TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
दुकाळे साधू

प्रसंग अठरावा - दुकाळे साधू

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


दुकाळे साधू
ऐसा प्रकाश न करितां साधु म्‍हणविणें । जैसा थेरकरी नटला मानभावपणें । मोहनी सांडूनि मांडिले नाचणें । तैसे कल्‍पनेशी नाचती ॥१८१॥
रांडे सांडे उठवळ आळसी । तामस दुकाळें पातले योगासी । ते घरोघर सादाविती जनासी । आमचे शिष्‍य म्‍हणवूनियां ॥१८२॥
नसतां आत्‍मज्ञान ईश्र्वरभजन । अधर्मी गोवूनि गुंतोनि ठकिती जन । एका गुरूशी गुंतले ज्‍याचें मन । त्‍यातेंहि फोडिती ॥१८३॥
हाटाऊ गुरु भटाऊ चेला । ऐशांचा बहुत पर्वकाळ जाला । भवमोचक तो लपोन राहिला । पाखांड भेणें ॥१८४॥
पहा पहिल्‍या गुरुचें गुज । नवा केल्‍या पैं सांगती सहज । बेइमान न धरिती लाज । मूळ वचनाची अवधारा ॥१८५॥
म्‍हणती तो गुरु नव्हता बरा । तुम्‍ही मजला उपदेश करा । तो तों रांड्या सांड्या धरी फुगारा । गर्वभूषणाचा ॥१८६॥
पहिल्‍या गुरूची निंदा पुसे तात्‍काळ । म्‍हणे कशांला केले होते फटकळ । मजसारिखा गुरु निर्मळ । तुझ्या भाग्‍यें भेटलों ॥१८७॥
अभाविक म्‍हणे बहुतांचा जालों चेला । विशेष तुमचा प्रताप अधिक देखिला । तों तो बुरांड जैसा फुगला । दुकाळ्या गुरु ॥१८८॥
ऐसे दोघे बोलती निंदा गोष्‍टी । तों पदरी पडती पापाच्या कोटि । त्‍यांच्या संगें प्रळय पावे सृष्‍टी । महत्‌ निंदा म्‍हणोनियां ॥१८९॥
सद्‌गुरु असो बाळाभोळा । शिष्‍य पाहिजे भाविक पूर्ण कळा । जैसी पतिव्रता पद्मिणीची लीळा । नरा पतीसीं असे ॥१९०॥
पतिव्रतेसारिखा होय शिष्‍याचा निर्धारु । तरी शिष्‍यत्‍व पालटून होय सद्‌गुरु । ऐसी महिमा ओळखा तदाकारु । शेख महंमदीं स्‍वयें साक्ष ॥१९१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:26.8270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

floating peg

  • चल कील 
  • (also moving peg) 
  • चल कील 
  • (also moving peg) 
RANDOM WORD

Did you know?

How I do save the text on my computer?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.