मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा| अष्टदळ-झडती प्रसंग सतरावा सद्गुरु व पीर सारखेच द्वैताद्वैत जाणतपण-नेणतपण गारेचा दृष्टांत संग्रामारंभीं सद्गुरुचा निरोप देहसंग्रामास प्रयाण योगसंग्राम सरस्वतीस नमन शेख महंमदाची विनवणी अज्ञानतिमिराचा नाश-आगमन ब्रह्या (चक्रा) ची भेट विष्णू (चक्रा) ची भेट शिवा (चक्रा) ची भेट स्वाधिष्ठान चक्रीं निवास अष्टदळ-झडती स्वारीची तयारी अहंकाराशी भांडण विकल्पाचा पाडाव संकल्पाचा पाडाव अहंकाराचा पाडाव अहंकार मारल्यानें सर्वत्र आकांत अंगमोड्याचा पाडाव दीपाचा पाडाव स्वार्थ संताप सत्ता यांचा विलाप संताप आळस आपापल्या पुरुषार्थाच्या वल्गना अहंकाराचा प्रभाव संतापदमनार्थ मुक्ती रिद्धिसिद्धीचीं कुमक संतापाचा पाडाव संग्राम करतो तोच योगेश्र्वरराणा अहंकाराच्या स्त्रियांबहिणींचा विलाप अहंकाराच्या स्त्रिया सती जातात मन तेजियास थोडी विश्रांति प्रसंग समाप्ति प्रसंग सतरावा - अष्टदळ-झडती श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत अष्टदळ-झडती Translation - भाषांतर महाराष्ट्र भाषा बोलणें बोली । सांगेन अंतरीची सखोली । विवंचना करूनि वेगळाली । श्रोती गुह्य ध्यावें ॥७६॥आतां श्रोती दृढ धरावी क्षिती । बोलेन भेदाची युक्ती । ज्याकारणें साधक कष्टती । तें सांगतां जालों परियेसा ॥७७॥पडजिभेचें अर्ध नळ । त्या बोलिजे अष्टदळ कमळ । तें अर्ध लोंबें अंतराळ । ऊर्ध्वं स्थळीं शिंपीपासी ॥७८॥एका खांबावरी द्वारका । सिद्ध साधु त्यास म्हणती ऐका । हे गुह्य गुजाची टीका । सांगो आरंभिली ॥७९॥आतां मनाचें उड्डाण परियेसा । दिलावरी बैसल्या आठवी जगदीशा । आणीक कांहीं विश्र्वासा । येवों नेदीच पैं ॥८०॥दिलावरी मनाची अखंडता । तेथें अनाचार न घडे सर्वथा । बाष्कळ ऐकोनि वार्ता । कांटाळा वाटे ॥८१॥जेव्हां मन बैसे फोपसीं । तेव्हां उच्चाटण करी परियेसी । स्थिर न राहे एके रहणीसी । चळबळ चंचळपणें ॥८२॥मन काळजी बैसल्या उपरी । चिंता वाटतसे नानापरी । आपणास आपण फजित करी । नाना छंदें ॥८३॥नाना छंदाचें विनोद भाव । कर्माकर्माची उमटे माव । अविद्येची उमटे ठेव । गुण काळजी बैसल्याचा ॥८४॥जेव्हां मन तिळीवरी फिरे । तेव्हां काम वैराग्य संचरे । परद्वार प्रपंचासी झुरे । चेतनेसंगें ॥८५॥जरी तिळीवरी मनाची अखंडता । तरी शरीराची होय वोरंगता । भावें ऐका उत्तम वार्ता । विश्र्वास धरूनियां ॥८६॥जेव्हां पितांबरी बैसें मन । तेव्हां महा क्रोध चढे जाण । सकळ संचरे अवगुण । देहामध्ये ते अवसरी ॥८७॥जरी पितांबरी मन अखंडपणें । तरी शीघ्र कोपे तामसपणें । खवळून ये जैसें सुनें । पाठी लागे भुंकी बडबडी ॥८८॥जेव्हां हे मन चढे त्रिवेणीं । तेव्हां सहज समाधि बैसे लोचनीं । जिकडे पाहे तिकडे स्वरूपावांचुनी । दुजें आनु न भासे ॥८९॥मग बाहिज अंतरीं निज । दिसे भासे ब्रह्मबीज । सहजी समाधि लागे सहज । चहूं अवस्थामध्यें ॥९०॥या अष्टदळावेगळें ज्याचें मन । तो असे भ्रमिष्ठ पिसा व्याहन । अवगुण अविद्या अवलक्षण । सहज स्वभाव त्याचे ॥९१॥त्या नांव वायफळ पिसा । श्रीहरि न ये त्याच्या विश्र्वासा । अपेशी जन्मला परियेसा । प्रळयेलागून ॥९२॥ऐशी अष्टदळाची झडती । सांगितली विज्ञान व्यक्ती । त्याहूनि सांगतो उघड प्रचिति । परी संत कोपतील मातें ॥९३॥ऐसें हे मन चंचळ दारुण । होतें अंहकाराचें प्रधान । तें धरिलें स्वयें पाताऊन । सद्गुरु कृपेनें ॥९४॥ Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP