TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
हरिनाम श्रवण

प्रसंग अठरावा - हरिनाम श्रवण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


विवेक व प्रेमपूर्ण हरिनाम श्रवण
हरिनाम ऐकतां लागे बोध । ऐसा तुम्‍ही सगुण गावा भेद । तेणें शीघ्र तुटेल अनुवाद । सभे श्रोत्‍यांचा ॥२१४॥
हरिकथेमधीं लालमलाला । तो दीप विषयाचा चढला । हरि जवळ असोनि दुरावला । चंचळ चित्तागुणें ॥२१५॥
शृंगार लाघवें बुरबुरी । तों तों सकळ सभा होय बाबरी । चंचळपणें उन्मत्त अविचारी । दीपांत पतंग जैसा ॥२१६॥
यालागी नीट विवेकाचा भाला । पाहिजे करीं हरिदासें घेतला । भाविक शूर सन्मुख खोंचिला । संत श्रोत्‍यांमाजी ॥२१७॥
गळित कथेसी वोडवला रस । ऐसा हेरून काढिला निस । याहूनि सांगतां उदास । मज शंका वाटे ॥२१८॥
क्षौर करूनि डोळां काजळ । दिसे स्त्रीहूनि देहे ढाळ । तेथें पहातां करिती तळमळ । महा व्यसनीं उन्मत्त ॥२१९॥
बाप पुत्र जांवई पिशुन । सासरा भाचा मेहुणा बंधुजन । नातु चुलता साडु सोयरे सज्‍जन । पापरूपें पाहाती ॥२२०॥
अवघेचि पातले चंचल अनुसंधानीं । मागें सांगितलीं तीं नाती गेली मोडुनी । अवघे काय होत एकमेकांलागुनी । ते ओळखावें श्रोतेजनीं ॥२२१॥
पुरुष स्त्रीरूपें नट्या नटला । पापरूपें सभेनें अभिलाषिला । तों पापाचा संग्रह प्रबळ जाला । मृगजळ जैसा डोहो ॥२२२॥
नट्या देखोनि ईश्र्वरातें ध्यातु । ऐसा विरळा कोणी पुण्यवंतु । येर भूतें जैसे अवगुणाइतु । टकमकां पाहाती ॥२२३॥
जो अखंड ईश्र्वरीं पवित्रपणें । तो ते वेळीं पाहील नामस्‍मरणें । खांद्यावरी शूळ पाहिला तस्‍करानें । तदन्याय त्‍याचा ॥२२४॥
निज कथेमाजी भक्तिज्ञान । प्रेमें हरिनाम संपूर्ण । तेणें निवालें हृदय अंतःकरण । श्रोत्‍यांचे परियेसा ॥२२५॥
प्रेमनामाचा होतसे गजर । भाविक बैसले सुरनर । तेथें उभा परमेश्र्वर । तिष्‍ठत असे ॥२२६॥
हें वचन नव्हें असत्‍य । ग्‍वाही देतील वेदश्रुती । सत्‍य निष्‍कलंक शुद्धमती । आचरण आचरावें ॥२२७॥
एकचित्त बैसावें कथेसी । जैसें लय ध्यान त्‍या बकासी । डळे ढळे तो मच्छांसी । उचलोन घेतो ॥२२८॥
कवडा आकाशीं थरथरी । नदीमाजी दृष्‍टी फेरी । तैसा हृदयीं निज टेरी । शेख महंमद बोधें ॥२२९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:27.0000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कडु

  • पु कड ; बाजू .' दक्षिणे श्रीमुकुटाचा कडु केला .' - ऋ १३५ ; - अमृ २ . ४८ . ( कांहीं प्रतींत ). ( कडे ) 
  • वि. १ . कडवा ( गोडाचे उलट , कडुनिंबाच्या चवीप्रमाणें ). २ बेचव ; पित्तविकारामुळें बदलणारी ( जिभेची रुचि ). ३ न रुचणारें ; अप्रिय ; कठोर ( वाक्य , भाषण इ० ). ' आधीं कडु मग गोड .' ४ ज्यास कीड लागत नाही , जें कीड खात नाहीं असें ( विशिष्ट झाड , वनस्पति ). ५ जारज संतति ( गोडच्या उलट ). ६ गोड नसणारें ; अशुदेध ( विशिष्ट तेल ). ७ कठिण , गांठ्यांळ ( बाभळीच्या लांकडाचा आंतील भाग ; नार ; वरचा भाग ठिसूळ , नरम किंवा गोड असतो ). ८ निर्दय ; कडक ; ताठर ( माणुस , स्वभाव ). ९ नापीक ; लागवदीला प्रतिकूल ( जमीन ). १० झोंबणारी ; कडक तिखट ( विशिष्ट भाजी ). - न . १ ( ल .) अफू . २ कात ( रात्रीच्या वेळेस काताचें नांव घ्यावयाचें नाहीं म्हणुन त्याबद्दल म्हणतात ) ३ मृताशोंच . कडु विटाळ या शब्दाचा संक्षेप . - स्त्री . डोळ्यांचें दुखणें ( डोळ्यांत माती गेल्यानें , जाग्रण केल्यानें येणारें ). ( क्रि येणे , उ० डोळ्यांला कडु येणें ). - पु . १ दासीपासून झालेली संतति ; अनौरस जारस सतति ; लेकवळा ( याच्या उलट गोड .) ' त्याच्या राज्यांत मल्हारराव नामक त्याच्या एका कडु सापत्‍न भावानें जें बंड माजविलें होतें ...' - हिंक ८४ . २ पाटाची संतति ( सं . कटु ; प्रा . कडु ; गु . कुडवु ; हिं कडुवा ; सिं कडो ) 
  • ०इंद्रायण न. कुंपणावारील एक वेल ; ह्याची फळें तांबडीं , विषारी व रुचीस कडू असतात ; कवंडळ ; इंद्रावण ; इंद्रवारुण ; कडूवृदांवन २ ( ल .) तुसडा . माणुघाण्या ; एकलकोंडा माणुस . 
  • ०करांदा - पु . एक कडवट तपकिरी रंगाचा कंद . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

गणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय? मग कोणती पूजा करावी?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site