TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
यातिवंशाचा संबंध नाहीं

प्रसंग अठरावा - यातिवंशाचा संबंध नाहीं

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


साधुत्‍वास उच्चहीन यातिवंशाचा संबंध नाहीं
सैय्यद ब्राह्मण उत्तम वंशीं । कार्य नाहीं याति नांवासी । जवादी जन्मली मांजराचे कुशीं । कैसी हीन कुळी म्‍हणावी ॥१५१॥
सैय्यद ब्राह्मण उत्तम याती । भ्रष्‍ट अनाचारे वर्ततीं । पवित्र परियेसा उत्तम कीर्ती । कवण वाढवी त्‍यांचीं ॥१५२॥
पहा बिबव्यातें दूर धरिती । गोडांब्‍या शुभ्र शेलीं बांधिती । मेवा म्‍हणोनियां भले सेविती । व्रत उपवास फळ आहारीं ॥१५३॥
अवगुण दंडूनियां पूजा । हे तंव परंपरा चालली वोजा । रंकाच संचितगुणें जाला राजा । विश्र्वजन तया वंदिती ॥१५४॥
तैसा निजभक्त भलतिये यातीचा । संचित गुरुत्‍वें जाला ईश्र्वराचा । दोष त्‍याच्या यातिकुळाचा । आठव करूं नये ॥१५५॥
पूर्वीं वेश्या करित होती अनाचार । तियेचा राजानें केला अंगिकार । मासाहेब म्‍हणती वजीर सरदार । वेश्येपण लोपूनिया ॥१५६॥
पृथ्‍वीचे अमंगळ ओहोळा । पहा तीर्थीं गंगा जाली एकवेळा । तैसे साधूच्या याति विटाळा । उरी नाहीं विश्र्व सोंवळें दिसे ॥१५७॥
आळंगिल्‍या चर्मकाची विखणें । नित्‍य लेपाळलीं त्‍या मांसानें । परिस लागतांचि होय सोनें । लोखंड मोलें मागों नये ॥१५८॥
सांगतां साधूचा वृत्तांत । होईल दृष्‍टांताची मात । आतां जनाचें वेगवगत्र । अज्ञान सांगो आरंभिलें ॥१५९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:26.6570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चोपण

  • वि. ( प्रां . ) चिकण ( जमीन , माती ). [ चोपड ] 
  • स्त्रीन . १ ( जमीन इ० ) चोपण्याची , ठोकण्याची क्रिया ( चोपणें पासून नाम ). २ गवंडयाचें जमीन चोपण्याचें लांकडी हत्यार . हें हात दीड हात लांब , वीतभर रुंद व चार पांच बोटें जाड असून , याला हातांत धरण्यासाठीं मागें एक मूठ असतें . ३ लहान मुलांचें रिंगणें ; चोखणी . ४ तेलकट कापड चिकण मातींत भिजवून ठेवणें . [ फा . चोब = काठी ? घ्व . चोप ] 
  • स्त्री. ( व .) राड ; चिखलवट जागा . ' यंदा नवें घेतलेलें वावर चोपणीचें आहे तें पुष्कळ दिवस वाळत नाहीं .' 
  • a  Loamy. 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

श्रीयंत्रातील चक्र आणि त्रिकोण कशाचे प्रतिक आहेत?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.