मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा| समाधि प्रसंग अठरावा प्रशस्ति मनाच्या लीला मन ताब्यांत नाहीं तर दगा निश्र्चित मन जतन केल्यास ब्रह्मप्राप्ती विहंगम मार्ग त्रिकुट ते श्रीहाट कूच गोल्हाट व औटपिठ अर्धमातृका ब्रह्मरंध्रापर्यंत चढाई समाधि समाधीची व्याप्ती समाधि-अवस्था-प्रकार नामस्मरणानुसंधान नामापाशी ईश्र्वर नाममहिमा कर्कोटक कथा कर्कोटक कथा निंदकामुळेंच साधुची मळशुद्धि साधूंस तळमळ यातिवंशाचा संबंध नाहीं वादिक भक्त दुकाळे साधू सोंवळें-ओंवळेपण शुद्ध वैराग्य हरिनाम श्रवण राम कोणता? - श्रावणकथा ईश्र्वर एकच कलियुगधर्म कलंकी अवतार ईश्र्वर निवाडा यमयातना-जीवास दंड सृष्टि-प्रलय ग्रंथसमाप्ति ग्रंथलेखनकाल प्रसंगसमाप्ति प्रसंग अठरावा - समाधि श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत समाधि Translation - भाषांतर मग येणें जाणें खंडलें आन पहाणेंहि पारुषलें । मी मजमाजीं बिंबलें । उदकीं भानुन्यायें ॥४२॥अर्ध ऊर्ध्व मध्य शुन्य । गुरुलक्षें लाधलें अंजन । निरंजनी ब्रह्म संपूर्ण । सामावलें ॥४३॥जसैं घटीं भरल्या जळ । भीतरी सूर्य दिसे निश्र्चळ । घट भंगल्या केवळ । बिंब तेथेंचि असे ॥४४॥तदन्यायें स्वयें जनीं विजनीं । सकल राहिले व्यापुनी । मजविण आन दुजा मेदिनीं । भासेचि ना ॥४५॥मग जिणें मरणें दोन्ही नाहीं । स्वयंभ सदोदित पाहीं । या साक्षीचा दरुषणीं साही । कोणी विरळा असे ॥४६॥तेथें मी पुरुष ना स्त्री । घरबारी ना बाळब्रह्मचारी । काळें गोरें सांवळे विचारी । स्वरूप नाहीं माझें ॥४७॥तेथें मजला पाठी ना पोट । मध्य ना दिसे शेवट । अवघाचि ब्रह्माचा निघोट । असोन न दिसे ॥४८॥तेथें मज याति ना कुळ । पाहतां मूळ ना ढाळ । अनेक रूपांहूनि निर्मळ । स्वरूप माझें ॥४९॥तेथें मी जोगी ना फकीर । जंगम ना दिसें कलंदर । संन्यासी ना दिगंबर । माझा मी एकलेणें ॥५०॥चौर्यांशी लक्षीचें वेषधारी । त्यांहून वेगळा स्वयें अरुपधारी । मज नाहीं विषयांची भरोवरी । निर्विकार असे ॥५१॥पृथ्वी आप तेज वारा । नभ व्यापून असे न्यारा । समाधि लागली सांगेन अवधारा । श्रोते हो तुम्ही ॥५२॥ब्रह्मांडीं अनेक अनेक तमासे जाले । पहाणेंपण गिटूनियां पाहिलें । तें सांगतां कोपती साधु भले । म्हणोनि गोप्य केलें ॥५३॥शेख महंमदें घेतली समाधि । ते युगानयुगीं आधीं । हे खुण जाणती निज भेदी । ब्रह्मज्ञानी ब्रह्म जाले ॥५४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP