मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा| साधूंस तळमळ प्रसंग अठरावा प्रशस्ति मनाच्या लीला मन ताब्यांत नाहीं तर दगा निश्र्चित मन जतन केल्यास ब्रह्मप्राप्ती विहंगम मार्ग त्रिकुट ते श्रीहाट कूच गोल्हाट व औटपिठ अर्धमातृका ब्रह्मरंध्रापर्यंत चढाई समाधि समाधीची व्याप्ती समाधि-अवस्था-प्रकार नामस्मरणानुसंधान नामापाशी ईश्र्वर नाममहिमा कर्कोटक कथा कर्कोटक कथा निंदकामुळेंच साधुची मळशुद्धि साधूंस तळमळ यातिवंशाचा संबंध नाहीं वादिक भक्त दुकाळे साधू सोंवळें-ओंवळेपण शुद्ध वैराग्य हरिनाम श्रवण राम कोणता? - श्रावणकथा ईश्र्वर एकच कलियुगधर्म कलंकी अवतार ईश्र्वर निवाडा यमयातना-जीवास दंड सृष्टि-प्रलय ग्रंथसमाप्ति ग्रंथलेखनकाल प्रसंगसमाप्ति प्रसंग अठरावा - साधूंस तळमळ श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत म्हणून निंदकांचे उद्धारार्थ साधूंस तळमळ Translation - भाषांतर धन्य धन्य निंदकांची माउली । साधूंच्या उपयोगा व्याली । जैसी खात्यानें कातर करून दिधली । नापिकाचें हातीं ॥१३७॥जैसी धान्यें निंदिल्या उपरी । पिको न लागती घुमरी । तैसें निंदकांनीं परोपरी । साधूस केलें ॥१३८॥साधु दरुषनें पाप कोडी । दहन होती न लागतां क्षण घडी । साडे अठरा विश्र्वें पाप जोडी । निंदकाचे परियेसा ॥१३९॥जिव्हेसारखी प्रचंड शिळा । निंदक धावधांवोंनि काढिती मळा । निमिष न लागतांचि सोंवळा । साधूनें शुद्ध केलें असे ॥१४०॥श्र्वाना न कळे भला बुरा । तैसा निंदक भुंके सैरावैरा । ते तुज वंचले ईश्र्वरा । पाखांड बुद्धि ॥१४१॥पुण्य साधकाचें मनीं वसे । जे उद्धरावे चांडाळ पिसे । प्रालब्धें विरळा विश्र्वासें । संचित सांचल्या ॥१४२॥निंदकाची वाटे काकुलती । कैसी यमयातना सोशिती । स्वहित अज्ञानें न करिती । सद्गुरुसंगें ॥१४३॥पूर्वीं पाप केलें शिंदळीनें । क्षोभवली बहुतेकांचीं मनें । तरुवर होऊनि दिधलें उसणें । तिस सेविल्या तैसेंच होईल ॥१४४॥तांब्याची पुतळी संवताड । आंतून ज्वाळा निघती धडधड । तिस नेऊनि भेटविती ज्यास वेड । बहु परस्त्रीचें ॥१४५॥अठरा योजनें फेरा । भरला कुंभपाकाचा डेरा । त्यांत बुडवितील केल्या अनाचारा । युगानयुगीं ॥१४६॥तापली तांब्याची मेदिनी । तयेवरी लोळविती परद्वारिणी । करिती अनेक अनेक जाचणी । परियेसा जन हो ॥१४७॥गुदगुद खाजविल्या थोडी थोडी । तैसी ओळखा विषयाची गोडी । नेटानें खाजविल्या चरफडी । अशुद्ध सांडे ॥१४८॥शेख महंमद म्हणे निंदकालागून । तुम्ही आमुचे सखे सज्जन । तुमच्या उपकाराचें भूषण । वर्णिता न ये मज ॥१४९॥सगुण आचरावें असो यातिहीन । जैसी कस्तुरी जन्मली मृगनाभीहून । लल्लाटी चर्चिली टिळा करून । शेख महंमद पवित्रें ॥१५०॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP