष तारा । पर्वत प्रलय पावती ॥२७३॥जैसा पिंजू बैसला पिंजारा । उडती रूं लोकरीच्या तारा । तैसा पर्वतांचा होईल विदारा । तीस दिवस पैं ॥२७४॥वारा सुटेल एक मासभर । तेणें मही स्थळीं होईल जर्जर । निशिदिन न कळे धुमधुमकार । महाप्रळयाचें अंतीं ॥२७५॥इश्राफिल फिरस्त्यालागुन । वायु सम करा म्हणती जगजीवन । मग कुलुप करोनि पवनालागुन । इश्राफिल स्थिर राहील ॥२७६॥मग आब जमाचे पाणी । एक मास ईश्र्वर करील द्रवणी । तेणें उत्पत्ति पावेल जीव जनीं । जितुकें गतले तितुके ॥२७७॥मग पर्जन्य राहिल्याउपरी । शीघ्र तांब्याची होईल धरत्री । रवि सन्मुख होईल नेज्या बरोबरी । मनुष्याचें टाळूस नेत्र होती ॥२७८॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP