TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
ब्रह्मरंध्रापर्यंत चढाई

प्रसंग अठरावा - ब्रह्मरंध्रापर्यंत चढाई

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ब्रह्मरंध्रापर्यंत चढाई
स्‍वप्न आणि सुषुप्ति । तुरिया आणि जागृति । या चारहि अवस्‍था निगुती । सांगितल्‍या ॥३६॥
भोंवर गुंफा प्रसादिलिंग ध्यानीं । भीतरीं असे सत्रावी साजणी । बारा सोळा सखिया मेळउनी । ते ताळुकी राज्‍य करी ॥३७॥
त्रिवेणीपासीं अर्धमातृका वेल्‍हाळा । ताळुका संगमीं मिळाल्‍या बारा सोळा । तेथून चाले वक्षरीचा जिव्हाळा । ज्ञान द्रवावया ॥३८॥
चाचरी खेचरी भूचरी । अलक्ष्य अगम अगोचरी । ह्या पांचहि मुद्रा सुंदरी । आटल्‍या तेथें ॥३९॥
ब्रह्मरंध्र सांगेन उदास । तेथें कोटि सूर्याचा प्रकाश । आयागमनाचा हिरास । जाला तेथें ॥४०॥
तेथें मन तेजी विराला संपूर्ण सकळ संजोगाचें जालें दहन । आत्‍मा राउत स्‍वयें उन्मन । तद्रूप जाला ॥४१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:25.9830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

इष्क

  • इश्क पहा . झडूं दे इष्कीनौबद वाजिव चौघडा - सला २ . प्रसन्नता मर्जि उभयता इष्की सागरा आलें भरतें । - सला ५ . 
  • इषक आंधळा आहे 
  • प्रेम आंधळे असते. 
RANDOM WORD

Did you know?

पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारीच स्पर्श का करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.