TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
संग्राम करतो तोच योगेश्र्वरराणा

प्रसंग सतरावा - संग्राम करतो तोच योगेश्र्वरराणा

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


संग्राम करतो तोच योगेश्र्वरराणा
सत्ता ते अहंकाराची सासू । संताप मेहुणा बहु विश्र्वासु । त्‍याच्या कटकाचा केला हरासू । क्षण न लगतां ॥२०५॥
ऐसें आत्‍मत्‍वाचें भांडण । करूं जाणती ते साधुजन । येर अवरण घेऊन । गुंतलें गोंविती ॥२०६॥
नाहीं रिद्धिसिद्धीसी कारण । निळारंभें जिंतावयाचें शूरत्‍वपण । त्रिकुटी तीन वाटा जाण । मीन मागें रीघ केली ॥२०७॥
ऐसी हे अहंकाराची नामजादी । कौतुकें वागवितील अभेदीं । ते कैसेनि तरतील भवनदी । भूतें लांचगीं केली ॥२०८॥
ऐसे देहामध्यें घरबारी । जनांत म्‍हणविती बाळब्रह्मचारी । त्‍यांनी आपली दैना केली थोरी । बहु चंचळपणें ॥२०९॥
ऐसा जो प्रवतें भांडणा । तो जाणिजे योगेश्र्वरांचा राणा । तेणें कळिकाळ घातला आंकणा । सद्‌गुरूकृपेनें ॥२१०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:25.2030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

प्रसवली माता, खाते पुत्राच्या लाथा

  • माता पुत्रास जन्म देऊन आणखी वर त्याच्याकडून होणारा अपमानहि सहन करते व त्याचा लळा पुरवीत असते. 
RANDOM WORD

Did you know?

’ श्रीदुर्गासप्तशती’ ग्रंथातील कांही मंत्र जीवनातील संकटे दूर करतात काय? असे कोणते मंत्र आहेत?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.