मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
अहंकार मारल्‍यानें सर्वत्र आकांत

प्रसंग सतरावा - अहंकार मारल्‍यानें सर्वत्र आकांत

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


अहंकार मारिल्‍याउपरी । मग कोणी कोणातें न धरी । आकांत जाला गा श्रीहरि । रणमाझारीं ॥१२८॥
काम क्रोध मद मत्‍सर । हे श्रेष्‍ठ अहंकाराचे वजिर । दंभ प्रपंच मोह सरदार । पाडाव केले ॥१२९॥
हे सातहि जण रणवंट । यावेगळे अनेक बरवंट । अपवित्र आचारभ्रष्‍ट । त्‍यांतेहि प्रळय जाला ॥१३०॥
मग आकांतली गायीकोरी । उदमी कसबी व्यापारी । आकांत शरीराभीतरी । आत्‍मा क्षेत्र करितसे ॥१३१॥
आपुला पारिखा न कळे । आत्‍मा जाऊनि उरभेटी आदळे । अनेक जीवां जनीं आरंदळे । जठरामध्यें जंत कृमी ॥१३२॥
अभाव स्‍वभाव दोन्ही श्र्वानें । हीं पोषिलीं होती अहंकारानें । आत्‍म्‍यास भुंको लागलीं अवलक्षणें । शुभ अशुभ भुंकी ॥१३३॥
ती आत्‍म्‍यानें धरिली पातेजोन । चुचकारूनि केलें समाधान । ईश्र्वरापें दिधली पाठवून । यादगिरी म्‍हणवूनियां ॥१३४॥
मग ईश्र्वर आनंदला । म्‍हणे आत्‍मा यशवंत जाला । आमचा मुहुर्त फळासी आला । आनंदरूपें ॥१३५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP