मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा| राम कोणता? - श्रावणकथा प्रसंग अठरावा प्रशस्ति मनाच्या लीला मन ताब्यांत नाहीं तर दगा निश्र्चित मन जतन केल्यास ब्रह्मप्राप्ती विहंगम मार्ग त्रिकुट ते श्रीहाट कूच गोल्हाट व औटपिठ अर्धमातृका ब्रह्मरंध्रापर्यंत चढाई समाधि समाधीची व्याप्ती समाधि-अवस्था-प्रकार नामस्मरणानुसंधान नामापाशी ईश्र्वर नाममहिमा कर्कोटक कथा कर्कोटक कथा निंदकामुळेंच साधुची मळशुद्धि साधूंस तळमळ यातिवंशाचा संबंध नाहीं वादिक भक्त दुकाळे साधू सोंवळें-ओंवळेपण शुद्ध वैराग्य हरिनाम श्रवण राम कोणता? - श्रावणकथा ईश्र्वर एकच कलियुगधर्म कलंकी अवतार ईश्र्वर निवाडा यमयातना-जीवास दंड सृष्टि-प्रलय ग्रंथसमाप्ति ग्रंथलेखनकाल प्रसंगसमाप्ति प्रसंग अठरावा - राम कोणता? - श्रावणकथा श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत राम कोणता? - श्रावणकथा Translation - भाषांतर अंतर्यामी नमिला श्रीअव्यक्त हरि । अष्टदळ कमळ कळिकें भीतरीं । ऊर्ध्वं लक्षूनियां केली हेरी । अर्जुनें मच्छ विंधिला तैसा ॥२३०॥रामनाम बहुतां युगांचें जुनाट । धायवरी घेतल्या लाधे वैकुंठ । पैल सागरीं शिळा तरल्या सादृष्ट । नळाच्यानि हातें ॥२३१॥कोणी म्हणाल राम दशरथी । रामापासूनि अवतार असंख्याति । हे खुणा नेणोनि म्हणतसे छळती । यवन सहित ॥२३२॥जई दशरथ होता निपुत्री । पानडे धरूनियां पारधी करी । सरोवरीं बैसला धरूनि अंधारीं । निशीचे वेळी परियेसा ॥२३३॥जाचुदें घेऊनियां वेगवगत्रें । काशीस चालिला श्रावण पुत्र । तान्हेली म्हणती पाजीं नीर । जाचुदें पुत्रासी ॥२३४॥श्रावणें तरूवर ठवूनियां कावडी । शीघ्र चालिला तृणाहि न लागे मोडी । उदकीं कमंडलु बुडविल्या बुडबुडी । तो दशरथें ऐकिलें ॥२३५॥श्रावणें कमंडलु भरून उभा ठाकला । तों दशरथें धनुष्यबाण लाविला । ओढी काढोनियां श्रावण विंधिला । उरस्थळीं पैं ॥२३६॥श्रावण राम राम मुखें उच्चारी । अंग घातलें महीवरी । तंव दशरथ दचकला शोक करी । म्हणे सांग तूं कवण गा ॥२३७॥येरू म्हणे मी श्रावण कापडी । जाचुदें काशीस नेतहोतों आवडी । जाचुदा पाणी पाजी मग बाण उपडी । प्राण जाईल माझा ॥२३८॥येरू कमंडलु घेऊनि चालिला । मौन धरून पाणी पाजूं लागला । येरें म्हणती कां बा अबोला । धरिला श्रावणां तुंवा ॥२३९॥मग गहिंवरोन दशरथ बोलिला । म्हणे श्रावण नव्हे तो मृत्यु पावला । मज अपराध्यापासून घात जाला । तुमच्या पुत्राचा ॥२४०॥जाचुदें म्हणती दशरथाप्रती । श्रावणां आम्हां भेट करी निरुति । येरें कापडी घेऊन शीघ्र गती । श्रावणाजवळी पैं आला ॥२४१॥श्रीराम राम करी श्रावण । मग दशरथें उपडिला बाण । तंव श्रावणें सोडिला प्राण । जाचुदें तळमळती ॥२४२॥जाचुदें दशरथा शापिलें । म्हणती आम्हांस जैसें जालें । तैसेंच तुज ईश्र्वरें पाहिजे केलें । म्हणोनि देह ठेविला ॥२४३॥दशरथें तिघांचें सरण दहन केलें । पुत्र जाल्या राम ऐसें नांव ठेविलें । तळमळोन उसनें दिधलें । हें श्रोते जाणती ॥२४४॥श्रावणें राम राम होतें म्हणितले । म्हणोनि दशरथे पुत्राचें नाम ठेविलें । हें पाहिजे श्रोत्यांस कळलें । रामनाम अगाध जे ॥२४५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP